अजिंक्य गोवेकर
कराड
येथील लोकशाही आघाडीचे गटनेते व नगरसेवक सौरभ पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत कोरोना विषयी लोकांच्यात जागृती करून सोशल डिस्टन्स ची गरज व महत्व सांगितले आहे.घरीच रहा,सुरक्षित रहा असा संदेश देखील त्यांनी जनतेला दिला आहे.
येथील लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत जनतेसाठी अनेक उपक्रमाद्वारे शहरातून कार्यरत असतात.सध्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर त्यांनी सोशल मीडियातून लोकांना जागृत केलं आहे.शहरात पालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत. लोकांनी घरात बसूनच प्रशासनास सहकार्य करायचं आहे.गरजेच्या वस्तू घरपोच करण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे,त्या करीता बाहेर पडण्याची गरज नाही. मास्क वापरा,सोशल डिस्टन्स ठेवा, लोकांचा अनावश्यक संपर्क टाळा कोरोना आपल्या शहरातून पूर्णपणे घालवण्याचा हाच मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोनाचा प्राधुरभाव होऊन मृत झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार केलेल्या पालिकेतील कर्मचाऱ्यांचा त्यांनी नुकताच सत्कार केला.
No comments:
Post a Comment