Tuesday, April 21, 2020

पालकमंत्र्यांची स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट...धान्य पुरवठा व्यवस्थित होतोय का नाही याबाबत केली नागरिकांशी चर्चा...



अजिंक्य गोवेकर
कराड
नागठाणे ( जि.सातारा) येथे मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे  सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी येथील स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट दिली.  रेशन वितरणाचे काम सुरू होते तेथे त्यांनी दुकानाचे मालक यांच्याशी चर्चा केली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या नागरिक व महिलांशीही चर्चा केली. दुकानासमोर उभ्या असणाऱ्या ग्राहकांना सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या सूचना ठेऊन धान्याचा व्यवस्थित पुरवठा होत आहे का याची माहिती घेतली.

त्याचबरोबर दुकानासमोर गर्दी होऊ नये यासाठी दुकानातील वजन काटे वाढवून तातडीने रेशन देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क रहाणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांसाठी लोकांनी बाहेर पडणे टाळवे. असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

No comments:

Post a Comment