Tuesday, April 28, 2020

उत्तरप्रदेश मध्ये साधूंच्या झालेल्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

अजिंक्य गोवेकर 
मुंबई :
 उत्तरप्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त केली आहे.
 उत्तरप्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंची हत्या करण्यात आली आहे.त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.या अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राने अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये ज्यारितीने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे बुलदंशहर प्रकरणी देखील  दोषींना कडक शिक्षा होईल अशी  अपेक्षा व्यक्त केली आहे.  कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या आठवड्यात पालघर येथे दोन साधूंची जमावाने हत्या केल्याची घटना घडली.या घटनेचे मोठे पडसाद उमटले होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलून या घटनेची माहिती घेतली होती.

No comments:

Post a Comment