अजिंक्य गोवेकर
कराड
येथील नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांच्या पुढाकाराने येथील मुजावर कॉलनी येथे शिवभोजन थाळी च्या माध्यमातून शहरातील गोरगरिबांच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. नुकतेच या उपक्रमाचे उदघाटन तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे,जयंत बेडेकर आदींची उपस्थिती होती.
शासनाने पाच रुपयात जेवण द्यायची व्यवस्था करून गरिबांच्या भुकेची व्यवस्था केली आहे .लॉक डाऊन च्या काळात गोरगरिबांच्या पोटाचे हाल होत असल्याच्या कारणाने नाममात्र पाच रुपये घेऊन ही जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. मात्र एखाद्याकडे तेवढे ही पैसे नसतील आणि त्यामुळं तो उपाशी राहू नये या उदात्त भावनेने येथील नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांनी पुढाकार घेऊन शिवभोजन थाळीच्या माध्यमातून येथील मुजावर कॉलनी येथे मोफत जेवणाची व्यवस्था करून गरिबांच्या पोटाचा प्रश्न सोडवण्याचा कौतूकास्पद प्रयत्न केला आहे. ज्यांचे कडे पैसे नसतील त्यांचे पैसे आंबेकरी भरणार आहेत. गरीब जेवला पाहिजे ही त्यांची त्यामागे तळमळ आहे. कसलीही प्रसिद्धी न करता त्यांनी दाखवलेल्या या दातृत्वाचे सम्पूर्ण शहरातून कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment