Sunday, October 31, 2021

आज सातारा जिल्ह्यात 36 बाधीत ; 142 डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 36नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 142 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 4 खंडाळा 0 खटाव 6 कोरेगांव 0 माण 8 महाबळेश्वर 0 पाटण 2 फलटण 2 सातारा 11 वाई  0 व इतर 3 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 36 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 142 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Saturday, October 30, 2021

आज सातारा जिल्ह्यात 32 बाधीत ; 21 जण डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 32नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 21 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 1 माण 3 महाबळेश्वर 0 पाटण 1 फलटण 4 सातारा 14 वाई  6 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 32 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 21 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Friday, October 29, 2021

आज सातारा जिल्ह्यात 37 जण बाधीत : 88 जण डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 37 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 88 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 2 कराड 5 खंडाळा 1 खटाव 5 कोरेगांव 3 माण 1 महाबळेश्वर 1पाटण 0 फलटण 4 सातारा 11 वाई  1 व इतर 2 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 37 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 88 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

कराडात मेव्हण्याने केला दाजीचा खेळ खल्लास... बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणाने केला खून...

वेध माझा ऑनलाइन
कराड
बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून मेव्हण्यानेच त्याच्या दाजीचा खून केल्याची धक्कादायक घटना येथील वाखाण परिसरात घडली आहे. 
गुरुवारी 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मजूरीचे काम करत असलेल्या दाजीचा त्याच्याच मेव्हण्याने गळा दाबून व छाती दगडाने ठेचून खून केला आहे. 

नितीन नागेश भालशंकर रा. वाखान परिसर (कराड), मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रवि रमेश कुडवे रा. वाखाण परिसर (कराड), मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर असे खूनप्रकरणी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील वाखाण परिसरात नितीन भालशंकर हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो वारंवार दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत होता. याच रागातून चिडून जाऊन नितीनच्या मेव्हण्याने दाजीचा गळा दाबून त्यानंतर त्याच्या छातीवर दगडाने ठेचून खून केला. 
घटनेची माहिती मिळताच 
तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असून तपासाची गती दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे करीत आहेत.

Thursday, October 28, 2021

पालिकेचे सहकार्य, लोकवर्गणीतून सोमवार पेठेत बागेची निर्मिती ; नगरसेवक सुहास जगताप या बागेकडे फिरकतही नाहीत...ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन
कराड
सोमवार पेठ पाण्याच्या टाकीखालील मोकळय़ा जागेत बाग साकारली आहे. ही बाग माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपालिकेच्या सहकार्याने व लोकवर्गणीतून साकारली असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी दिली.दरम्यान,त्याच परिसरातील नगरसेवक सुहास जगताप या बागेकडे फिरकतही नाहीत अशी माहितीही अण्णा पावसकर यांनी दिली आहे

ते म्हणाले की, तीन वर्षापूर्वी सोमवार पेठ पाण्याच्या टाकीखालील जागेचा चांगला वापर करण्यासाठी येथे बागेचे अंदाजपत्रक बनवले होते. ते 33 लाखांचे होते. मात्र हे काम पुढे सरकलेले नव्हते. माझी वसुंधरा अभियान नगरपालिकेने हाती घेतल्यानंतर येथे प्रथम कारंजाची निर्मिती केली. वॉकिंग ट्रक बनवला. प्रत्यक्ष झाडे लावता येणार नसल्याने पिलरवर झाडे रंगवून घेतली. लहान मुलांसाठी खेळणी बसवली. यासाठी येथील लोकांना आर्थिक सहभाग देण्याचे आवाहन केले. त्यानुसार लोकांनी दिलेल्या व माझ्या वर्गणीतून 65 हजार जमले. त्यानंतर मुलांसाठी खेळणी बसवण्याचा निर्णय घेतला. या खेळण्यांची ऑर्डर देऊन 40 हजार रूपये ऍडव्हान्सही दिला आहे. या सर्व काळात नगरसेवक सुहास जगताप हे तिकडे फिरकलेले नव्हते. त्यांना जागा विकसित करण्यासाठी आणखी एक ठिकाण सुचवले होते. मात्र ते त्यांनी केले नाही. त्यांनी कोणत्या ट्रस्टचा निधी आणल्याचे सांगितले असले तरी तो अद्याप पालिकेकडे जमा झालेला नाही. या बागेची निर्मिती लोकसहभाग, पालिकेच्या सहकार्याने तसेच आपल्या व नगरसेविका विद्या पावसकर यांच्या संकल्पनेतून झाले आहे. बागेच्या उभारणीसाठी काही लोकांनी आमच्याकडे लोकवर्गणी जमा केली होती. त्यांचा गैरसमज होऊ नये, यासाठी हा खुलासा करत असल्याचे पावसकर यांनी सांगितले.

आज सातारा जिल्ह्यात 58 बाधीत ; 74 डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 58 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 74 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 1 कराड 7 खंडाळा 4 खटाव 10 कोरेगांव 1 माण 4 महाबळेश्वर 0पाटण 0 फलटण 7 सातारा 17 वाई  3 व इतर 3 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 58 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 74 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

कराड पालिका निवडणूक पक्षचिन्हावरच लढणार ; भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर

वेध माझा ऑनलाइन
कराड
मागील वेळी आम्ही भाजप म्हणून काही जागांवर लढलो व इतर ठिकाणी युती केली यावेळी आम्ही सर्वच्या सर्व जागा पक्षचिन्हावरच लढवणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले
भाजपा च्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर राज्याचे चिटणीस डॉ अतुलबाबा भोसले शहराध्यक्ष एकनाथ बागडी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे तसेच भाजपचे सर्व नगरसेवक तसेच शहर व तालुक्याचे सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

पावसकर पुढे म्हणाले उमेदवार निवडताना कोणत्या वार्डात कोण चालेल यांची शहानिशा करण्यात येईल समाजात त्या व्यक्तीचे स्थानही पाहिले जाईल तसेच सतत संपर्कात असणाऱ्या उमेदवाराला या निवडणुकीत भाजपा उमेदवारी देईल असेही जिल्ह्याध्यक्ष विक्रम पावसकर यांनी यावेळी स्पष्ट केलं मागच्या वेळी आम्ही कमी जागांवर लढलो हे आमची चूक झाली सर्वच्या सर्व जागेवर लढलो असतो तर आज बहुमत ही आमचेच असते असेही ते यावेळी म्हणाले

ना बाळासाहेब पाटील आमच्यासाठी माननीय...तर...उदयदादा आमचे मित्र होते...असे म्हणत डॉ अतुलबाबांनी जिल्हा बँकेबाबत आपली भूमिका केली स्पष्ट...?

वेध माझा ऑनलाइन
कराड
सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीत सोसायटी मतदार संघात ऍड उदयसिह पाटील विरुद्ध ना बाळासाहेब पाटील यांची लढत होत आहे पालकमंत्री हे आम्हाला माननीय आहेत... तर उदयसिह पाटील हेही आमचे  मित्र होते... असे म्हणत भाजपाचे युवा नेते अतुल भोसले यांनी आहेत... आणि होते... यातील फरक पत्रकारांना आवर्जून दाखवून देत या निवडणुकीतील आपली भूमिका आज स्पष्ट केली... पार्टी किंवा पक्ष बघण्यापेक्षा योग्य व्यक्तीच्या पाठीशी आपण उभे राहणार असल्याचे सूतोवाचदेखीव त्यांनी येथील भाजपा च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आज केले आणि आपल्या गटाचे मतदान कोणाला होणार हे अप्रत्यक्ष सांगूनही टाकले...आमचे मतदान ज्यांना होईल तेच याठिकाणी विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला...

भाजपा च्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते
यावेळी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर राज्याचे चिटणीस डॉ अतुलबाबा भोसले शहराध्यक्ष एकनाथ बागडी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे तसेच भाजपचे सर्व नगरसेवक तसेच शहर व तालुक्याचे सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

 सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सोसायटी गटात यापूर्वी दिवंगत काँग्रेस नेते माजी आमदार विलासकाका पाटील यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे सध्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत काकांचे चिरंजीव ऍड उदयदादा पाटील यांनी आपली उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील आहेत या गटात डॉ अतुलबाबा भोसले यांचेही मतदान आहे त्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अतुलबाबा यांनी आपण पार्टी किंवा गट तट न बघता योग्य माणसाच्या पाठीशी असल्याचे सांगितले बाळासाहेब पाटील हे आमच्यासाठी माननीय आहेत...उदयदादा मित्र होते...असे सांगत त्यांनी या निवडणूकीतील आपली भूमिका स्पष्ट केली...

दरम्यान पालिकेच्या निवडणुकीदरम्यान केवळ आपण शहराच्या राजकारणात सक्रिय होता नंतर पुढच्या निवडणुकीतच दिसता पार्टीला पाठबळ देण्याकरीता किंवा नगराध्यक्षाना अडचणीत असताना पाठिंबा दयायला तुम्ही कुठेच दिसला नाहीत... इतर पार्त्यांच्या नेत्यांशी तुमचे हितसंबंध जपण्यासाठी तुम्ही असे करता का?असे विचारले असता...ते म्हणाले आम्ही पूर्ण पणे आमच्या कार्यकर्त्याला पाठिंबा देण्याची भूमिका घेत असतो..यापुढेही घेऊ...इतर पार्टीशी हितसंबंधाबाबतच्या आरोपाचे उत्तर न देता त्यांनी या प्रश्नाला बगल दिली... 

दरम्यान यावेळी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर या पत्रकार परिषदेस उशिरा आले त्यांनाही तुम्ही केवळ निवडणुकीपुरतेच पक्ष्याच्या व्यासपीठावर दिसता...निवडणूक झाली की परत शहराच्या राजकारणात तुमचा सहभाग दिसत नाही?असे विचारले असता आम्ही आहोतच तुम्हाला आम्ही दिसत नाही त्याला काय करायचे...असे वेळ मारून नेणारे उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला...तिथेच उपस्थित असलेल्या डॉ अतुलबाबनी तो हाणून पाडत पत्रकारांचे आपल्यावर बारीक लक्ष आहे त्यामुळे इथून पुढे आम्ही याबाबत दक्षता घेऊ असे सांगत चरेगावकर याना आणखी काही बोलण्यापासून गप्प केले ...

Wednesday, October 27, 2021

अखेर... समीर वानखेडे विरोधात चौकशी होणार ; राज्य सरकारची घोषणा

वेध माझा ऑनलाइन
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात अखेर महाराष्ट्र सरकारने चौकशीची घोषणा केली आहे. 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. सरकारने ऑर्डर काढून 4 अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली आहे. एकीकडे नवाब मलिकांच्या आरोपांनी घायाळ झालेले समीर वानखेडे आता राज्य सरकारने लावलेल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात त्याने धक्कादायक आरोप केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रिलीज करण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील होणार होती. त्यातले 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते. तसं फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला. याच गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशीची घोषणा केली आहे. दरम्यान गेले अनेक दिवस नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा सामना उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आता राज्य सरकारने वानखेडेंविरोधात चौकशी लावल्याने सरकार विरुद्ध वानखेडे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


युवा नेते राहूल खराडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा ; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा...


वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील युवा नेते राहुल खराडे यांचा वाढदिवस आज अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला शहर व तालुका परिसरामधील अनेक मान्यवरांनी समक्ष भेटून दूरध्वनीवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छाचा अक्षरशः वर्षाव केला 

युवा नेते राहुल खराडे हे शहर व परिसरातील सुपरिचित असे व्यक्तिमत्त्व आहे त्यांनी मधल्या कोविड काळात नगरसेविका सौ सुप्रिया खराडे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाने शहरात मोठं काम केलं आहे जीवनावश्यक वस्तुंसह सॅनिटायझर मास्कचे वाटप करत त्यांनी आपली बांधीलकी जपली आहे  कोविड काळात गरजूंना धान्य व किराणा वाटप केले आहे  काही दिवसांपूर्वी वृक्षारोपण सारखे कार्यक्रम घेऊन पर्यावरणसंबंधी आपली आस्था त्यानी दाखवली आहे गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जीवनावश्यक वस्तूचे वाटपही केले आहे राहुल खराडे हे सातत्याने लोकांच्यात मिसळून सामाजिक कार्यात व्यग्र असतात त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक होत असते नुकतेच त्यांनी पालिकेच्या सहकार्याने कोवीड लसीकरण मोहीम राबवूनदेखील आपल्या सामाजिक बांधिलकीला आणखी घट्ट केले आहे
आज त्यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला सकाळी त्यांनी आपल्या प्रभागातील जनतेचा आशीर्वाद घेत आपल्या सामाजिक कार्याला अधिकाधिक उंच नेण्यासाठी संकल्प सोडला दरम्यान शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज त्यांच्यावर अक्षरशः शुभेच्छाचा वर्षाव केला 

वानखेडे प्रकरणी नवाब मलिकांची अर्ध्या तासाची खळबळजनक पत्रकार परिषद...

वेध माझा ऑनलाइन
ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. सकाळी 9 वाजता वानखेडे यांच्या लग्नाचा फोटो ट्विट करुन पुढच्या तासाभरात त्यांनी 30 मिनिटांची घणाघाती पत्रकार परिषद घेतली. या प्रेसमध्ये त्यांनी आज पुन्हा नवे आरोप केले आहेत. आर्यन खान ड्रग्ज केस कशी फ्रॉड आहे हे समजण्यासाठी 3 व्यक्तींचे CDR तपासा, सगळा कार्यक्रम जगजाहीर होईल. क्रूझवर रेड झालीच नाही, त्याअगोदर कारवाई झाली, हे सगळ्यांसमोर येईल, असं नवाब मलिक म्हणाले. तसंच क्रूझवरच्या पार्टीत समीर वानखेडे यांचा दाढीवाला मित्र होता. त्यांनी त्याचं नाव जाहीर करावं, त्यांनी मित्राचं नाव जाहीर केलं नाही तर मी जाहीर करेन, असं मलिक म्हणाले.

समीर वानखेडे, वानखेडेंचे चालक आणि प्रभाकर साईल यांचा सीडीआर तपासावा. त्यांच्या सीडीआरमधून सगळा घटनाक्रम समोर येईल, अशी मागणी नवाब मलिक एनसीबीकडे केली. झालेले आरोप गंभीर आहे. एनसीबीने आता तत्काळ पावलं उचलावीत, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. प्रभाकरने व्हिडीओद्वारे सगळा घटनाक्रम समोर आणलाय. या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे. विशेष म्हणजे क्रूझ पार्टीची महाराष्ट्र पोलिसांकडून परवानगी घेतलेली नव्हती, असंही नवाब मलिक म्हणाले.

क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाचा सहभाग होता. हा तोच दाढीवाला आहे, जो समीर वानखेडेंचा मित्र आहे, असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज मागवावं. त्याची प्रेमिका बंदूकीसह क्रूझवर होती. एका व्हिडीओत ती डान्स करताना दिसून येत आहे. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही समोर आणा, सगळं सत्य समोर येईल असं ते म्हणाले.

समीर वानखेडेंची नोकरी नक्की जाणार

माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीय, हे मला सगळ्यांसमोर आणायचंय. खोटा जातीचा दाखला घेऊन त्यांनी पद्धतीने नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे. एक दलित व्यक्ती झोपडीत राहून युपीएससीची तयारी करत होता. त्याची नोकरी समीर वानखेडेने हिसकावून घेतली आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. अशा बोगसगिरीविरोधात 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की त्यांची नोकरी नक्की जाईल.

तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, मलिकांचा पुनरुच्चार

जर एका समीरला असा फर्जीवाडा करुन नोकरी मिळत असेल तर 15 कोटी मुस्लिमांना मागासवर्गीय म्हणून अशी नोकरी मिळेल का?, असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी विचारला. मी दाखवलेला जातीचा आणि जन्माचा दाखला जर खोटा असेल तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा पुनरुच्चार मलिक यांनी करताना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याची चौकशी करावी, अशी मागणीही मलिक यांनी केली.मला काल एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या निनावी पत्र मिळालं, पहिल्यांदा म्हटले याची दखल घेऊ, नंतर मी हे पत्र एनसीबी डीजींना पत्र पाठवलं. आरोपांकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे, कारण आरोप खूपच गंभीर आहेत. मला वाटतं एवढी मोठी इनव्हिस्टिगेश एजन्सी आहे, आमच्यापुढेही जाऊन चार पावलं काम करेल, अशी अपेक्षा होती, असं नवाब मलिक म्हणाले. निनावी पत्राची दखल घ्यायलाच हवी, ज्या विषयावरुन मी आरोप करतोय, त्याकडेही एनसीबीने दुर्लक्ष करु नये, असं नवाब मलिक म्हणाले

कराडात सोमवार पेठेतील पाण्याच्या टाकीखाली फुलली बाग : बागेत बसणार लहान मुलांची खेळणी ; त्यासाठी अडीच लाख निधी जमा केल्याची नगरसेवक सुहास जगताप यानी दिली माहिती...


वेध माझा ऑनलाइन
कराड
गेली अनेक वर्षापासून येथील सोमवार पेठेतील  पाण्याच्या टाकीखालील जागा पडून होती.  नगरसेवक सुहास जगताप व नगरसेविका सौ. विद्या पावसकर यांच्या संकल्पनेतून व नगरपालिकेच्या सहकार्यातून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रभागाला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा या बागेसाठी वापर करून  या जागेत बाग फुलवली आहे. पर्यावरणाचा संदेश देणारी ही बाग नागरिकांसाठी ऑक्सिजन झोन ठरत आहे. दरम्यान, बागेत लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यासाठी खाजगी ट्रस्टच्या माध्यमातून सुहास जगताप यांनी अडीच लाख रूपयांचा निधी जमा केला आहे अशी माहिती स्वतः नगरसेवक सुहास जगताप यांनी दिली आहे 
सोमवार पेठ पाण्याची टाकीखाली पालिकेच्या माध्यमातून सुंदर बगिचा तयार करण्यात आला आहे. 3 गुंठे जागेत आकर्षक कलाकुसर करून सुंदर बाग करण्यात आली आहे. बागेतील भिंतीवर आकर्षक चित्रे काढण्यात आली आहेत. झाडांची विविध चित्रे काढून बिन झाडांचे जंगल तयार केले आहे. 2018  2019 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत नगरपालिकेकडून प्रभाग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत नंबर मिळवून मिळालेल्या रकमेतून ही बाग फुलवण्यात आली. या  जागेत नगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, बैठक व्यवस्था केली असून बागेत आकर्षक कारंजेही बसवले आहेत. बागेत  लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी बसवण्यात येणार आहेत. यासाठी सुहास जगताप यांनी ट्रस्टच्या माध्यमातून अडीच लाख रूपये निधी जमा केला आहे अशी माहिती स्वतः सुहास जगताप यांनी दिली आहे 

आज जिल्ह्यात 68 बाधीत ; 95 डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 68 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 95 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 2 कराड 13 खंडाळा 1 खटाव 9 कोरेगांव 0  माण 5 महाबळेश्वर 2 पाटण 2 फलटण 10 सातारा 16 वाई  3 व इतर 4 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 68 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 95 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Tuesday, October 26, 2021

सातारा जिल्ह्यातील उपहारगृहे,भोजनगृहे रात्री 12 वाजेपर्यंत राहणार सुरू ; जिल्हाधिकारी

वेध माझा ऑनलाइन
सातारा 
दीपावली सणाच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात दि. 27 ऑक्टोबर पासून 5 नोव्हेंबर पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदीचे  आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील उपहारगृहे, भोजनगृहे व इतर सर्व आस्थापनांच्या वेळेत सुधारणा करण्यात आल्या आहेत याबाबतचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी नुकतेच आदेश जारी केले आहेत

 राज्य शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या  वतीने उपहारगृहे, भोजनगृहे  तसेच इतर आस्थापना बाबींमध्ये सुधारणा केल्याचे नुकतेच सांगण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 13 ऑगस्ट रोजीच्या आदेशात सुधारणा करुन सातारा जिल्ह्यातील सर्व उपहारगृहे व भोजनगृहे रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे. जिल्ह्यातील इतर सर्व आस्थापना रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगीही देण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी सिंग यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये मी का नाही...?उदयनराजेंचा सवाल :पवार साहेबांना विचारा ; शिवेंद्रराजेंचे उत्तर...

वेध माझा ऑनलाइन
सातारा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलीय. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपलीय. पण प्रथेपरंपरेप्रमाणे साताऱ्यातल्या दोन्ही राजेंमध्ये सुंदोपसुंदी सुरुच आहे. राष्ट्रवादीप्रणित सर्वसमावेशक पॅनेलमध्ये मी का नाही?, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. त्यावर हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा पवारसाहेबांना विचारा, असं म्हणत उदयनराजेंचा बॉल पुन्हा त्यांच्याच कोर्टात शिवेंद्रराजेंनी ढकललाय.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीप्रणित सर्वसमावेशक पॅनलमध्ये अद्याप तरी जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी दबाव तंत्राचा वापर करत बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे संचालक मंडळ यांना खिंडीत पकडायला सुरुवात केली आहे.
उदयनराजेंना पॅनल मध्ये का घेतले नाही या विषयी त्यांनी रामराजे, शरद पवार, अजित पवार यांच्याशी बोलून घ्यावे. साताऱ्यात जे काय होतंय ते सर्व उदयनराजेंमुळे होत असल्याचा टोमणा मारत सातारला ऑक्‍सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता मात्र तो सुद्धा उदयनराजेंनी सुरु केला, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंची नक्कल केली. 
शिवेंद्रराजे अध्यक्ष असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर कारखान्याला कर्ज कसे दिले?, असा सवाल उपस्थित करत मी बँकेत जागा अडविण्यासाठी संचालक झालो नाही तर शेतकऱ्यांच्या हिताची देखरेख करण्याकरिता बँकेत मला पाठवले असल्याचे उदयनराजे म्हणाले. यावेळी गुरु कमोडीटीचा गुरु कोण? असा सवाल उपस्थित करून त्यांनी अजित पवारांवर त्यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागली नाही, असं सांगत उदयनराजेंना माहित नसावे ED ने जी माहिती मागवली ती जरंडेश्वर कारखान्यांना दिलेल्या फायनान्स बाबत होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर ची सर्व कागदपत्रे तपासून हे कर्ज दिले असून सध्या जरंडेश्वरचे सर्व हप्ते नियमित सुरु असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान उदयनराजे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर केलेल्या आरोपावर मला माहिती नाही, असे सांगून मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेची बैठक पार पडली. त्यामध्ये उदयनराजे ‘बँक चांगली चालली आहे’, असं म्हणाले होते, मग आता माशी कुठे शिंकली?, असा सवाल शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना विचारला.

आज सातारा जिल्ह्यात 33 जण बाधीत ; 161 डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 33 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर2जणांचा मृत्यू झाला आहे तर 161जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 3 खटाव 3 कोरेगांव 1  माण 5 महाबळेश्वर 1 पाटण 0 फलटण 6 सातारा 8 वाई  0 व इतर 2 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 33 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 161 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Monday, October 25, 2021

आज सातारा जिल्ह्यात 34 बाधीत :96 डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 34 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0जणांचा मृत्यू झाला आहे तर 96 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2 खंडाळा 3 खटाव 4 कोरेगांव 1  माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 4 फलटण 1 सातारा 16 वाई 1 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 34 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 96 जणांना आज घरी  सोडण्यात आले आहे.

नवीन महामार्गाचे काम नियोजनपूर्वक करून गतीने पूर्ण करा - पृथ्वीराज चव्हाण


वेध माझा ऑनलाइन
कराड
कराड शहरात प्रवेश करताना कोल्हापूर नाका या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असते तसेच अनेक अपघात या वळणावर झालेले आहेत. यासाठी इथे दुहेरी उड्डाणपुल होणे गरजेचे आहे यामुळेच वेळोवेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुलाबाबत पाठपुरावा केलेला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासोबत सुद्धा त्यांनी मीटिंग घेऊन येथील महामार्गाची वस्तुस्थिति सांगितली होती. या सहा पदरी नवीन महामार्गासाठी कोल्हापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सोबत झाली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांनी काही सूचना केल्या कि, नवीन महामार्गाच्या सहापदरीचे काम अधिकाऱ्यांनी पूर्व नियोजन करून जलद गतीने पूर्ण करावेत तसेच वाहतूक नियोजनाचा सुद्धा विचार केला जावा अश्या काही सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले, खा.धैर्यशील माने, संजय मंडलिक, आ. मानसिंगराव नाईक, राजू आवळे, अरुण लाड, चंद्रकांत जाधव, सुरेश खाडे आदीसह साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह,एनएचएआय चे मुख्य महाप्रबंधक व क्षेत्रीय अधिकारी अंशुमली श्रीवास्तव,महाप्रबंधक मधुकर वाठोरे,प्रकल्प संचालक वसंत पंधरकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या महत्वपूर्ण अश्या बैठकीत सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण वर चर्चा होऊन या भागातील सर्व लोकप्रतिनिधीच्या कडून सूचना घेण्यात आल्या. या सर्व सूचनांचा विचार करून महामार्गाचा आराखडा बनविला जाणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. कराड शहरातून जो राष्ट्रीय महामार्ग जातो या महामार्गावरील कोल्हापूर नाका येथे शहराच्या प्रवेशावर आजपर्यंत अनेकदा अपघात झाले आहेत. तसेच वाहतूक कोंडी नित्याचीच असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील काही वर्षांपासून या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या सोबत मिटिंग सहित महामार्गाच्या व संबंधित विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका वारंवार घेतल्या होत्या. काल सुद्धा कोल्हापूर येथील बैठकीत आ. चव्हाण यांनी कराडच्या उड्डाणं पुलाबाबत व येथून जाणाऱ्या महामार्गाबाबत अधिकाऱ्याकडून माहिती समजून घेऊन त्यांना आवश्यक अश्या सूचना केल्या ज्या या महामार्ग उभारणीसाठी उपयुक्त असतील.

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कराड शहराचा प्रवेश हा राष्ट्रीय महामार्गावर आहे यामुळे इथे उड्डाणंपूल होणे गरजेचेच असल्याने या संबंधी वेळोवेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या याला आज काही प्रमाणात मूर्त स्वरूप येत आहे. नुकताच नितीन गडकरी यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची आज तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या सोबत झालेली बैठक ही महत्वपूर्ण आहे. कराड मध्ये कोयना नदीवरील पूल हा 10 लेन चा होणार असून शहरावरून जाणारा उड्डाणपूल हा पंकज हॉटेल च्या समोरून जाईल ते मलकापूर येथील डी मार्ट पर्यंत असणार आहे. हा जवळपास 2.5 किमी चा पूल असून तो 6 लेन चा असूणार आहे आणि या संपूर्ण पुलाची रचना सिंगल पिलर सिस्टीम ची असणार आहे. या पुलाखालील सेवा रस्ता हा 4 लेन चा होईल व त्याच्या बाजूला गटर व फुटपाथ रेलिंग सह होणार आहे. हा कराड शहरासाठी अत्यंत उपयुक्त असा पूल असून वाहतूक सेवा सुरळीत राहण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती कोल्हापूर येथील बैठकीत मिळाली.

नांदलापूर फाटा येथे पावसाचे पाणी ओढ्यामार्गे येऊन पाणी रस्त्यावर येत असते या ठिकाणी नाले हे भुयारी मार्गाचे करून ओढ्याचा मूळ प्रवाह मार्गी लावला तरच येथील पूरप्रश्न मार्गी लागेल यासाठी लवकरच संबंधित विभाग व एनएचएआय च्या अधिकाऱ्यांची फिल्ड व्हिझीट घेऊन आढावा घेतला जाईल असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Sunday, October 24, 2021

कराड रोटरी क्लबच्या वतीने पोलिओ जनजागृती ; फोर व्हीलर रॅलीचे आयोजन

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील रोटरी क्लब ऑफ कराड, इनरव्हील क्लब ऑफ कराड, तसेच संगम व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 रोजी पोलिओ दिनाचे औचित्य साधून शहरामध्ये पोलिओ फोर व्हीलर रॅली काढण्यात आली.  रॅलीचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील कराड शहर वाहतूक निरीक्षक सौ सरोजनी पाटील पालिकेचे सभापती विजय वाटेगावकर  लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ  पाटील  तसेच जयंत बेडेकर हनुमंतराव पवार यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. 
 
 स्वर्गीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथून सकाळी साडेनऊ वाजता या रॅलीला सुरुवात झाली. विजय दिवस चौक, दत्त चौक मार्गे भेदा चौक ते शाहू चौक मार्गे पुन्हा दत्त चौक ते आझाद चौक, चावडी चौक, कन्याशाळा मार्गे पुन्हा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये येऊन रॅलीची सांगता झाली सदर रॅली मास्क व सोशल डिस्टंसिंग चे नियम पालन करून काढण्यात आली यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे,सचिव रो. अभय पवार,क्लबचे प्रोजेक्ट डायरेक्टर रो. डॉ. शेखर कोगणुळकर,  पब्लिक इमेज डायरेक्टर रो. राजेश खराटे,  रो डॉक्टर राहुल फासे, रो. डॉ. मनोज जोशी, रो. राजेंद्र कुंडले, रो. राकेश पोरवाल, रो. शशांक पालकर, रो. रघुनाथ डुबल , रो. राजीव खलीपे, जगदीश वाघ, राहुल पुरोहित, अनघा बर्डे, प्रविण परमार, अजय भट्टड, बद्रीनाथ मस्के, चंद्रशेखर पाटील, अभिजीत चाफेकर, मुकुंद कदम, किरण जाधव, आनंदराव थोरात आदी सदस्य उपस्थित होते. 
इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षा सौ मंजुषा इंगळे,  इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या अध्यक्षा सौ. माहेश्वरी जाधव ,रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीचे अध्यक्ष अमित भोसले यासहित सर्व संस्थांचे पदाधिकारी व सदस्य  या रॅलीमध्ये उपस्थित होते. 

रोटरी क्लब ऑफ कराड चे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे यांनी सर्वांचे स्वागत केले व डॉक्टर राहुल फासे यांनी पोलिओ दिनाची माहिती दिली सूत्रसंचालन रो. किरण जाधव यांनी केले व आभार क्लब सेक्रेटरी अभय पवार यांनी मानले.

आज सातारा जिल्ह्यात 58 बाधीत ; 13 जण डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 58 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 2 कराड 9 खंडाळा 1 खटाव 3 कोरेगांव 2  माण 6 महाबळेश्वर 1 पाटण 0 फलटण 4 सातारा 23 वाई 5 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 2 असे  आज अखेर एकूण 58 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 13 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Saturday, October 23, 2021

66 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 68 जणांना आज दिला डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 66 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 68 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 8 खंडाळा 3 खटाव 13 कोरेगांव 0  माण 10 महाबळेश्वर 1 पाटण 0 फलटण 12 सातारा 16 वाई 0 व इतर 3  असे  आज अखेर एकूण 66 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 68 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Friday, October 22, 2021

इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले संकेत...

वेध माझा ऑनलाइन
शाळा, महाविद्यालयानंतर आता प्राथमिक शाळाही लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. राज्यातील इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असून पुन्हा शाळा सुरू करण्यावर जोर आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोव्हीड टास्क फोर्स सोबत चर्चा करून लवकरच पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णयाची शक्यता आहे.
आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जवळपास सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करत असताना जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेण्यासाठी ऑनलाइन बैठक घेऊन चर्चा केली. 

 शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

ह्या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा, त्याअनुषंगाने तयारी, लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला. 
या बैठकीत जवळपास सगळ्याच जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला.
मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने 'आदर्श शाळा' हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले.
शाळांच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात मराठवाडा विभागातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी केली. हा सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

अजितदादांकडून दिवाळी गिफ्ट ; दिवाळी पहाट कार्यक्रमाला दिली परवानगी...


वेध माझा ऑनलाइन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणेकरांना दिवाळीआधी मोठं गिफ्ट दिलं आहे. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पुणेकरांसाठी महत्वाची घोषणा केली. पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दिवाळीनंतर थिएटर्स 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचं पवार यांनी सांगितलं.

त्यांनी सांगितलं की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल भविष्यात मेट्रोचे काम झाल्यानंतर वाहतूक कोंडी होउ नये यासाठी पाडला.  अनेक तंत्रांचा वापर करण्यात आलाय.  हे खरे आहे की नवीन काम करण्याची जबाबदारी असलेल्या टाटा कंपनीला काही अडचणी येतायत. पण दिवाळीनंतर हे  काम सुरु करण्यात येईल, असंही ते म्हणाले.  पुण्यातील जंबो कोविड सेंटर कायम ठेवायचे की काढून टाकायचे याचा निर्णय दिवाळीनंतर घेऊ, असंही ते म्हणाले. 

जरंडेशवर कारखान्यावरून होणाऱ्या टिकेवरून अजितदादांचा हल्लाबोल...
जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना कालच इशारा दिला होता. राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकमेव कारखाना नाही. कोणते कारखाने कोणी कितीला विकत घेतले याची माहिती आपण पत्रकार परिषद घेऊन देऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आपल्या नातेवाईकांची बदनामी केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. तर काहींकडून मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध गरळ ओकली जातेय. मी बेईमान आहे की काय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी बेईमानी कधी केली नाही, ते आमच्या रक्तात नाही, अशा शब्दात अजित पवारांनी इशारा काल दिला होता.

आज सातारा जिल्ह्यात 51 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 97 जणांना दिला आज डिस्चार्ज

 सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 51 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 97 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 7खंडाळा 1 खटाव 5 कोरेगांव 3  माण 4 महाबळेश्वर 2 पाटण 0 फलटण 12 सातारा 10 वाई 2 व इतर 2 व नंतरचे वाढीव 3 असे  आज अखेर एकूण 51 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 97 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Thursday, October 21, 2021

वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्यानी मतदार यादीत नाव नोंदवावे...उपजिल्हा निवडणूक अधिकारी

सातारा, दि.21 (जिमाका) :   भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. तरी 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या सर्व नागरिकांनी आपल्या नावाची मतदार यादीमध्ये नोंद करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांनी केले आहे 

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमूना नं.6 फॉर्म भरावा. यासाठी लागणारी कागदपत्रे वयाचा दाखला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, 10 वीचे मार्कलिस्ट, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड यापैकी एक. रहिवाशी दाखला रेशनकार्ड, भाडे करारनामा (3 वर्षे), पाणी बील, लाईट बील, टेलिफोन बील यापैकी एक. तसेच 3 आयकार्ड साईज कलर फोटो
मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमूना नं 7 चा फार्म भरावा. यासाठी लागणारे कागदपत्र  मयत असल्यास मृत्युचा उतारा, विवाह झाल्याने नाव कमी करावयाचे असल्यास लग्नपत्रिका/विवाह नोंदणी प्रमाणपत्र, स्थलांतरित झाले असल्यास पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक, रेशनकार्ड, भाडे करारनामा (3 वर्षे), पाणी बील, लाईट बील, टेलिफोन बील.
मतदार यादीतील दुरुस्तीसाठी नमुना नं.8 चा फॉर्म भरावा. यासाठी लागणारे कागदपत्र ज्या गोष्टी दुरुस्त करावयाच्या आहेत त्या संबंधित पुरावा. वयाचा पुरावा यासाठी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड यापैकी एक. रहिवाशी दाखला पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक/पोस्ट पासबुक, नॅशनल बँक, रेशनकार्ड, भाडे करारनामा (3 वर्षे), पाणी बील, लाईट बील, टेलिफोन बील यापैकी एक.
मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना नं.8-अ चा फॉर्म भरावा. यासाठी लागणारे कागदपत्रे रहिवाशी पुरावा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक/पोस्ट पासबुक, नॅशनल बँक, रेशनकार्ड, भाडे करारनामा (3 वर्षे), पाणी बील, लाईट बील, टेलिफोन बील, गॅस कनेक्शन बील.
मतदार नाव नोंदणी करण्यासाठी नमुना नं.6 चे फॉर्म तसेच नमुना नं.7,8 व 8-अ चे फॉर्म भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावेत. तसेच ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी NVS App किंवा Voters Helpline App डाऊनलोड करुन या ॲपचा मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी करावा, असेही आवाहनही उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांनी केले आहे.
0000

आज सातारा जिल्ह्यात 51 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 185 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि.  (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 51 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 185 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या पुढील प्रमाणे...
जावली 2 कराड 8 खंडाळा 1 खटाव 2 कोरेगांव 4  माण 4 महाबळेश्वर 4 पाटण 1 फलटण 6 सातारा 11 वाई 1 व इतर 1 व नंतरचे वाढीव 6 असे  आज अखेर एकूण 51 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 185 जणांना आज संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात आले आहे.

Wednesday, October 20, 2021

आज सातारा जिल्ह्यात 72 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 20 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि.  (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 72 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या पुढील प्रमाणे आहे...

जावली 4 कराड 7 खंडाळा 2 खटाव 9 कोरेगांव3  माण6 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 9 सातारा 18 वाई 3 व इतर 2 व नंतरचे वाढीव 9 असे  आज अखेर एकूण 72 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्याना आज  संध्याकाळपर्यंत 20 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता ; जिल्हाधिकारी

सातारा दि.20 (जिमाका):   कोविड-19 चे अनुषंगाने राज्य शासनाच्या   मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्हयातील चित्रपटगृहे 22 ऑक्टोंबर 2021 पासून परवानगी  दिली आहे.  

मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे
                                     
१.१. कोविड-१९ च्या प्रसारास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने, चित्रपटगृहांमध्ये सादरीकरणाच्या दरम्यान निश्चितपणे अंमलात आणावयाच्या विनिर्दिष्ट उपाययोजनांबरोबरच, अंगीकारावयाच्या विविध सर्वसामान्य सावधगिरीच्या उपाययोजनांबाबतची प्रमाणित कार्यचालन कार्यपद्धती, या दस्तऐवजामध्ये नमूद केलेली आहे. 
१.२ प्रतिबंधित क्षेत्रात चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याकरिता परवानगी दिली जाणार नाही. 
१.३ महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांनुसार चित्रपटगृहांचे नियमन केले जाईल. 
१.४ स्थानिक कोविड-१९ साथरोग परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी संबंधित. शासकीय यंत्रणांशी विचारविनिमय करुन उपरोक्त निर्बंधामध्ये वाढ करु शकतील. 
२. चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याबाबतची प्रमाणित कार्यचालन कार्यपद्धती 
क) चित्रपटगृह / रंगभूमीची परिवास्तू (देखाव्यांसहित) 
१. सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार, प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. 
२. नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्याची परवानगी देण्यात येईल. 
   ३. चित्रपटगृहातील कर्मचारीवृंद यांनी नियमितपणे त्यांची स्वत:ची वैद्यकीय तपासणी करुन घेणे बंधनकारक राहील.
   ४. चित्रपटगृहांच्या सर्व कक्षांची दररोज धूम्र फवारणी करणे बंधनकारक राहील.
   ५. देखावे, प्रसाधनगृहे आणि रंगभूषा कक्ष यांच्या नियमित स्वच्छतेबाबत वेळापत्रक आखावे, स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता 
       केल्याची खातरजमा करावी. 
  ६. मुखपट्ट्या आणि मुख संरक्षक कवच (फेस शिल्ड) लावणे बंधनकारक आहे, आणि चित्रपटगृहातील कर्मचारीवृंदाला हात स्वच्छ 
        करण्यासाठी निर्जंतुक द्रव उपलब्ध करून द्यावे. कोणत्याही अतिथींना-मग ते कोणीही असोत- कलाकारांच्या कक्षांमध्ये जाण्यास 
        अजिबात परवानगी दिली जाणार नाही.
   ७. ज्या कोणाकडून, जी साधने (संगीत व्यवस्था / लॅपटॉप / माइक / प्रकाश योजना इत्यादी) हाताळली जातील त्यांनीच ती वापरावीत, 
         याबाबत दक्षता घेण्यात यावी. 
   ८. चित्रपटगृहांची नियमितपणे स्वच्छता/ निर्जंतुकीकरण/ धूम्र फवारणी, इत्यादी करण्यासाठी, सर्व चित्रपटगृह व्यवस्थापनांनी 
         उपाययोजना करणे बंधनकारक आहे. 
 2.1 सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे 
सर्वसामान्य उपाययोजना यामध्ये, कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका कमी व्हावा याकरिता अनुसरावयाच्या सार्वजनिक 
 आरोग्यविषयक उपाययोजनांचा समावेश होतो. या उपाययोजनांचे सर्वांनी (कर्मचारी तसेच भेटी देणारे) नेहमीच पालन करणे 
आवश्यक आहे. या उपाययोजनांमध्ये पुढील बाबींचा अंतर्भाव आहे: 
1. चित्रपटगृहाबाहेर, सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये नेहमी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे. 
2. नेहमी तोंडाला मुखपट्टी (मास्क) बांधणे /कपड्याने तोंड झाकणे (मुखावरण लावणे) अनिवार्य आहे. 
3. परिवास्तुच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गांवर तसेच सामाईक क्षेत्रांमध्ये, हात स्वच्छ करण्यासाठी, प्राधान्याने हाताचा-स्पर्शरहित       
पद्धतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव उपलब्ध ठेवावे. 
 4. श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना/ शिंकताना प्रत्येकाने स्वतःचे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यू पेपर)/ हात रुमालाने /कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यू पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. 
5. सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची स्वत:च देखरेख करावी आणि कोणत्याही आजाराबाबत तात्काळ राज्य व जिल्हा मदत क्रमांकावर (हेल्पलाईन) कळवावे. 
6. थुकण्यास सक्त मनाई असेल. 
7. आरोग्य सेतू उपयोजन (अॅप) सुसंगत साधनांवर स्थापित (installed) करून ते दिवसभर सुरू ठेवावयाचे आहे. 
8. चित्रपटगृहातील सर्व कर्मचारी वर्ग, फूडकोर्ट, स्वच्छता कर्मचारी इत्यादीसह सर्वांचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे.) तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. 

      2.2 प्रवेश व निर्गम द्वारे 
अ. प्रवेश द्वारांवर कर्मचाऱ्यांची/भेटी देणाऱ्यांची तापमान तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच केवळ परिवास्तूत  
    प्रवेश करण्याची मुभा देण्यात येईल. 
आ. सर्व प्रवेश द्वारांवर आणि कार्यक्षेत्रांमध्ये हात निर्जंतुक करण्याची सोय उपलब्ध करण्यात यावी.
इ. प्रेक्षागाराच्या आणि परिवास्तूच्या प्रवेशाच्या आणि निर्गमनाच्या ठिकाणी प्रेक्षकांकरिता रांगेसाठी आखीव खुणा करण्यात येतील. 
          ई. गर्दी होऊ नये म्हणून, लोकांना, एकमेकांमध्ये अंतर ठेवून रांगेने बाहेर सोडण्यात यावे. 
          उ. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये विविध पडद्यांवर तसेच एकल पडद्यावर लागोपाठच्या प्रदर्शनांच्यामध्ये पुरेसा कालावधी ठेवण्यात येईल, 
             जेणेकरून प्रेक्षक रांगेतून, एकमेकांमध्ये अंतर ठेवून आत जाण्याची व बाहेर पडण्याची सुनिश्चिती करता येईल. 
         ऊ. गर्दी टाळण्यासाठी एकापेक्षा अधिक प्रवेश व निर्गम द्वारे वापरण्यात यावीत. 
2.3 आसन व्यवस्था 
अ. चित्रपटगृहांचा वापर त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्यात येणार नाही. 
आ.चित्रपटगृहांच्या प्रेक्षागारामधील आसन व्यवस्था ही, पर्याप्त सुरक्षित अंतर राखले जाईल अशा प्रकारे केली असली पाहिजे. जोडपत्र
 एक मध्ये आदर्श आसन व्यवस्थेचा नमुना दिलेला आहे. 
इ. तिकीट आरक्षणाच्या वेळी (ऑनलाईन आरक्षणाच्या, आणि तिकीट खिडकीवरील तिकिटांच्या विक्रीच्या, अशा दोन्ही वेळी), जी आसने   वापरावयाची नसतील त्यांवर "आसनांचा वापर करू नये" अशी स्पष्ट खूण करण्यात येईल. 
टीप:- चित्रपटगृहांमध्ये "आसनांचा वापर करू नये" अशी खूण केलेल्या आसनांचा लोकांनी वापर करू नये म्हणून, त्यांवर एकतर फित लावण्यात येईल किंवा फ्लोरोसेंट मार्करने खूण करण्यात येईल, जेणेकरून नेहमीच पर्याप्त सुरक्षित अंतराची सुनिश्चिती होईल. 
2.4 सुरक्षित अंतराबाबतची मानके 
अ. वाहनतळ परिसरातील आणि परिवास्तूच्या बाहेरील गर्दीचे योग्य व्यवस्थापन करताना, सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे   यथायोग्यपणे पालन केले जात असल्याची सुनिश्चिती करण्यात येईल. 
आ. उद्वाहनांमध्ये सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे यथायोग्यपणे पालन करून, लोकांची संख्या मर्यादित ठेवण्यात येईल. 
                  इ. मध्यंतरामध्ये सामाईक जागा, व-हांडे (लॉबी) आणि प्रसाधनगृहे या ठिकाणी गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. प्रेक्षकांना मध्यंतरामध्ये ये-जा करणे टाळावे याकरिता, त्यांना प्रोत्साहित करण्यात यावे. प्रेक्षागारातील वेगवेगळ्या रांगांमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना एकमेकांमध्ये अंतर राखून ये-जा करता यावी याकरिता दीर्घकाळाचे मध्यंतर ठेवता येईल. 
2.5 चित्रपट प्रसारण वेळेबाबत.
अ.गर्दी टाळणेच्या अनुषंगाने चित्रपटगृहाच्या बाहेर स्क्रीन लावून चित्रपट प्रसारण वेळेबाबत सूचना वेळोवेळी प्रसारित कराव्यात.
आ. मल्टीप्लेक्स थेटरमध्ये चित्रपट प्रसारणाची वेळ, मध्यांतर, चित्रपट संपण्याची वेळा या एकसमान न ठेवता त्यामध्ये किमान वेळेचे अंतर ठेवावे जेणेकरुन गर्दी टाळता येणे शक्य होईल. 
            2.6 तिकीट आरक्षण व रक्कम भरणा पद्धती 
                   अ. तिकिटे देणे/त्यांची पडताळणी करणे/त्यांची रक्कम भरणे यांकरिता तसेच, खाद्य पदार्थ व पेये यांकरिता ऑनलाइन आरक्षण, इ वॉलेट, क्यूआर कोड स्कॅनर, इत्यादींसारख्या डिजिटल, संपर्करहित व्यवहारांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे.
                  आ. संपर्काचा (व्यवतीचा) शोध घेणे सुकर व्हावे म्हणून, तिकीट आरक्षण करतेवेळी संपर्क क्रमांक नोंदवून घेण्यात येईल.     
इ. तिकीट कार्यालयात (बॉक्स ऑफिस)) तिकीट खरेदी दिवसभरासाठी सुरू ठेवण्यात येईल, तसेच तिकीट विक्री खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकीट आरक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. 
ई. प्रत्यक्षात खिडकीवर तिकीट काढतेवेळी गर्दीला आळा घालण्यासाठी, पर्याप्त सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे पालन करून,तिकीट कार्यालयात पुरेशा प्रमाणात खिडक्यांची व्यवस्था करण्यात येईल. 
उ. तिकीट कार्यालयात रांगेचे व्यवस्थापन करताना, सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टीने, जमिनीवर खुणा (फ्लोअर मार्कर्स) करण्यात येतील.    
          2.7 परिवास्तुचे निर्जंतुकीकरण करणे. 
अ. संपूर्ण परिवास्तू, सामाईक सुविधा यांचे तसेच लोकांकडून सामाईकपणे हाताळल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी, जसे की, दांडे (handles), कठडे (railing) इत्यादींचे वारंवार निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करण्यात येईल. 
आ. प्रत्येक चित्रपट प्रयोगानंतर प्रेक्षागाराचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. 
इ. तिकीट कार्यालय, खाद्य-पेयपदार्थ विक्री स्थळे, कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक चीजवस्तूंचे खण, स्वच्छतागृहे, सार्वजनिक जागा आणि अंतर्गत कामकाज पाहणारे कार्यालय (back office) क्षेत्रे यांची नियमित स्वच्छता व निर्जतुकीकरण केल्याची खात्री करण्यात येईल. 
ई. निर्जंतुकीकरण करणा-या कर्मचारीवर्गाच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजण्यात येतील, जसे की, हातमोजे, बूट, मुखपट्टया, व्यक्तिगत संरक्षक साधने पीपीई) इत्यादींच्या संयुक्तिक वापरासाठी पर्याप्त तरतुदी करण्यात येतील. 
उ. कोणतीही व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास, परिवास्तुचे निर्जंतुकीकरण हाती घेण्यात येईल. 
      2.8 कर्मचाऱ्यांशी संबंधित उपाययोजना 
अ. कामाच्या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मुखावरण (फेस कव्हर) लावणे बंधनकारक असून अशा मुखावरणाचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा. 
                 आ. वयस्कर कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी व वैद्यकीय उपचाराधीन कर्मचारी अशा, अधिक जोखीम असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी जास्त खबरदारी घ्यावी, अशा कर्मचाऱ्यांना लोकांशी थेट संपर्क आवश्यक असणारी व लोकांसमोर जावे लागणारी कामे विशेष करून देण्यात येऊ नयेत. 
                 इ.कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सजग राहण्याचा भाग म्हणून, सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये (मोबाईल) आरोग्य सेतू अॅप स्थापित करून अद्ययावत केले असल्याची नियोक्त्यांनी खात्री केली पाहिजे. 
                 ई. सर्व कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्या आरोग्याची स्वत:च देखरेख केली जात असल्याची आणि कोणताही आजार झाल्यास त्याबाबत तात्काळ कळवले जाण्याची खात्री करण्यात येईल. 
      2.9 जनजागृती 
            अ.प्रमुख प्रवेश द्वारे, ऑनलाईन, डिजिटल तिकीट विक्री ठिकाणे, तसेच प्रसाधनगृहे वरांडे (लॉबी), यांसारखी सार्वजनिक ठिकाणे येथे काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या सूचना लावण्यात येतील. 
           आ.परिवास्तूच्या आत आणि बाहेर मुखपट्टी लावणे, सुरक्षित अंतर राखणे व हातांची स्वच्छता राखणे यांबाबतच्या लोकोपयोगी घोषणा तसेच घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजना यासंबंधातील विनिर्दिष्ट घोषणा ह्या, चित्रपट प्रयोगापूर्वी, मध्यंतरामध्ये आणि चित्रपट प्रयोगाच्या शेवटी करण्यात येतील. 
         इ. वरील ठिकाणांच्या बाहेरील बाजूस व आतील बाजूस ठळकपणे, कोविड-१९ च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरील भित्तीपत्रके/ उभे फलक/ ध्वनीफित वाजविण्यासाठी तरतुदी केल्या गेल्याच पाहिजेत. 
            ई. कोविड-१९ संदर्भातील जनजागृतीकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग / संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमे संदर्भातील ध्वनीफित प्रयोगापूर्वी व मध्यतरांत वाजविणे बंधनकारक आहे. 
        2.10 वातानुकूलन/शीतन व्यवस्था 
वातानुकूलनासाठी/ वायुवीजनासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करण्यात येईल, ज्यांमध्ये इतर गोष्टींबरोबरच, पुढील बार्बीवर भर दिलेला आहे: 
क. सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. 
ख. सापेक्ष आर्द्रता ही ४० ते ७० टक्क्यांच्या मर्यादेत असली पाहिजे. 
ग. शक्य होईल तितक्या प्रमाणात, हवेचे पुनर्चक्रण टाळण्यात यावे. 
घ. शक्य होईल तेवढी, ताजी हवा मिळण्याची व्यवस्था असली पाहिजे. 
ड. समोरासमोरील वायुवीजन हे, पुरेशा प्रमाणात असले पाहिजे. 
     2.11 दृश्य लक्षणांबाबत कार्यवाही 
कोविड-१९ च्या संबंधातील लक्षणे किंवा बेफिकिर वर्तन यांबाबत प्रेक्षागार व्यवस्थापकाच्या/ व्यवस्थापकांच्या आणि स्थानिक प्राधिका-यांच्या समन्वयाने काटेकोरपणे कार्यवाही करण्यात येईल. 
2.12 खाद्य-पेय पदार्थांचे क्षेत्र 
अ. खाद्यपदार्थ मागविण्यासाठी, शक्य तितका, चित्रपटगृह आयोजक (थिएटर अॅप)/ शीघ्र प्रतिसाद संकेतांक (क्यू.आर, कोड) 
इत्यादींचा वापर करण्यास ग्राहकांना प्रोत्साहन देण्यात येईल. 
आ. खाद्य व पेय पदार्थांच्या क्षेत्रामध्ये, शक्य असेल तेथे तेथे, अनेक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात यावीत. 
 इ. प्रत्येक विक्री केंद्रावर सुरक्षित अंतर राखण्यासाठी, जमिनीवर चिकट-पट्ट्या (स्टिकर) वापरून एक- रांग पद्धतीचा अवलंब   
 करावयाचा आहे. 
ई. केवळ आवेष्टित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल.8
उ. सभागृहाच्या/प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थांची व पेय पदार्थाची पोचवणी करण्यास मनाई असेल. 
ऊ. खाद्यपदार्थांच्या व पेय पदार्थांच्या क्षेत्रात सुरक्षित अंतराचे पालन होत असल्याची व गर्दीला आळा घातला जात असल्याची   खातरजमा 
व्यवस्थापनाकडून करण्यात येईल. 
ए. खाद्यपदार्थांच्या व पेय पदार्थांच्या कचऱ्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जात असल्याबाबत परिवास्तूच्या व्यवस्थापनाकडून  खातरजमा करण्यात येईल.
२. कोविड-१९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निदेश तसेच गृह कार्य मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन इत्यादींनी जारी केलेली संबंधित मार्गदर्शक तत्त्वे यांचे सर्व कार्यामध्ये व व्यवहारांमध्ये काटेकोरपणे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक आहे. 
 आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन केलेस संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005  व  साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये   कठोर कारवाई करणेत येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.
00000

नियंत्रित स्वरुपात नाट्यगृहे सुरु करण्यास मान्यता

सातारा दि.20 (जिमाका):   कोविड-19 चे अनुषंगाने राज्य शासनाच्या   मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्हयातील नियंत्रित स्वरुपात नाट्यगृहे 22 ऑक्टोंबर 2021 पासून परवानगी  दिली आहे.  

 मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे...:
                                          
१.१. कोविड-१९ च्या प्रसारास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने, नाट्यगृहांमध्ये नाटक सादरीकरणाच्या दरम्यान निश्चितपणे अंमलात आणावयाच्या विनिर्दिष्ट उपाययोजनांबरोबरच, अंगीकारावयाच्या विविध सर्वसामान्य सावधगिरीच्या उपाययोजनांबाबतची प्रमाणित कार्यचालन कार्यपद्धती, या दस्तऐवजामध्ये नमूद केलेली आहे. 
१.२ प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह पुन्हा सुरू करण्याकरिता परवानगी दिली जाणार नाही. 
१.३ महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाट्यगृहांचे नियमन केले जाईल. 
१.४ स्थानिक कोविड-१९ साथरोग परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी संबंधित . शासकीय यंत्रणांशी विचारविनिमय करुन उपरोक्त निर्बंधामध्ये वाढ करु शकतील. 

२. नाट्यगृहे पुन्हा सुरू करण्याबाबतची प्रमाणित कार्यचालन कार्यपद्धती 
क) नाट्यगृह / रंगभूमीची परिवास्तू (देखाव्यांसहित) 
१. सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार, प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. 
२. नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्याची परवानगी देण्यात येईल. 
   ३. नाट्य कलाकारगण आणि कर्मचारीवृंद यांनी नियमितपणे त्यांची स्वत:ची वैद्यकीय तपासणी करुन घेणे बंधनकारक राहील.
   ४. सर्व देखाव्यांची व कलाकारांसाठी असलेल्या कक्षांची दररोज धूम्र फवारणी करणे बंधनकारक राहील.
   ५. देखावे, प्रसाधनगृहे आणि रंगभूषा कक्ष यांच्या नियमित स्वच्छतेबाबत वेळापत्रक आखावे, स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता 
       केल्याची खातरजमा करावी. 
    ६. मुखपट्ट्या आणि मुख संरक्षक कवच (फेस शिल्ड) लावणे बंधनकारक आहे, आणि नाटय कर्मचारीवृंदाला हात स्वच्छ करण्यासाठी   
         निर्जंतुक द्रव उपलब्ध करून द्यावे. कोणत्याही अतिथींना-मग ते कोणीही असोत- कलाकारांच्या कक्षांमध्ये जाण्यास अजिबात 
         परवानगी दिली जाणार नाही.
    ७. ज्या कोणाकडून, जी साधने (संगीत व्यवस्था / लॅपटॉप / माइक / प्रकाश योजना इत्यादी) हाताळली जातील त्यांनीच ती वापरावीत, 
         याबाबत दक्षता घेण्यात यावी. 
    ८. नाट्यगृहांची नियमितपणे स्वच्छता/ निर्जंतुकीकरण/ धूम्र फवारणी, इत्यादी करण्यासाठी, सर्व नाट्यगृह व्यवस्थापनांनी उपाययोजना 
          करणे बंधनकारक आहे. 
ख) कलाकारांचे व्यवस्थापन 
      १. कोणत्याही अतिथीस, नाटकाच्या प्रयोगापूर्वी किंवा प्रयोगानंतर कलाकाराला किंवा इतर नाट्य कर्मचारी वर्गाला               रंगमंचावर / कलाकारांच्या कक्षांमध्ये जाऊन भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही.
      २. रंगभूषाकाराने सत्रापूर्वी आणि सत्रानंतर त्याचे हात साबणाने / निर्जंतुक द्रवाने (Sanitizer) धुतले पाहिजेत. 
      ३. रंगभूषेच्या रंगाचे मिश्रण, वापरल्यानंतर फेकून देता येण्याजोग्या रंगपाटीवर करावे आणि शक्यतो, प्रत्येक अभिनेत्यासाठी केवळ एका ब्रशचा , रंग लावण्याच्या साधनाचा वापर करावा. शक्यतो प्रत्येक अभिनेत्यासाठी, ब्रश/ कंगवे वेगळे राखून ठेवावेत, जेणेकरून एकमेकांचे ब्रश /कंगवे दूषित होणार नाहीत. 
             ४. केसांचे ब्रश व कंगवे आणि पुन्हा वापरता येण्याजोगे रंगभूषेचे ब्रश योग्य निर्जंतुक द्रावणाने स्वच्छ करण्यात यावेत.
 ५. अभिनेत्याने (अभिनेत्यांनी) त्याची स्वतःची रंगभूषा / केशभूषा स्वतःच करून येण्याबाबत विचार केला जावा.
                 ६. व्यक्ती-व्यक्तींच्या संपर्काच्या दरम्यान केशभूषा व रंगभूषा करताना, व्यक्तिगत संरक्षक साधने (पीपीई) व अशी सूचना देण्यात 
                     येत आहे. 
                 ७. रंगभूषाकार किंवा केशभूषाकार यांनी मुख संरक्षक कवच (face-shields) लावावे. 
  ८. रंगभूषा कक्ष किमान ६ फूट दूर असला पाहिजे.
                 ९. वापरल्यानंतर फेकून देता येण्याजोग्या रंगभूषा संचाचा आणि ब्रशचा वापर करण्याची आणि प्रत्येक वापरानंतर त्या संचाची 
     विल्हेवाट लावण्याची सूचना देण्यात येत आहे. 
  १०. प्रत्येक वापरापूर्वी आणि वापरानंतर सर्व ध्वनी व प्रकाश योजनेच्या सामग्रीचे निर्जतुकीकरण करावे.
  ११.सर्व कलाकारांनी स्वतःच्या आरोग्याची स्वत:च देखरेख करावी आणि कोणत्याही आजाराबाबत तात्काळ राज्य व जिल्हा मदत 
        क्रमांकांवर (हेल्पलाईन ) कळवावे. 



भाग २ 
                                             
सर्वसामान्य उपाययोजना यामध्ये, कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका कमी व्हावा याकरिता अनुसरावयाच्या सार्वजनिक 
 आरोग्यविषयक उपाययोजनांचा समावेश होतो. या उपाययोजनांचे सर्वांनी (कर्मचारी तसेच भेटी देणारे) नेहमीच पालन करणे 
आवश्यक आहे. या उपाययोजनांमध्ये पुढील बाबींचा अंतर्भाव आहे: 
1. प्रेक्षागाराबाहेर, सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये नेहमी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे. 
2. नेहमी तोंडाला मुखपट्टी(मास्क) बांधणे /कपड्याने तोंड झाकणे (मुखावरण लावणे) अनिवार्य आहे. 
3. परिवास्तुच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गांवर तसेच सामाईक क्षेत्रांमध्ये, हात स्वच्छ करण्यासाठी, प्राधान्याने हाताचा-स्पर्शरहित       
पद्धतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव उपलब्ध ठेवावे. 
 4. श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना/ शिंकताना प्रत्येकाने स्वतःचे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यू पेपर) / हात रुमालाने /कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यू पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. 
5. सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची स्वत:च देखरेख करावी आणि कोणत्याही आजाराबाबत तात्काळ राज्य व जिल्हा मदत क्रमांकांवर (हेल्पलाईन) कळवावे. 
6. थुकण्यास सक्त मनाई असेल. 
7. आरोग्य सेतू उपयोजन (अॅप) सुसंगत साधनांवर स्थापित (installed) करून ते दिवसभर सुरू ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार / कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण ( दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.)  बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. 
          १.१ प्रवेश व निर्गम द्वारे 
अ. प्रवेश द्वारांवर कर्मचाऱ्यांची/भेटी देणाऱ्यांची तापमान तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच केवळ परिवास्तूत  
    प्रवेश  करण्याची मुभा देण्यात येईल. 
आ. सर्व प्रवेश द्वारांवर आणि कार्यक्षेत्रांमध्ये हात निर्जंतुक करण्याची सोय उपलब्ध करण्यात यावी.
इ. प्रेक्षागाराच्या आणि परिवास्तूच्या प्रवेशाच्या आणि निर्गमनाच्या ठिकाणी प्रेक्षकांकरिता रांगेसाठी आखीव खुणा करण्यात येतील. 
          ई. गर्दी होऊ नये म्हणून, लोकांना, एकमेकांमध्ये अंतर ठेवून रांगेने बाहेर सोडण्यात यावे. 
          उ. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये विविध पडद्यांवर तसेच एकल पडद्यावर लागोपाठच्या प्रदर्शनांच्यामध्ये पुरेसा कालावधी ठेवण्यात येईल, 
             जेणेकरून प्रेक्षक रांगेतून, एकमेकांमध्ये अंतर ठेवून आत जाण्याची व बाहेर पडण्याची सुनिश्चिती करता येईल. 
         ऊ. गर्दी टाळण्यासाठी एकापेक्षा अधिक प्रवेश व निर्गम द्वारे वापरण्यात यावीत. 
१.२ आसन व्यवस्था 
अ. नाट्यगृहांचा वापर त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्यात येणार नाही. 
आ.नाट्यगृहांच्या प्रेक्षागारामधील आसन व्यवस्था ही, पर्याप्त सुरक्षित अंतर राखले जाईल अशा प्रकारे केली असली पाहिजे. जोडपत्र
 एक मध्ये आदर्श आसन व्यवस्थेचा नमुना दिलेला आहे. 
इ. तिकीट आरक्षणाच्या वेळी ( ऑनलाईन आरक्षणाच्या, आणि तिकीट खिडकीवरील तिकिटांच्या विक्रीच्या, अशा दोन्ही वेळी), जी आसने   वापरावयाची नसतील त्यांवर "आसनांचा वापर करू नये" अशी स्पष्ट खूण करण्यात येईल. 
टीप:- नाट्यगृहांमध्ये "आसनांचा वापर करू नये" अशी खूण केलेल्या आसनांचा लोकांनी वापर करू नये म्हणून, त्यांवर एकतर फित लावण्यात येईल किंवा फ्लोरोसेंट मार्करने खूण करण्यात येईल, जेणेकरून नेहमीच पर्याप्त सुरक्षित अंतराची सुनिश्चिती होईल. 
१.३. सुरक्षित अंतराबाबतची मानके 
अ. वाहनतळ परिसरातील आणि परिवास्तूच्या बाहेरील गर्दीचे योग्य व्यवस्थापन करताना, सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे   यथायोग्यपणे पालन केले जात असल्याची सुनिश्चिती करण्यात येईल. 
आ. उद्वाहनांमध्ये सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे यथायोग्यपणे पालन करून, लोकांची संख्या मर्यादित ठेवण्यात येईल. 
                  इ. मध्यंतरामध्ये सामाईक जागा, व-हांडे (लॉबी) आणि प्रसाधनगृहे या ठिकाणी गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. प्रेक्षकांना मध्यंतरामध्ये ये-जा करणे टाळावे याकरिता, त्यांना प्रोत्साहित करण्यात यावे. प्रेक्षागारातील वेगवेगळ्या रांगांमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना एकमेकांमध्ये अंतर राखून ये-जा करता यावी याकरिता दीर्घकाळाचे मध्यंतर ठेवता येईल. 
            १.४ तिकीट आरक्षण व रक्कम भरणा पद्धती 
                 अ. तिकिटे देणे/त्यांची पडताळणी करणे/त्यांची रक्कम भरणे यांकरिता तसेच, खाद्य पदार्थ व पेये यांकरिता ऑनलाइन आरक्षण, इ वॉलेट, क्यूआर कोड स्कॅनर, इत्यादींसारख्या डिजिटल ,संपर्करहित व्यवहारांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे.
                  आ. संपर्काचा (व्यवतीचा) शोध घेणे सुकर व्हावे म्हणून, तिकीट आरक्षण करतेवेळी संपर्क क्रमांक नोंदवून घेण्यात येईल.     
इ. तिकीट कार्यालयात (बॉक्स ऑफिस)) तिकीट खरेदी दिवसभरासाठी सुरू ठेवण्यात येईल, तसेच तिकीट विक्री खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकीट आरक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. 
ई. प्रत्यक्षात खिडकीवर तिकीट काढतेवेळी गर्दीला आळा घालण्यासाठी, पर्याप्त सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे पालन करून,तिकीट कार्यालयात पुरेशा प्रमाणात खिडक्यांची व्यवस्था करण्यात येईल. 
उ. तिकीट कार्यालयात रांगेचे व्यवस्थापन करताना, सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टीने, जमिनीवर खुणा (फ्लोअर मार्कर्स) करण्यात येतील.    
         १.५. परिवास्तुचे निर्जंतुकीकरण करणे. 
अ. संपूर्ण परिवास्तू, सामाईक सुविधा यांचे तसेच लोकांकडून सामाईकपणे हाताळल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी, जसे की, दांडे(handles), कठडे(railing) इत्यादींचे वारंवार निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करण्यात येईल. 
आ. प्रत्येक नाट्यप्रयोगानंतर प्रेक्षागाराचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. 
इ. तिकीट कार्यालय, खाद्य-पेयपदार्थ विक्री स्थळे, कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक चीजवस्तूंचे खण, स्वच्छतागृहे, सार्वजनिक जागा आणि अंतर्गत कामकाज पाहणारे कार्यालय (back office) क्षेत्रे यांची नियमित स्वच्छता व निर्जतुकीकरण केल्याची खात्री करण्यात येईल. 
ई. निर्जंतुकीकरण करणा-या कर्मचारीवर्गाच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजण्यात येतील, जसे की, हातमोजे, बूट, मुखपट्टया, व्यक्तिगत संरक्षक साधने पीपीई) इत्यादींच्या संयुक्तिक वापरासाठी पर्याप्त तरतुदी करण्यात येतील. 
उ. कोणतीही व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास, परिवास्तुचे निर्जंतुकीकरण हाती घेण्यात येईल. 
      १.६. कर्मचाऱ्यांशी संबंधित उपाययोजना 
अ. कामाच्या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मुखावरण (फेस कव्हर) लावणे बंधनकारक असून अशा मुखावरणाचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा. 
                 आ. वयस्क कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी व वैद्यकीय उपचाराधीन कर्मचारी अशा, अधिक जोखीम असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी जास्त खबरदारी घ्यावी, अशा कर्मचाऱ्यांना लोकांशी थेट संपर्क आवश्यक असणारी व लोकांसमोर जावे लागणारी कामे विशेष करून देण्यात येऊ नयेत. 
                 इ.कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सजग राहण्याचा भाग म्हणून, सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये (मोबाईल) आरोग्य सेतू अॅप स्थापित करून अद्ययावत केले असल्याची नियोक्त्यांनी खात्री केली पाहिजे. 
                 ई. सर्व कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्या आरोग्याची स्वत:च देखरेख केली जात असल्याची आणि कोणताही आजार झाल्यास त्याबाबत तात्काळ कळवले जाण्याची खात्री करण्यात येईल. 

      १.७. जनजागृती 
            अ.प्रमुख प्रवेश द्वारे, ऑनलाईन, डिजिटल तिकीट विक्री ठिकाणे, तसेच प्रसाधनगृहे वरांडे (लॉबी), यासारखी सार्वजनिक ठिकाणे येथे काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या सूचना लावण्यात येतील. 
           आ.परिवास्तूच्या आत आणि बाहेर मुखपट्टी लावणे, सुरक्षित अंतर राखणे व हातांची स्वच्छता राखणे याबाबतच्या लोकोपयोगी घोषणा तसेच घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजना यासंबंधातील विनिर्दिष्ट घोषणा ह्या, नाटय प्रयोगापूर्वी, मध्यंतरामध्ये आणि नाटयप्रयोगाच्या शेवटी करण्यात येतील. 
        इ. वरील ठिकाणांच्या बाहेरील बाजूस व आतील बाजूस ठळकपणे, कोविड-१९ च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरील भित्तीपत्रके/ उभे फलक/ ध्वनीफित वाजविण्यासाठी तरतुदी केल्या गेल्याच पाहिजेत. 
           ई. कोविड-१९ संदर्भातील जनजागृतीकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग / संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमे संदर्भातील ध्वनीफित प्रयोगापूर्वी व मध्यतरांत वाजविण्यात याव्यातच. 
१.८ वातानुकूलन/शीतन व्यवस्था 
वातानुकूलनासाठी/ वायुवीजनासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करण्यात येईल, ज्यांमध्ये इतर गोष्टींबरोबरच, पुढील बार्बीवर भर दिलेला आहे: 
क. सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. 
ख. सापेक्ष आर्द्रता ही ४० ते ७० टक्क्यांच्या मर्यादेत असली पाहिजे. 
ग. शक्य होईल तितक्या प्रमाणात, हवेचे पुनर्चक्रण टाळण्यात यावे. 
घ. शक्य होईल तेवढी, ताजी हवा मिळण्याची व्यवस्था असली पाहिजे. 
ड. समोरासमोरील वायुवीजन हे, पुरेशा प्रमाणात असले पाहिजे. 
       १.९ दृश्य लक्षणांबाबत कार्यवाही 
कोविड-१९ च्या संबंधातील लक्षणे किंवा बेफिकिर वर्तन यांबाबत प्रेक्षागार व्यवस्थापकाच्या/व्यवस्थापकांच्या आणि स्थानिक  प्राधिका-यांच्या समन्वयाने काटेकोरपणे कार्यवाही करण्यात येईल. 
१.१० खाद्य-पेय पदार्थांचे क्षेत्र 
अ. खाद्यपदार्थ मागविण्यासाठी , शक्य तितका, नाट्यगृह उपयोजक (थिएटर अॅप)/ शीघ्र प्रतिसाद संकेतांक (क्यू.आर, कोड) 
इत्यादींचा  वापर करण्यास ग्राहकांना प्रोत्साहन देण्यात येईल. 
आ. खाद्य व पेय पदार्थांच्या क्षेत्रामध्ये, शक्य असेल तेथे तेथे, अनेक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात यावीत. 
 इ. प्रत्येक विक्री केंद्रावर सुरक्षित अंतर राखण्यासाठी, जमिनीवर चिकट-पट्ट्या (स्टिकर) वापरून एक- रांग पद्धतीचा अवलंब   
 करावयाचा आहे. 
ई. केवळ आवेष्टित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल.
उ. सभागृहाच्या/प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थांची व पेय पदार्थाची पोचवणी करण्यास मनाई असेल. 
ऊ. खाद्यपदार्थांच्या व पेय पदार्थांच्या क्षेत्रात सुरक्षित अंतराचे पालन होत असल्याची व गर्दीला आळा घातला जात असल्याची   खातरजमा 
व्यवस्थापनाकडून करण्यात येईल. 
ए. खाद्यपदार्थांच्या व पेय पदार्थांच्या कचऱ्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जात असल्याबाबत परिवास्तूच्या व्यवस्थापनाकडून  खातरजमा करण्यात येईल.
२. कोविड-१९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निदेश तसेच गृह कार्य मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन इत्यादींनी जारी केलेली संबंधित मार्गदर्शक तत्त्वे यांचे सर्व कार्यामध्ये व व्यवहारांमध्ये काटेकोरपणे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक आहे. 
या  आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन केलेस संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005  व  साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये   कठोर कारवाई करणेत येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.
0000

मार्गदर्शक सुचनेनुसार बंदिस्त सभागृहे, मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी - जिल्हाधिकारी

सातारा दि.20 (जिमाका):   
कोविड-19 चे अनुषंगाने राज्य शासनाच्या   मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्हयातील बंदिस्त सभागृहे, मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोंबर 2021 पासून मार्गदर्शक सुचनेस अधीन राहून परवानगी  दिली आहे.  
 
मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे...

भाग-१ बंदिस्त सभागृह 
१. सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टव्दारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची / आयोजकांची जबाबदारी असेल. 
२. बंदिस्त सभागृहाच्या एकुण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असु नये. 
३. बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान ६  फुट) आवश्यक राहिल, 
४. बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहिल, 
५. बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहिल. 
६. आरोग्य सेतू उपयोजन (अॅप) सुसंगत साधनांवर स्थापित (installed) करून ते दिवसभर सुरू ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार / आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण ( दोन डोस व दुस-या डोसनंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. 
७. सभागृहातील सर्व परिसर / खोल्या / प्रसाधन गृहे वेळोवेळी स्वच्छ करणेबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखावे व प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. तसेच, वेळोवेळी निर्जतुकीकरण करण्यात यावे. 
८. बंदिस्त सभागृहात उपस्थित सर्वांनी पूर्णवेळ मास्क लावणे बंधनकारक राहील.
९. सभागृहातील कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणारे सर्व उपकरणांचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक आहे.
 १०.कार्यक्रमासाठीची सहाय्यक कामे त्या-त्या कामांसाठी नेमून दिलेल्या व्यक्तींनीच करावीत. 
 ११.कार्यक्रमासाठी लागणारी साधन-सामुग्री ( संगीत व्यवस्था / लॅपटॉप/ माईक / प्रकाश योजना इ.) जी कोण व्यक्ती हाताळणार असतील, त्यांनीच ती वापरावी याबाबत दक्षता घेण्यात यावी. शक्यतो ज्याने त्याने स्वत:चीच साधनसामुग्री वापरावी. 
१२.बंदिस्त सभागृहामध्ये रंगभूषाकाराची आवश्यकता असेल तर त्यांनी पीपीई कीट धारण करणे आवश्यक आहे.      
१३.बंदिस्त सभागृहात प्रवेश करतेवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे. यास्तव, सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार, प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. 
१४.कोणत्याही प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास मनाई राहील.
१५.परिवास्तूच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रामध्ये, हात स्वच्छ करण्यासाठी प्राधान्याने हाताचा - स्पर्शरहित पध्दतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव्य उपलब्ध ठेवावे. 
१६.श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना / शिंकताना प्रत्येकाने स्वत:चे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यू पेपर) / हात रुमालाने/ कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यू पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. 
१७.सभागृहातील कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे. 
१८.जनजागृतीचा भाग म्हणून सभागृहाच्या दर्शनी ठिकाणी कोविड - १९ च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाय-योजनांवरील भित्तीपत्रके / उभे फलक झळकविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. 
१९.सभागृह वातानुकुलीन असेल अशा ठिकाणी तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. 
२०.खाद्य व पेय पदार्थांच्या क्षेत्रामध्ये, शक्य असेल तेथे तेथे, अनेक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात यावीत. प्रत्येक विक्री केंद्रावर सुरक्षित अंतर  राखण्यासाठी, जमिनीवर चिकट-पट्ट्या (स्टिकर) वापरून एक-रांग पद्धतीचा अवलंब करावयाचा आहे. केवळ आवेष्टित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल. सभागृहाच्या/प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थांची व पेय पदार्थांची पोचवणी करण्यास मनाई करण्यात येईल.
आयोजक व कार्यक्रमासाठी सहाय्य करणारे कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन तत्वे
1. बंदिस्त सभागृहात काम करणा-या सर्व कर्मचा-यांनी कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
२.  वयाने ज्येष्ठ कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे,असे कर्मचारी यांना ज्या ठिकाणी जास्त जनसंपर्क असलेल्या ठिकाणी कामासाठी नेमण्यात येऊ नये व त्यांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
३. कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वांनी आरोग्य सेतू" अॅपचा वापर करावा. 
४. सर्व कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याबाबत सजगता दाखवावी व आपल्या असणाऱ्या आजाराच्या तात्काळ व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणावे.


भाग-२ 
 बंदिस्त सभागृहाव्यतिरीक्त मोकळ्या जागेत आयोजित होणारे कार्यक्रम.
१. मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी ६-६ फुटांवर खुणा करुन त्यानुसार लोक बसण्याची / उभे रहाण्याची व्यवस्था करावी. त्यानुसार प्रेक्षक बसतील/ उभे राहतील, याची संयोजकांनी दक्षता घ्यावी. सादरीकरण करणा-या कलाकारांपासून प्रेक्षक कमीत कमी ०६ फुट अंतरावर असावेत.
२. कार्यक्रम/कला सादर होणाऱ्या ठिकाणी प्रेक्षकांना मास्क घालणे अनिवार्य राहील. 
३. बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार / कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंध लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर १४   दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती "सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. 
४. थुंकी उत्पन्न करणारे पदार्थ जसे की तंबाखूजन्य पदार्थ व पान इ. बाळगण्यास मनाई राहील. 
५. नशा आणणा-या पदार्थांचे / द्रव्यांचे सेवन करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी येता येणार नाही. 
६. थर्मल गन, सॅनिटायझर कार्यक्रमाच्या ठिकाणी असावेत व आयोजकांनी तपासणी करुनच प्रवेश दयावा.
७. गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा व्यवस्था असावी. 
८. मोकळे मैदान, रस्ता, खुले सभागृह, इत्यादी ठिकाणी कार्यक्रम होणार असल्यास, कार्यक्रम पाहण्यासाठी उभे राहणे अथवा बसणे याकरिता मार्किंग करावे.
९. ज्या ठिकाणी अनियंत्रित गर्दी आहे त्या ठिकाणी ध्वनी प्रदुषणविषयक नियम पाळून ध्वनीक्षेपकावरुन सूचना द्याव्यात. 
१०.अनियंत्रित गर्दी व रस्त्यावरील कार्यक्रमांना स्थानिक प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन परवानगी द्यावी. 
११.कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ / पेये विक्रीस बंदी राहील. 
१२.कार्यक्रम सादरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे नेपथ्य, प्रकाश व ध्वनी यंत्रणा, मंडप व मंडपाचे साहित्य, सजावट साहित्य यांचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींची राहील. 
१३. माझे कुटुंब माझी जबाबदारी" ला अनुसरुन शक्य असेल तेथे कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबाबत ध्वनीफित तसेच संबंधित फलक लावावेत. 
१४.उपरोक्त बाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग ( आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनवर्सन ) / सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून Break the Chain अंतर्गत वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचे काटकोर पालन करणे बंधनकारक आहे. 
या आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन केलेस संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005  व  साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात  येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.

0000

Tuesday, October 19, 2021

आज सातारा जिल्ह्यात 74जण कोरोनाबाधित तर, 315 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि.  (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 74 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 315 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या... पुढील प्रमाणे आहे...
जावली 1 कराड 13 खंडाळा 4 खटाव 4 कोरेगांव4 माण14  महाबळेश्वर 1 पाटण 0 फलटण 11 सातारा 16 वाई 1 व इतर 2 व नंतरचे वाढीव 3 असे  आज अखेर एकूण 74 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 315 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

हॉटेल्स रात्री 12 पर्यंत तर दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी ; राज्य शासनाचा मोठा निर्णय...

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकार कडून निर्बंधात शिथिलता आणली जात आहे. त्यानुसार राज्यातील सर्व उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व प्रकारची दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने मान्यता दिलीय. यासंदर्भातील कार्यपद्धती आणि नियमावली सरकारने जाहीर केली आहे.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोरोना टास्कफोर्ससोबत बैठक झाली. यावेळी हॉटेल आणि दुकानांची वेळ मर्यादा वाढवण्याचा निर्णय झाला, 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपट गृहं, नाट्यगृहांसोबत अम्यूझमेंट पार्कही सुरू होणार आहेत. तसंच राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

हे पण वाचा -

Monday, October 18, 2021

येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे नाट्यगृहे होणार सुरू ; मुख्यमंत्री

वेध माझा ऑनलाइन
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोरोना टास्कफोर्ससोबत बैठक झाली यावेळी येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपट गृहं, नाट्यगृहांसोबत अम्यूझमेंट पार्कही सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

 यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले सध्या रुग्ण संख्या कमी होतांना दिसतेय त्यामुळे. येत्या 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे  सुरू करणार आहोत. उपाहारगृहे  दुकानांच्या  वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत. 








आज सातारा जिल्ह्यात 52 जण बाधीत ; 34 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि.  (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 52 जण कोरोना बाधीत आढळले तर 3 जणांचा मृत्यु झाला आणि 34 जणांना डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या... पुढील प्रमाणे आहे...
जावली 8 कराड 4 खंडाळा 0 खटाव 5 कोरेगांव0 माण 2 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 11 सातारा 19 वाई 0 व इतर 1 व नंतरचे वाढीव 2असे  आज अखेर एकूण 52 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 34 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

काँग्रेसचा विचार घरा घरात पोहचवा - पृथ्वीराज चव्हाण


कराड 

काँग्रेसने देशाला एक विचार दिला विकासाची दृष्टी दिली. स्वातंत्र्य प्राप्ती साठी देशात एक लोकचळवळ काँग्रेस ने उभारली. स्वातंत्र्या नंतर देशातील प्रत्येक घटकाचा व विभागाचा विकास काँग्रेस सरकारने दूरदृष्टीने केला. देशभक्ती हा काँग्रेस चा आत्मा असून तो विचार प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये भिनला असून प्रत्येक कार्यकर्त्याने काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवावा असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले ते कराड दक्षिण काँग्रेस कमिटी पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍड उदयसिंह पाटील - उंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या सर्व नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाला एक परंपरा आहे. पक्ष संघटना वाढावी ती रुजावी यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने झटले पाहिजे. काँग्रेसवर अनेक संकटे आली, पक्ष संपविण्याचा सुद्धा विरोधकांनी प्रयत्न केला पण काँग्रेस कधी संपली नाही कारण सर्वसामान्य कार्यकर्ता व जनता काँग्रेसच्या पाठीशी कायम राहिली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे विचार स्वतः मध्ये रुजवून पक्ष संघटना आपापल्या भागात बळकट करावी.

Sunday, October 17, 2021

ट्रेकिंगदरम्यान कराडच्या सुहास पाटील यांचा मृत्यू : ट्रेकर, व व्यापारी वर्गातून हळहळ व्यक्त...

वेध माझा ऑनलाइन
कराड   घारेवाडी ता. कराड येथील धुळोबा डोंगरात ट्रेकींग करताना शहरातील प्रसिद्ध गुळाचे अडत व्यापारी, तसेच ट्रेकर व सायकीलीस्ट सुहास शामराव पाटील (वय ५२) याचा ट्रेकिंगदरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. रविवारी १७ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ट्रेकिंग करताना ह्रदयाचा तीव्र धक्का बसला. त्यानंतर पाटील यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 
 
 धुळोबा डोंगरावर रविवारी सकाळी ट्रेकींगसाठी जाताना ट्रेकर सुहास पाटील डोगर सर करत असताना त्याना ह्रदयविकाराचा तीव्र धक्का बसला. या धक्याने ते खाली कोसळले त्यांच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी येथील कृष्णा रूग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच सुहास पाटील यांचा मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेबाबत शहरातील ट्रेकर, सायकीलीस्ट व व्यापारी वर्गातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

आज सातारा जिल्ह्यात 72 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 342 जणांना दिला डिस्चार्ज...

सातारा जिल्ह्याचा कोरोना रिपोर्ट...

सातारा (जिमाका)
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 72 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर आज एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही 342 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या... पुढील प्रमाणे...
जावली 4 कराड 12 खंडाळा 1 खटाव 5 कोरेगांव0 माण 9 महाबळेश्वर 4 पाटण0 फलटण 10 सातारा 22 वाई 1 व इतर 1 आणि बाहेरील 3 असे आज अखेर एकूण 72 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 342 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Saturday, October 16, 2021

जिल्ह्यात 44 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित : 28 जणांना दिला डिस्चार्ज...

सातारा (जिमाका)
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 44 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला आहे.तर आज 28 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. जावली 1 (10009), कराड 2 (39107), खंडाळा 0 (14166), खटाव 9 (25780), कोरेगांव 2 (21896), माण 1 (17885), महाबळेश्वर 0 (4694), पाटण 0 (10130), फलटण 4 (37266), सातारा 24 (51733), वाई 1 (15729) व इतर 0 (2150), असे आज अखेर एकूण 2 लाख 50 हजार 501 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच सातारा जिल्ह्यात 2 जणांचा कोरोना उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

Friday, October 15, 2021

आज सातारा जिल्ह्यात 83 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 110 जणांना दिला डिस्चार्ज...

सातारा (जिमाका)
जिल्ह्यात रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 83 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 6 बाधितांचा मृत्यु झाला आहे तर 110 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. जावली 4 (10008), कराड 14 (39105), खंडाळा 1 (14166), खटाव 15 (25771), कोरेगांव 4 (21894), माण 6 (17884), महाबळेश्वर 3 (4694), पाटण 0 (10130), फलटण 12 (37262), सातारा 17 (51709), वाई 4 (15728) व इतर 2 (2150), असे आज अखेर एकूण 2 लाख 50 हजार 501 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच सातारा जिल्ह्यात 6 जणांचा कोरोना उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

एकूण नमूने – 21 लाख 77 हजार 543
एकूण बाधित – 2 लाख 50 हजार 501
घरी सोडण्यात आलेले – 2 लाख 41 हजार 885
मृत्यू –6 हजार 384
उपचारार्थ रुग्ण– 1 हजार 353