अजिंक्य गोवेकर
मंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या मलबार हिल येथील वर्षा बंगल्यावर बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याला 'कोरोना'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आधी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या परिसरातील चहाविक्रेता कोरोना पाॅझिटिव्ह आढळला होता. आता वर्षा बंगल्याचा परिसरही सॅनिटाईज करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही महिला पोलिस अधिकारी पायधुणी पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहे. तिला वर्षा बंगल्यावर बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी तिला या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी नेमण्यात येणाऱ्या प्रत्येकाचे बाॅडी टेंपरेचर घेतले जाते. त्यात या महिला अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने तत्काळ दक्षिण मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पायधुनी पोलिस ठाण्यात या महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या अन्य काही कर्मचाऱ्यांचेही विलिगीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात पोलिस अधिक काळ रस्त्यावर नाकाबंदी सारख्या ड्युट्या करत आहेत. त्यात त्यांना लागण होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत राज्यभरात सुमारे पन्नास पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आज पुण्यातही मध्यवस्तीतल्या पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे पोलिस कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment