Wednesday, October 27, 2021

कराडात सोमवार पेठेतील पाण्याच्या टाकीखाली फुलली बाग : बागेत बसणार लहान मुलांची खेळणी ; त्यासाठी अडीच लाख निधी जमा केल्याची नगरसेवक सुहास जगताप यानी दिली माहिती...


वेध माझा ऑनलाइन
कराड
गेली अनेक वर्षापासून येथील सोमवार पेठेतील  पाण्याच्या टाकीखालील जागा पडून होती.  नगरसेवक सुहास जगताप व नगरसेविका सौ. विद्या पावसकर यांच्या संकल्पनेतून व नगरपालिकेच्या सहकार्यातून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रभागाला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा या बागेसाठी वापर करून  या जागेत बाग फुलवली आहे. पर्यावरणाचा संदेश देणारी ही बाग नागरिकांसाठी ऑक्सिजन झोन ठरत आहे. दरम्यान, बागेत लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यासाठी खाजगी ट्रस्टच्या माध्यमातून सुहास जगताप यांनी अडीच लाख रूपयांचा निधी जमा केला आहे अशी माहिती स्वतः नगरसेवक सुहास जगताप यांनी दिली आहे 
सोमवार पेठ पाण्याची टाकीखाली पालिकेच्या माध्यमातून सुंदर बगिचा तयार करण्यात आला आहे. 3 गुंठे जागेत आकर्षक कलाकुसर करून सुंदर बाग करण्यात आली आहे. बागेतील भिंतीवर आकर्षक चित्रे काढण्यात आली आहेत. झाडांची विविध चित्रे काढून बिन झाडांचे जंगल तयार केले आहे. 2018  2019 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत नगरपालिकेकडून प्रभाग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत नंबर मिळवून मिळालेल्या रकमेतून ही बाग फुलवण्यात आली. या  जागेत नगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, बैठक व्यवस्था केली असून बागेत आकर्षक कारंजेही बसवले आहेत. बागेत  लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी बसवण्यात येणार आहेत. यासाठी सुहास जगताप यांनी ट्रस्टच्या माध्यमातून अडीच लाख रूपये निधी जमा केला आहे अशी माहिती स्वतः सुहास जगताप यांनी दिली आहे 

No comments:

Post a Comment