कऱ्हाड ः शंभर टक्के लॉकडाऊन झालेल्या शहर, मलाकपूरसह त्या भागातील ग्रामीण भागात घरपोच दूध वितरण व्यवस्था उद्यापासून (शनिवारपासून) सुरू होणार आहे. सकाळी सहा ते आठ व सायंकाळी सहा ते आठ वेळत कोयना दूधातर्फे नेमलेल्या 47 दूध वितरकांकडून घरपोच दूध दिले जाणार आहे. त्यासाठी त्या दूध वितरकांच्या मोबाईलवर आपली मागणी नागरीकांनी कळवायची आहे. त्यानंतर तो दूध वितरक तुम्हाला घरपोच दूध देणार आहे. त्याची महत्वाची बैठक प्रातांधिकारी उत्तम दीघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांच्या व कोयना दूध संघाचे कार्याकारी संचालक अमाेल गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात तो निर्णय झाला. लॉक डाऊन काळात दूध मिळावे अशी जनतेची मोठ्या प्रमाणात मागणी होतो त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे
No comments:
Post a Comment