अजिंक्य गोवेकर
कराड
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची व्याप्ती देशात तसेच महाराष्ट्रात होऊ लागली आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री मा. ना. श्री बाळासाहेब पाटील
यांच्या अध्यक्षतेखाली पणन, सहकार विभागातील अधिकारी यांच्या समवेत मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्रातील लॉकडाउनच्या एकंदर परिस्थितीबद्दल विविध विषयांवर चर्चा झाली.
या प्रसंगी प्रधान सचिव सहकार श्रीमती आभा शुक्ला, अप्पर मुख्य सचिव (पणन)श्री अनुप कुमार, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ श्री नवीन सोना, खाजगी सचिव ,मंत्री सहकार ,पणन ,श्री संतोष पाटील, उपसचिव (पणन)श्री का. गो .वळवी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment