कराड
येथील प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक आरोग्य सभापती महेश कांबळे व नगरसेविका सौ.कश्मिरा इंगवले यांनी एकूण 800 गोरगरीब कुटुंबाला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे आज वाटप केले
कोरोनाचे संकट बिकट आहे.सम्पूर्ण देश या रोगाने जुजतो आहे,आशा परिस्थितीत सर्वच गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.कराडमधील चित्रही असेच आहे.येथील गोरगरीब जनता भुकेने व्याकुळ आहे. त्यांची उपासमार चालू आहे.त्यामुळे शहरातील अनेक नगरसेवक,नगरसेविका पुढे होऊन गरिबांना मदतीचा हात देत आहेत.प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक महेश कांबळे व नगरसेविका सौ.कश्मिरा इंगवले यांनी आज अशाच गोरगरीब 800 कुटुंबाला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. हे वाटप पोलिसांना बरोबर घेऊन व सोशल डिस्टन्स ठेऊन केल्याचे या नगरसेवकांनी सांगितले.
विनाकारण लोकांनी घरातून बाहेर येणे टाळा व सुरक्षित रहा असा संदेशही या नगरसेवकांनी जनतेला दिला आहे.
No comments:
Post a Comment