Wednesday, April 22, 2020

तीन वर्षाचा मुलगा कोरोना बाधित...


 सातारा
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित तीन वर्षीय मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हा मुलगा कोरोना बाधित असलयाची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्याची काेराेना बाधित रुग्णांची आज संख्या 18 इतकी झाली आहे.

याबराेबरच विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा 14 दिवसानंतरचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला घशातील स्त्रावाचा नमुना पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस त्याच्यावर उपचार व पुर्नतपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. गडीकर यांनी दिली.
आता सातारा जिल्ह्यात 13 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत तीन (कोविड19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर दाेघांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल असणाऱ्या एका अनुमानित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे एक , बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आलेले दाेन व सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित नऊ तर कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे चार, सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित 24 व उपजिल्हा जिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाचा निकट सहवासित एक अशा एकूण 41 जणांना अनुमानित म्हणून आज (बुधवार) विलिगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment