Monday, October 4, 2021

मार्केट यार्ड गेट नंबर १ ते बैल बाजार रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे नगराध्यक्षांचे आदेश...रस्ता दर्जेदार होण्याबाबतही केल्या सक्त सूचना...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 मार्केट यार्ड गेट नंबर १ ते बैल बाजार रस्त्याची नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी आज पाहणी केली. याबाबत सबंधित भागातील नागरिकांशी व अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर नगराध्यक्षा म्हणाल्या  कि “मी स्वतः २०१९ मध्ये हा रस्ता मिटिंग मध्ये मंजूर करून घेतला होता. परंतु मधल्या काळामध्ये काही राजकीय व्यक्तींनी खोडा घातल्याने या रस्त्याचे काम सुरु होऊ शकले नाही. खरतर रस्त्याची बिकट अवस्था, अवजड वाहनांची असणारी सारखी वर्दळ, शहरात येणा-या व जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी या गोष्टींचा विचार करता हा रस्ता लवकर होणे गरजेचे होते.त्यासाठी येथील सामजिक कार्यकर्ते इंद्रजीत भोपते व त्यांचे सहकारी सतत पाठपुरावा घेत होते. आता या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर काढून संबधित ठेकेदाराला दिली आहे तसेच त्यासाठीचा निधीही उपलब्ध झाला आहे. पावसाचा अंदाज बघून लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.

याबाबत आज नगरपरिषद बांधकाम नगरअभियंता एम.एच.पाटील, अभियंता धायगुडे, कोकणे यांचेसह या कामासंबंधित असणारे ठेकेदार यांच्याबरोबर या रस्त्याची नगराध्यक्षांनी संपूर्ण पाहणी करून पावसाचा अंदाज बघून रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यास सांगितले तसेच काम दर्जेदार होण्याबद्दल सबंधित ठेकेदार तसेच अधिकारी यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी  सामजिक कार्यकर्ते इंद्रजीत भोपते, त्यांचे सहकारी निलेश वास्के, गणेश पवार, मस्तान आतार,विशाल देशमुख, विशाल भोसले, अभिजित भोपते,  तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी परिसरातील नागरिकांशी नगराध्यक्षानी विविध विषयावर चर्चाही केली

No comments:

Post a Comment