ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेली एमआयएम पक्षाची नगरसेविका सहर शेख हिचे वडील युनुस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर सहर शेख हिचे एक भाषण व्हायरल झाले होते. यामध्ये तिने 'कैसा हरायाsssss...', असे म्हणत विरोधकांना डिवचले होते. सहर शेखचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
याच सभेत सहर शेख हिने आपल्याला येणार्या काळात संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असे म्हटले. तिच्या या वक्तव्यावरुन प्रचंड टीका झाली होती. टीका करणाऱ्यांमध्ये महायुतीसह शिंदे सेनेचाही समावेश होता. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेने सहर शेख हिच्या वडिलांना आपल्या पक्षात मानाचे पान दिल्याने ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे
No comments:
Post a Comment