Tuesday, April 21, 2020

रमजान महिन्यात शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे - जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांचे आवाहन


अजिंक्य गोवेकर
सातारा
 कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लॉकडावूनच्या परिस्थितीत ज्या प्रमाणे सामाजिक विलगीकरण पालन करण्याबाबतच्या राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहे त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्येही कटाक्षाने करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इप्तारसाठी एकत्र येवू नये. घराच्या, इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इप्तार करण्यात येवू नये, मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण अथवा इप्तार करण्यात येवू नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येवून करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इप्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पाडावे. लॉकडावून विषीय पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment