ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य व रास्त दर मिळावा, या न्याय्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाला कराड बार असोसिएशन, कराडच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दरवाढीसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, पुणे-बंगळुरू महामार्गावरील कागल टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी कराड बार असोसिएशनची भूमिका आहे.
कराड बार असोसिएशन ही नेहमीच शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक आणि समाजातील वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांच्या बाजूने उभी राहिली आहे.
दरम्यान कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. दीपक थोरात यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त दर मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कराड बार असोसिएशनचा जाहीर पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शासनाने आंदोलकांच्या वरती गुन्हे दाखल केले तर त्या केसेस कराड बार असोसिएशनचे वकील सदस्य निशुल्क केसेस चालवतील असे आश्वासित करण्यात आले "
यावेळी कराड बार असोसिएशन, कराड अध्यक्ष : ॲड. दीपक दिनकरराव थोरात
उपाध्यक्ष- ऍड अमोल कणसे
सचिव : ॲड. मयूर एम. माने
सहसचिव - ऍड राजवर्धन पाटील
खजिनदार- ऍड रोहित माळी
महिला प्रतिनिधी -ऍड विद्या मोप्रेकर यांच्यासह कराड वकील संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment