Saturday, April 18, 2020

अनुमानीत असणाऱ्या 101 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

कराड : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 7, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या 58, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 19, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 11, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे दाखल असणाऱ्या 5 व ग्रामीण रुग्णालय वाई येथे दाखल असणाऱ्या 1 अशा एकूण 101 अनुमानित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 3, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 15, व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे एक अशा एकूण 19 जणांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही  डॉ.  गडीकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment