Thursday, April 30, 2020

कराडच्या कॉटेज हॉस्पिटल मधील 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

  कराड         
येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील म्हणजेच येथील कॉटेज हॉस्पिटल मधील आठ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खबरदारी म्हणुन रुग्णालयातील सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये ६ कर्मचार्‍यांचे कोरोना अहवाल पोझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकिय महाविद्यालय, पुणे यांनी कळवले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. कराड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाच कोरोनाची बाधा झाल्यामुळे कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिन्याभरात कराड तालुक्यातील रुग्णसंख्या 40 च्या वर पोहोचली आहे. 

उंब्रज मधील महिला कोरोना बाधित ; कराड तालुक्यातील बाधित संख्या आणखी वाढण्याची शक्यता

कराड
उंब्रज ता.कराड मधील एक महिला कोरोना बाधित असल्याची माहिती मिळत असून सातारा जिल्ह्यातील रात्री १० च्या दरम्यान आची शक्यतालेल्या रिपोर्ट नुसार कराड तालुक्यातील आणखी काहीजण बाधित असल्याची माहिती मिळत असून हे सर्वजण एका ठिकाणी सेवा देत होते
उंब्रज मधील कोरोना बाधित असणाऱ्या २७ वर्षीय महिलेला आरोग्य विभागाने गुरुवारी रात्रीच राहत्या घरातून कराडला दवाखान्यात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
गुरुवारी रात्री रात्रभर पोलीस व आरोग्य विभाग उंब्रज येथील चोरे रोड परिसरात ठाण मांडून होते तसेच परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे तसेच सर्व परिसर सील करण्यात आला आहे

आज दि. 30 रोजीची 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना आकडेवारी

सातारा
 1. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा 1151
2. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 539
3. एकूण दाखल - 1690
*प्रवासी-247, निकट सहवासीत-910, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-242,आरोग्य सेवक-263, ANC/CZ-28 एकूण= 1690*
4. अनिर्णित नमुने- 7
5. 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 17
6 एकूण घेतलेले नमुने 24
7. कोरोना बाधित अहवाल - 44
8. कोरोना अबाधित अहवाल - 1282
9. अहवाल प्रलंबित - 364
10. डिस्चार्ज दिलेले- 1290
11. मृत्यू 2
12. सद्यस्थितीत दाखल- 398
13. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 29.4.2020) - 1624
14. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 1624
15. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 771
16. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 853
17. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 237
18. आज दाखल 0
19 यापैकी डिस्जार्ज केलेले- 172
20. यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0
21. अद्याप दाखल - 65

कराड तालुक्यातील 10 वर्षाचा मुलगा कोरोना बाधित

 सातारा दि. 30( जि. मा. का ) : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल असणाऱ्या एका 10 वर्षीय मुलाचा अहवाल कोविड-19   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 34   कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 44  कोविड-19 बाधित  रुग्ण आढळले आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 16, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12 असे एकूण 44 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.
आज दि.30 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 10, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 47, ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 1 व कोरेगाव येथे 14 असे एकूण 72 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या  एका कोविड बाधित रुगणाचा 14 दिवसानंतर दुसरा नमुना असे एकूण 73 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
0000

Wednesday, April 29, 2020

82 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा दि. 30( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 56, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 25, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 1 असे एकूण 82 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तसेच काल दि. 29 एप्रिल रोजी रात्री उशिरा  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 20, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 54  असे एकूण 74 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
0000

सातारा येथील 1 व कराड येथील 1 असे एकूण 2 रुग्ण पॉझिटिव्ह ; 63 जण दाखल

सातारा दि. 29( जि. मा. का ) : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक 36 वर्षीय महिला आरोग्य कर्मचारी व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाच्या निकट सहवासित 11 वर्षाचा मुलगा असे एकूण 2 जणं पॉझिटिव्ह (कोविड-19)   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 33  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज दि. 29 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 18, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 11 असे एकूण 63 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
0000

आज दि.29 ची सायं 5 वाजताची सातारा जिल्ह्याची कोरोना आकडेवारी


 1. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा 1055
2. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 492
3. एकूण दाखल - 1547
*प्रवासी-225, निकट सहवासीत-896, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-232,आरोग्य सेवक-172, ANC/CZ-22 एकूण= 1547  *
4. अनिर्णित नमुने- 7
5. 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 17
6 एकूण घेतलेले नमुने 24
7. कोरोना बाधित अहवाल - 43
8. कोरोना अबाधित अहवाल - 1150
9. अहवाल प्रलंबित - 353
10. डिस्चार्ज दिलेले- 1158
11. मृत्यू 2
12. सद्यस्थितीत दाखल- 385
13. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 28.4.2020) - 1624
14. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 1624
15. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 771
16. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 853
17. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 230
18. आज दाखल 0
19 यापैकी डिस्जार्ज केलेले- 171
20. यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0
21. अद्याप दाखल - 59

कृष्णा हॉस्पिटल येथून 3 पेशंट कोरोना मुक्त होऊन घरी परतले. ; टाळ्यांच्या गजरात मिळाला डिस्चार्ज


अजिंक्य गोवेकर
कराड, ता. 29 :
कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 3 कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज या तिन्ही कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्वात कमी वयाचा पेशंट म्हणजेच डेरवण येथील अवघे 10 महिन्याचे बाळ आणि सर्वात वयोवृध्द पेशंट म्हणजेच म्हारुगडेवाडी (ता. कराड) येथील 78 वर्षीय महिलेसह ओगलेवाडी (ता. कराड) येथील 28 वर्षीय युवकाचा समावेश आहे. या तिन्ही रुग्णांनी कृष्णा हॉस्पिटलच्या सोबतीने कोरोनावर केलेली मात प्रेरणादायी असून, आजच्या या घटनेमुळे कराड तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये 11 एप्रिल रोजी ओगलेवाडी येथील एक 28 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने उपचारासाठी दाखल झाला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 एप्रिलला डेरवण येथील एक 10 महिन्याचे बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खूपच हळहळ व्यक्त केली जात होती. त्यातच पुन्हा म्हारुगडेवाडी येथील कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या, 78 वर्षीय आईचा अहवाल 15 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. या तिघांवरही कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

गेल्या आठवड्यात कराड तालुक्यातील तांबवे येथील युवक कोरोनामुक्त झाल्यानंतर आता या 10 महिन्याच्या बाळावर आणि 78 वर्षीय महिलेवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करणे हे मोठे आव्हान होते.

पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व यशस्वी उपचार करत, हे आव्हान यशस्वीपणे पार पाडत आज 10 वर्षे वयाच्या बाळासह 78 वर्षीय वृद्धेलाही कोरोनाच्या विळख्यातून वाचविले. तसेच 28 वर्षीय युवकावरही यशस्वी उपचार करण्यात आले.

आज या तिन्ही रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स, नर्स आणि अन्य स्टाफच्यावतीने टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी या तिन्ही रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

याप्रसंगी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्स व स्टाफ उपस्थित होता.


78 वर्षीय आज्जींचा उत्साह प्रेरणादायी..

म्हारुगडेवाडी येथील 78 वर्षीय आज्जींचा 15 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. खरंतर त्यापूर्वी त्यांच्या 58 वर्षीय मुलाला कोरोनाचा लागण होऊन, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण त्यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याने या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. पण आज कोरोनामुक्त झालेल्या या आज्जीबाईंचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सर्वांना हात करत आणि सर्वांच्या टाळ्या स्वीकार करत त्या चालल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर मुलाच्या जाण्याचे दुःख  जरूर होतो, पण कोरोनाची यशस्वी लढाई जिंकल्याचा मनस्वी आनंदही प्रेरणा देणारा होता


..अन चिमुकला खेळू लागला बाहुलीसंगे ...

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 10 वर्षाच्या लहान बाळावर उपचार करून त्याला कोरोनामुक्त करणे हे मोठे आव्हान होते. पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने अथक प्रयत्न करून या बाळाला आज कोरोनामुक्त केले. त्या मुलाला वॉर्डमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला डॉ. सुरेश भोसले यांनी बाहुली भेट दिली. जवळपास 15 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट असलेल्या या बाळाला बाहुली मिळाल्यावर त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता.

सातारा जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण

सातारा : कोरोनाच्या संसर्गापासून बाजूला असलेल्या सातारा शहरातील सदरबझार परिसरात आज कोरोनाचा रूग्ण सापडला आहे. जिल्हा रूग्णालयात क्ष-किरण विभागात तंत्रज्ञ असलेल्या या महिला कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे पुणे येथून आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हा वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासन, पोलिस आणि आरोग्य विभाग शर्तीचे प्रयत्न करत आहे. सातत्याने लोकांना घरात थांबा, घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलिस अधीक्षक  तेजस्वी सातपुते करत आहेत.

कराड येथील 7 बँकांना प्रशासकीय कामासाठी अटी व शर्थीसह सूट

सातारा दि. 29 (जी मा का)
 सातारा जिल्हयाताल कराड तालुक्यात जास्त प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रूण आढळत असल्याने संपूर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापुर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी, नांदलापुर, गोळेश्व, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुटे, कोयना वसाहत  इ. ग्रामपंचायत क्षेत्र या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने कराड तालुक्यामधील वर नमूद केलेल्या क्षेत्रामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीप्रमाणे दि. 22 एप्रिल  रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते पुढील आदेश होईपर्यंत मनाई आदेश पारीत करणेत आलेला आहे.
  यामध्ये कराड शहरातील मुख्य कार्यालये असलेल्या बँकांची कार्यालये चालु ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी,   शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार  प्राप्त असलेल्या अधिकारान्वये  खाली नमुद केलेल्या बँकांची फक्त मुख्य कार्यालये ही केवळ प्रशासकीय कामासाठी चालु ठेवण्याकरीता अटी व शर्तीस अधिन राहून या आदेशान्वये सुट देण्यात आली आहे.
  कृष्णा सहकारी बँक लिमिटेड, रेठरे बु. मलकापूर कृष्णा हॉस्पीटल समोर, मलकापूर, दि. कराड अर्बन बँक लिमिटेड, कराड 516/2, शनिवार पेठ, कराड, दि. कराड जनता सहकारी बँक लि. कराड ,100/101, शिवाजीनगर स्टेशनरोड, कराड, स्व. पी. डी. पाटील सहकारी बँक लि., कराड 15/3 मंगळवार पेठ ज्योतीबा मंदीराजवळ  कराड , यशवंत सहकारी बँक लि.फलटण मुख्य कार्यालय, चावडी चौक कराड, कोयना सहकारी बँक लि. कराड रयत बाजार बिल्डिंग , शनिवार पेठ, मार्केटयार्ड  कराड,  दि.प्रिती संगम सहकारी बँक लि., कराड एस.टी.स्टँड समोर 56, शनिवारपेठ कराड. या बँकांना फक्त प्रशासकीय काम करणेकरीता बँकेतल्याबँकेत काम करण्यासाठी सकाळी 11.00 ते द.2.00 वाजे पर्यंत परवानगी देणेत येत आहे.
  बँक मुख्यालयाला कमीत कमी कर्मचारी वर्गात काम करावे लागेल. तसेच लोकांच्या भेटीसाठी व लोकांच्या बँक मुख्यालयातील प्रवेशास परवानगी नाही. तसेच अत्यावश्यक असणारे कर्मचारी वर्ग यांचे ओळखपत्र  उपविभागीय दंडाधिकारी कराड यांचेकडुन घ्यावे. सॅनिटायझरचा वापर, नाक व तोंडास मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे इत्यादिचे पालन करणे बंधनकारक राहील. शासन निर्णय डीएमयु/2020/सोआर.92/डीआयएसएम-1 दि. 17/04/2020 मधील दिलेल्या आदेशानुसार कोविड- 19 बाबत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचना व त्यासोबत जोडलेले परिशष्ट 1 व 2 चे  काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणा-यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, भा.दं.वि. 1860 चे कलम 188 व इतर कादयातील लागू असलेल्या दंडात्मक तरतूदीनुसार गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
00000

Tuesday, April 28, 2020

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे निधन

मुंबई
आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. ५३ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता.

‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘पिकू’चे दिग्दर्शक शूजित सरकार यांनी ट्विटरद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली.

इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

3 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह ; आज घरी सोडणार ; 61 अनुमानित निगेटिव्ह ; 14 जण दाखल

सातारा दि. 29( जि. मा. का )
कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे दाखल असणाऱ्या तीन कोविड-19 बाधित रुग्णांचे  14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ.  आमोद गडीकर यांनी दिली. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, स्व. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 33,कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 6, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 1 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 1  असे एकूण 61 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे.
दिनांक 28 एप्रिल रोजी उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 14 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी  पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
0000

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

अजिंक्य गोवेकर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या एका जागेवर नियुक्ती करावी या मागणीसाठी मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आज राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून पत्र सादर केले.मंत्रिमंडळाने दिलेला प्रस्ताव  मान्य करावा अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना येत्या २८ मेपर्यंत दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे.अपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ९ एप्रिलच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली होती.मात्र त्यावर राज्यपालांनी कोणताच निर्णय न घेतल्याने काल झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत  याबाबत राज्यपालांना पुन्हा विनंती करण्याचा निर्णय झाला. आज उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,परिवहनमंत्री अनिल परब,मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख,जलसंपदामंत्री जयंत पाटील या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने राजभनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचे पत्र सादर केले. जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव दिला आहे तो मान्य करावा अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले.

उत्तरप्रदेश मध्ये साधूंच्या झालेल्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

अजिंक्य गोवेकर 
मुंबई :
 उत्तरप्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त केली आहे.
 उत्तरप्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंची हत्या करण्यात आली आहे.त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.या अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राने अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये ज्यारितीने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे बुलदंशहर प्रकरणी देखील  दोषींना कडक शिक्षा होईल अशी  अपेक्षा व्यक्त केली आहे.  कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या आठवड्यात पालघर येथे दोन साधूंची जमावाने हत्या केल्याची घटना घडली.या घटनेचे मोठे पडसाद उमटले होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलून या घटनेची माहिती घेतली होती.

आज दि.28 रोजीची सायंकाळी 5 वाजताची सातारा जिल्ह्याची कोरोना आकडेवारी

1. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा 979
2. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 492
3. एकूण दाखल - 1471
*प्रवासी-156, निकट सहवासीत-791, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-205,आरोग्य सेवक-57, ANC/CZ-14 एकूण= 1223  *
4. अनिर्णित नमुने- 7
4. 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 16
5. एकूण घेतलेले नमुने 23
6 कोरोना बाधित अहवाल - 41
7. कोरोना अबाधित अहवाल - 1058
8. अहवाल प्रलंबित - 372
9. डिस्चार्ज दिलेले- 1063
10. मृत्यू 2
11. सद्यस्थितीत दाखल- 406
12. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 27.4.2020) - 1554
13. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 1554
14. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 770
15. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 784
16. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 223
17. आज दाखल 0
18. यापैकी डिस्जार्ज केलेले- 161
19 यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0
20. अद्याप दाखल - 62

कराड तालुक्यातील आणखी 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ; कराड तालुका हादरला

कराड
सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा वाढला आहे.आणखी सहा रूग्णांचे रिपोर्ट पोसिटीव्ह आले आहेत. 1 जण फलटण येथील आहे. तर 5 जण कराड तालुक्यातील वनवासमाची व आगशिवनगर येथील आहेत.
सातारा जिल्ह्यात आता कोरोनाचा आकडा 41 वर पोहोचला आहे.तर,कराड मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 30 इतकी झाली आहे.सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अमोद गडीकर यांनि ही माहिती दिली. कराड तालुका वाढत्या रुग्णांच्या चिंतेने मात्र हादरून गेला आहे.
---------------------------------------------------------------------

पुण्याहून प्रवास करून आलेला युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह : 58 जण निगेटिव्ह ; 86 जण दाखल

सातारा दि. 28( जि. मा. का ) : पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल  रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. हा युवक पॉझिटिव्ह (कोविड-19)   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
या रुग्णावर पुढील उपचार   क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे करण्यात येणार आहे.
आता सातारा जिल्ह्यात 36  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 5 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
  तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 6, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 6, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 44, फलटण येथील 2 असे एकूण 58 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच 27 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 21, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 57, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 8 असे एकूण 86 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
00000

Monday, April 27, 2020

संचारबंदी काळात केशकर्तनाचा व्यवसाय करू नये : जिल्हा पोलिस प्रमुख

सातारा दि. 27- संचारबंदी कालावधीत केशकर्तनाचा व्यवसाय करू नये अन्यथा संबधीत व्यक्तीस तसेच  केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सातारा जिल्हा
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.
कोरोना विर्षाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व स्तरांवर मोठया प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शासनाने व जिल्हा प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत.  यानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाने या काळात कालावधीत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तु वितरण वगळता सर्व आस्थापनांवर बंदी घालण्यात आली आहे. यानुसार केशकर्तनालय सुरू करणेस बंदी असून त्याचा कोणत्याही व्यक्तीने भंग केलेस संबंधीतावर भारतीय दंड सहिंता चे कलम १८८, २६९ व २७० अन्वये गुन्हा दाखल करणेत येईल.  कोणत्याही व्यक्तीने बंदी आदेशाचा भंग करून केशकर्तनालय दुकान सुरू करू नये. तसेच संचारबंदी (लॉकडाऊन) कालावधीत शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही व्यक्तिच्या सांगण्यावरून अथवा विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन केशकर्तनाचा व्यवसाय करू नये अन्यथा संबधीत व्यक्तीस तसेच  केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एका पत्रकान्वये अधिकराव लक्ष्मणराव चव्हाण, सातारा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांना कळविले आहे.

जीवनावश्यक वस्तुंच्या घरपोच सुविधांसाठी खाली दिलेल्या अँप चा वापर करावा...जिल्हाधिकारी

सातारा दि. 27
(जिमाका) : लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली आहे. त्याअनुषंगाने सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू (उदा. अन्नधान्य, किराणा, भाजीपाला, फळे, दूध, औषधे इ.) घरपोच मागविण्याबाबत खालील नमूद ई-कॉमर्स सुविधांचा जास्तीत जास्त वापर करावा. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर न पडता घरपोच सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी   शेखर सिंह यांनी केले आहे.
  DMart Ready Application अव्हेन्यू सुपरमार्टस् लिमिटेड यांचे डी-मार्ट स्टोअर्स तर्फे प्ले स्टोअर वर डी मार्ट रेडी (DMart Ready) नावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार केलेले असून या अॅप्लिकेशन द्वारे सातारा व कराड शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तूंची मागणी नोंदवून वस्तू घरपोच मागविता येतील.  सात्विक नॅचरल फार्मिग ग्रुप सातारा शहारातील नागरिकांसाठी मालगांव, ता.सातारा येथील सात्विक नॅचरल फार्मिग ग्रुपने ९७६६५५०५९१ या व्हॉटसअप मोबाईल नंबरवर ग्राहकांकड़न आवश्यक असणाऱ्या शेतमाल व भाजीपाल्याची मागणी नोंदवून शेतमाल घरपोच देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.Online Bhaji Application सातारा शहारातील नागरिकांसाठी प्ले स्टोअर वरील Online Bhaji Application नावाच्या मोबाईल अप्लिकेशन अॅपद्वारे नागरिकांना पालेभाज्या, फळे, सुका मेवा, दुग्धजन्य पदार्थ व मसाले या जीवनावश्यक वस्तूंची मागणी नोंदवून वस्तू घरपोच मागविता येतील. तर Needly Application आयटी सोल्यूशन्स प्रा.लि.पुणे यांनी लॉकडाऊन परिस्थितीचा विचार करुन संपूर्ण महाराष्ट्रभर "Needly" नावाचे ॲप विक्रेते आणि खरेदीदार यांच्यासाठी तयार केलेले असून हे अॅप सातारा जिल्हयातील सर्व नगर परिषदा, नगर पंचायतीच्या नागरी भागात वापरण्यास सुरुवात केली आहे. "Needly" अॅपमध्ये वापरकर्त्यास त्याच्या जवळच्या सर्व दुकानांची, अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्यांची यादी मिळेल व त्यांना या लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये घरपोच जीवनावश्यक वस्तू किराणा, भाजीपाला, फळे, दुध व औषधे मागवता येतील.
  जिल्हयातील शहरी भागामधील सर्व नगर नरिषद, नगर पंचायत कार्यालयांनी नागरिकांना घरपोच सेवा देण्याबाबत किराणा, भाजीपाला, फळे, दूध व औषधे विक्रेत्यांची व्हॉटसअॅप मोबाईल नंबरसह यादी प्रभाग निहाय प्रसिध्दी केलेली आहे. तरी शहरी भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी संबंधित विक्रेत्यांना फोन करुन जीवनाश्यक वस्तू घरपोच मागवून घ्याव्यात व  विनाकारण घराबाहेर न पडण्याबाबत दक्षता घ्यावी.
  वरील प्रमाणे जीवनावश्यक उपाययोजनांचा नागरीकांनी लाभ घेऊन कोविड--१९ निर्बंध असेपर्यंत घराबाहेर पडू नये. तसेच किराणा, भाजीपाला, फळे व औषधे इत्यादीची खरेदी करताना सोशल डिस्टन्स व  नियमाचे काटेकारपणे पालन करुन कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी व जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
00000

आज दि .27 ची संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची सातारा जिल्ह्याची कोरोना आकडेवारी...


 1. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा 804
2. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 419
3. एकूण दाखल - 1223
*प्रवासी-156, निकट सहवासीत-791, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-205,आरोग्य सेवक-57 = ANC/CZ-14 एकूण-1223 *
4. अनिर्णित नमुने- 7
5. 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 16
6 एकूण घेतलेले नमुने 23
7. कोरोना बाधित अहवाल - 35
8. कोरोना अबाधित अहवाल - 1031
9. अहवाल प्रलंबित - 157
10. डिस्चार्ज दिलेले- 1034
11. मृत्यू 2
12. सद्यस्थितीत दाखल- 187
13. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 26.4.2020) - 1448
14. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 1448
15. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 763
16. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 685
17. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 220
18. आज दाखल 0
19 यापैकी डिस्जार्ज केलेले- 151
20. यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0
21. अद्याप दाखल - 69

कराड तालुक्यातील आणखी 2 जण पॉझिटिव्ह : तालुक्यातील बधितांची संख्या झाली 25

कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आज (सोमवारी) आलेल्या तपासणी अहवालातुन समोर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित संख्या वाढून 25 झाली आहे तर जिल्ह्याची संख्या.. झाली आहे. बधितांची  संख्या वाढू लागल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sunday, April 26, 2020

65 जण निगेटिव्ह ; 95 जण विलीगिकरण कक्षात दाखल

सातारा दि. 27-( जि. मा. का )
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 20 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 30 असे एकूण 65 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तसेच  26 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 3, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 35, उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 43 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 14 असे एकूण 95 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.   या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका कोविड-19 बाधित रुग्णाचा 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यास आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक          डॉ.   गडीकर यांनी कळविले आहे.
0000

आज 39 जणांना केले दाखल

सातारा दि.26 (जि.माका)
  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 6, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 33 असे एकूण 39 नागरिकांना आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.
00000

दि. 26 एप्रिल 2020 रोजीची सायं.5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना आकडेवारी ...

1. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा 732
2. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 411
3. एकूण दाखल - 1143
*प्रवासी-152, निकट सहवासीत-725, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-201, आरोग्य सेवक-54, ANC/CZ 11 = एकूण 1143*
4. अनिर्णित नमुने- 7
5. 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 16
6 एकूण घेतलेले नमुने 23
7. कोरोना बाधित अहवाल - 33
8. कोरोना अबाधित अहवाल - 870
9. अहवाल प्रलंबित - 240
10. डिस्चार्ज दिलेले- 873
11. मृत्यू 2
12. सद्यस्थितीत दाखल- 268
13. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 25.4.2020) - 1369
14. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 1369
15. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 754
16. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 615
17. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 217
18. आज दाखल 0
19 यापैकी डिस्जार्ज केलेले- 152
20. यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0
21. अद्याप दाखल - 65

एकवीस जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह : 29 जण दाखल

सातारा दि.26 (जि.माका) :  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 14, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 असे एकूण 21 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दि. 25 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 5 व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 24 असे एकूण 29 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका कोरोना  बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेला पहिला नमुना निगेटिव्ह आल्याने दुसरा नमुना बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या एका कोरोना बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेला पहिला नमुना निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.
0 0 0 0

Saturday, April 25, 2020

आणखी सात जण पॉझिटिव्ह : कराड व परिसरात खळबळ

सातारा दि. 25( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले 7 नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
प्राथमिक तपासण्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागु असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार चालु असल्याची माहितीही  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

कापूस खरेदीच्या अडचणी संदर्भात मुंबईत आढावा बैठक संपन्न ...मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्याबाबत बैठकीत सूचना


अजिंक्य गोवेकर
मुंबई, दि.24 :
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत.  खरेदी केंद्रांना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही अडचणी येत आहेत. त्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने खरेदी केंद्र आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

आज मंत्रालयात राज्यातील कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. श्री. पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कापूस खरेदी केंद्रांनी सोशल डिस्टिन्सींगसह आवश्यक त्या सर्व उपाययोजनासह नियमांचे पालन करुन कापूस खरेदी करावी. कापूस खरेदी केंद्रांना अडचणी संदर्भात आणि शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर कापूस घेवून जात असताना काही अडचणी असल्यास स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी असे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सांगीतले.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत शासन संवेदनशील असून लॉकडाऊनचा कालावधीतसुद्धा कापुस खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.

बैठकीला पणन विभागाचे अपरमुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन विभागाचे उपसचिव का.गो. वळवी, सहकार मंत्र्यांचे खाजगी सचिव संतोष पाटील अविनाश देशपाडे ओ एस डी उपस्थित होते.

0 0

Friday, April 24, 2020

राजमाता प्रतिष्ठानने साजरी केली घरगुती पद्धतीची शिवजयंती


अजिंक्य गोवेकर
कराड
 कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने  केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत येथील राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने घरगुती पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
 यावेळी पोलिस देवानंद खाडे, किरण चिखले यांच्याहस्ते शिव छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव (मेहरबान)सर्जेराव पाटील,खंडू इंगळे,रोहन जाधव,सागर थोरात, वरद पोतदार,अनिकेत शेंद्रे अदि उपस्थित होते.

पाच जण पॉझिटीव्ह ; 23 जण दाखल

सातारा दि. 25
( जि. मा. का ) : उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले 5 नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 21 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच 24 एप्रिल रोजी रात्री उशिरा  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे 23 अनुमानितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
00000

तीस जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह ; 109 जण आज दाखल

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 21, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 4,  उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 1 असे एकूण 30 जाणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून सातारा येथील 2 व कराड येथील 1 असे एकूण 3 नागरिकांचे अहवाल अनिर्णित असल्याचे बी.जे. वैद्यकीय माविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

                आज 24 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 12, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 24, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 40 फलटण येथे 2 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 31 असे  एकूण 109 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आल्याने आज पुनर्तपाणीकरिता तसेच कराड येथे दाखल असणाऱ्या बाधित रुगणाचा 14 दिवसानंतरचा पहिला नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

कृष्णा हॉस्पिटलसह ,डॉ.अतुल भोसले, डॉ.सुरेश भोसले यांची बदनामी करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात कराड पोलीसात गुन्हा दाखल.

कराड - सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे येथील कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले डॉ. अतुल भोसले यांची सोशल मिडीयातून बदनामी करण्यात आली आहे, तसेच कोरोना संदर्भातदेखील सोशल मिडीयातून अफवा पसरऊन उगीचच भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे असे कृत्य करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हाट्सअप संदेश पाठवुन हॉस्पीटलची तसेच अतुल भोसले, सुरेश भोसले यांची जाणीवपुर्वक बदनामी केली आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीसोबत आक्षेपार्ह मेसेजचा स्क्रीनशॉट जोडला आहे. सदरचा संदेश दिनांक 23/04/2020 रोजी दुपारी 2.39 वाजता मा. अतुलबाबा यांचे मोबाईलवर आलेला असुन तो त्यांनी पाहिलेला आहे.आज केवळ कराड तालुक्यातच नव्हे संपुर्ण सातारा जिल्हयात सर्वोकृष्ट आरोग्य सेवा देण्यात कृष्णा हॉस्पीटल अग्रेसर आहे. कोरोना विरुध्दच्या लढाईत आज
कृष्णा हॉस्पीटल महत्वपुर्ण भूमिका बजावत आहे. कृष्णा हॉस्पीटलचे अनेक कर्मचारी जीवाची बाजी लावून या संकटाचा सामना करत आहेत.

अंशावेळी या हॉस्पीटलवर आणि या हॉस्पीटलचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले (बाबा), डॉ.अतुल भोसले (बाबा) यांच्यावर सोशल मिडीयातुन जाणीवपुर्वक गंभीर स्वरुपाची चिखलफेक केली जात आहे. तसेच कोरोना प्रसाराच्या अनुषंगाने आक्षेपार्ह आणि तथ्यहीन विधाने या मर्सेजमधुन करण्यात आली आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये नाहक भिती परसण्याची शक्यता आहे. तरी, कोरोनाच्या अनुषंगाने सोशल मिडीयातुन
अशाप्रकारच्या अफवा पसरविणा-या या संबधित बलराज पाटील नावे इसमावर आणि ज्या सोशल मिडीया ग्रुपवरुन हे मेसेज व्हायरल केले जात आहेत. त्या ग्रुप अॅडमिनवर नाहक गंभीर स्वरूपाच्या बदनामीच्या भा.द.वि.सं कलम 399,500 नुसार, अफवा पसरविण्यासाठी 505(2) अन्वये, व्हॉटसअपच्या माध्यमातुन अफवा परसविण्यासाठी भा.द.वि. 505 अन्वये, चुकीची अफवा पसरविण्सासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कलम 52 आणि भिती निर्माण होईल अशी अफवा पसरविल्याबद्दल कलम 54 अंतर्गत संबधीत व्यक्तींचे विरुध्द तक्रार कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

मलकापुरात आणखी एकास झाली लागण ; तालुक्यातील बधितांची संख्या झाली 12 ; जिल्ह्यातील संख्या 22

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी दिवसभरात आगाशिवनगर येथील दोघांना तर वनवासमाची येथील एक महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडुन आला होता. त्यानंतर संबंधितांच्या संपर्कातील मलकापुरमधील आणखी एकाला लागण झाल्याची माहिती आज (शुक्रवार) समोर आली आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील बाधीतांची संख्या 12 वर पोचली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील काेराेना बाधितांची संख्या 22 इतकी झाली आहे. 

लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांची सहकार व पणन विभागातील अधिकाऱ्यांशी मुंबईत चर्चा


अजिंक्य गोवेकर
कराड
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची व्याप्ती देशात तसेच महाराष्ट्रात होऊ लागली आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री मा. ना. श्री बाळासाहेब  पाटील
यांच्या अध्यक्षतेखाली  पणन, सहकार विभागातील अधिकारी यांच्या समवेत मंत्रालय मुंबई येथे  महाराष्ट्रातील लॉकडाउनच्या एकंदर परिस्थितीबद्दल विविध विषयांवर चर्चा झाली.

या प्रसंगी प्रधान सचिव सहकार  श्रीमती आभा शुक्ला, अप्पर मुख्य  सचिव (पणन)श्री अनुप कुमार, व्यवस्थापकीय  संचालक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ श्री नवीन सोना, खाजगी सचिव ,मंत्री सहकार ,पणन ,श्री संतोष पाटील, उपसचिव (पणन)श्री का. गो .वळवी आदी उपस्थित होते.

आता दूध मिळणार घरपोच, त्याकरिता करा एक फोन...

कऱ्हाड ः शंभर टक्के लॉकडाऊन झालेल्या शहर, मलाकपूरसह त्या भागातील ग्रामीण भागात घरपोच दूध वितरण व्यवस्था उद्यापासून (शनिवारपासून) सुरू होणार आहे. सकाळी सहा ते आठ व सायंकाळी सहा ते आठ वेळत कोयना दूधातर्फे नेमलेल्या 47 दूध वितरकांकडून घरपोच दूध दिले जाणार आहे. त्यासाठी त्या दूध वितरकांच्या मोबाईलवर आपली मागणी नागरीकांनी कळवायची आहे. त्यानंतर तो दूध वितरक तुम्हाला घरपोच दूध देणार आहे. त्याची महत्वाची बैठक प्रातांधिकारी उत्तम दीघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांच्या व कोयना दूध संघाचे कार्याकारी संचालक अमाेल गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात तो निर्णय झाला. लॉक डाऊन काळात दूध मिळावे अशी जनतेची मोठ्या प्रमाणात मागणी होतो त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

एका अनुमानीताचा रिपोर्ट निगेटिव्ह ; 12 जण दाखल


सातारा दि. 24( जि. मा. का ) : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच काल रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे  2 व उपजिल्हा रुग्णालय,कराड येथे 10 असे एकूण 12 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
0000

Thursday, April 23, 2020

चेहऱ्यावर मास्क परिधान न केल्यास 500 रुपये दंड ; जिल्हाधिकारी



सातारा दि.23 (जि.माका) : कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अत्यावश्यक बाबी व सेवा यांच्यासाठी घरामधून बाहेर पडण्यापासून परत घरी येईपर्यंत चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक केले होते. परंतू शहरी व ग्रामीण भागातील बरेचसे नागरिक मास्क न वापरता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक उपाययोजना म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन करुन विना मास्क परिधान करता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना 500 रुपये इतका दड आकारण्याचे आदेश दिले आहेत.
या दंडाची आकारणी ग्रामस्तरावरील ग्रामसेवक/ग्रामपंचायत कर्मचारी यांनी व शहरी भागातील संबंधित नगरपालिका विभाग किंवा नगरपालिका कर्मचारी यांनी करावी. तसेच याबाबत इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित भौगोलिक क्षेत्रात दंडाची वसूली केल्यास ती त्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
0000

सातारा पालकमंत्र्यांनी घेतली साताऱ्यात राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती ; साताऱ्याच्या एकूण अडचणी व परिस्थितीबाबत केली चर्चा...




अजिंक्य गोवेकर
कराड
कोरोना(कोविड १९) या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे, या पार्श्वभूमीवर राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी सातारा शहरास भेट देऊन प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. येथील पोवई नाका, राजवाडा व  एस टी स्टँड चौक आदी. ठिकाणची पाहणी केली व  अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक आणासाहेब मांजरे , तहसीलदार आशा होळकर, वाहतूक सपोनि शेलार,  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासमवेत सातारा शहर व जिल्हयातील एकूण  परिस्थिती व अडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा केली.

 कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क रहाणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांसाठी लोकांनी बाहेर पडणे टाळावे.
आरोग्य यंत्रणा संपूर्ण शहराचा होम टू होम सर्व्हे करीत आहे. प्रशासन सतर्क आहे. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

राजस्थान मध्ये अडकून पडलेल्या 2500 विद्यार्थ्यांना राज्य सरकारने तातडीने सोडवून आणावे ; आ.शिवेंद्रराजेंची मागणी


सातारा
संपूर्ण जगात कोरोना साथीने थैमान घातले असून आपल्या देशात लॉक डाऊन सुरु आहे. दरम्यान, राजस्थान येथील कोटा जिल्ह्यात आयआयटी कोचिंग क्लासेससाठी गेलेले तब्बल २५०० विध्यार्थी व काही पालक त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३५ जण असून काळाची गरज ओळखून महाराष्ट्र सरकारने राजस्थान येथील कोटा येथे अडकून पडलेल्या २५०० विध्यार्थी व पालकांना तातडीने महाराष्ट्रात आणावे, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी आयआयटीच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून २५०० विध्यार्थी आणि काही पालक राजस्थान येथील कोटा जिल्ह्यात गेले आहेत. काही दिवसापासून कोरोना या साथीच्या आजाराने संपूर्ण जगाला विळखा घातला असून आपल्या देशातही या महामारीने हाहाकार उडालेला आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी आणि देशातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉक डाऊन लागू केला आहे. त्यामुळे जिल्हा व राज्याच्या सीमा बंद आहेत. दरम्यान, आयआयटी शिक्षणानिमित्त देशभरातील विविध राज्यातून गेलेले विध्यार्थी राजस्थान येथील कोटा येथे अडकून पडलेले आहेत. यामध्ये  महाराष्ट्रातून गेलेले २५०० विध्यार्थी आणि काही पालक यांचाही समावेश आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३५ जण सुद्धा कोटा येथे अडकलेले आहेत. कोरोनामुळे देशभरातील जनजीवन विस्कळीत झाले असून कोटा येथे अडकलेल्या विध्यार्थी आणि पालकांचे अतोनात हाल होत आहेत. अनेकांवर उपासमारीचीही वेळ आली आहे.

कोटा येथील जिल्हाधिकारी यांनी अडकून पडलेल्या विध्यार्थी आणि पालकांना त्यांच्या राज्यात परतण्याची परवानगी दिलेली असून त्यानुसार उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांच्या सरकारने त्यांच्या राज्यातील विध्यार्थी परत आणण्याची परवानगी देऊन त्यांना आपापल्या राज्यात नेले आहे. दरम्यान, आपल्या महाराष्ट्रातील विध्यार्थी कोटा येथून महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आपल्या राज्य सरकारने राजस्थान सरकारला परवानगी असल्याचे कळवणे आवश्यक आहे. कोटा जिल्हाधिकाऱ्यांकडून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची यादी महाराष्ट्र सरकारला प्राप्त होईल. त्यामुळे तातडीने महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन कोटा येथे अडकून पडलेल्या २५०० विध्यार्थी व पालकांना त्वरित महाराष्ट्रात आणण्यासाठी आपण तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री ना. ठाकरे व उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्याकडे केली आहे.

दोन जण कोरोना बाधित ; 27 जण निगेटीव्ह ; 36 जण अनुमानीत कक्षात दाखल...

निकट सहवासित 65 वर्षीय व 27 वर्षीय पुरुष कोरोना बाधित ; 4 नागरिकांचे अहवाल अनिर्णिततर 27 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
36 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल

सातारा दि. 23( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित 65 वर्षीय व 27 वर्षीय  पुरुषांचे  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 16  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ही सगळी मिळून  जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 झाली आहे.
  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 5, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 2, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे एकूण 27 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.  तर कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 3 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 1 असे एकूण 4 नागरिकांचे अहवाल अनिर्णित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे.
 दि. 23 एप्रिल रोजी  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  अुमानित म्हणून 12, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 5, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 19 असे एकूण 36 अनुमानितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या दाखल असणाऱ्या 2 बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतर तपाणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह असल्याने 48 तासांनी पुनर्तपासणीकरिता बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे  येथे पाठविण्यात येत आहे,  अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
0000

कराड तालुक्यातील 13 गावांसाठी घरगुती गॅस सिलेंडर वितरणात सूट देण्यात आल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

कराड
कराड तालुक्यात जास्त प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने कराड तालुक्यातील संपुर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुंढे, कोयना वसाहत या ग्रामपंचायतींचे क्षेत्र या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी  क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार 23 एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. तथापि, या आदेशानुसार घरगुती गॅस सिलेंडर वितरण करणे अत्यावश्यक असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घरगुती गॅस सिलेंडीर वितरण करण्यासाठी सुट दिली आहे.

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरें याना पत्र...पत्राद्वारे केल्या महत्वपूर्ण सुचना आणि मागण्या...


अजिंक्य गोवेकर
कराड
कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन ३ में पर्यंत वाढवला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा बघता लॉकडाऊन कधी संपेल किंवा किती वाढविला जायील याबद्दल सर्वच साशंक आहेत. अश्या परिस्थितीत राज्यातील काही महत्वाचे घटक आहेत कि ज्यांचा रोजी रोटीचा प्रश्न आहे अश्यांना राज्य सरकारतर्फे काही मदत व्हावी तसेच कोरोनाच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण सूचना माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांना पत्रातून मांडल्या आहेत.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रात वैद्यकीय, स्वस्त धान्य वितरण, कृषी अर्थ व्यवस्था, वृत्तपत्रांचे नियमित वितरण तसेच परदेशात व कोटा येथे अडकलेले महाराष्ट्राचे विद्यार्थी या विषयांचा समावेश आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण कोरोनाच्या बाबतीत जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्वतः गावागावांमध्ये तसेच शहरामध्ये फिरत आहेत त्याचबरोबर या अभियानादरम्यान जनतेकडून अडचणी समजून घेत आहेत, त्या प्रश्नांचा राज्यभर कितपत परिणाम होत आहे किंवा असे प्रश्न राज्यात कोणकोणत्या भागात जाणवत आहेत याची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांशी व सबंधित विभागाच्या सचिवांशी फोनवरून चर्चा करीत आहेत.

आ पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना ज्या विविध सूचना व मागण्या केल्या आहेत त्या खालीलप्रमाणे-

१)    वैद्यकीय

·        कोरोना टेस्टिंग बद्दल स्पष्ट निर्देश द्यावेत. टेस्टिंगचा खर्च कोण करणार त्याबद्दल स्पष्टीकरण दिले जावे. तसेच टेस्टिंगचा सर्व खर्च महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केला जावा व तसे सुस्पष्ट आदेश देण्यात यावेत.

·        खाजगी डॉक्टरांना व खाजगी दवाखान्यांना जिल्हयाधिकार्‍यां मार्फत PPE किटचे वितरण करावे.

·        केंद्राने Rapid Testing बंद केले आहे. त्याबद्दल सुस्पष्ट सूचना देणे गरजेचे आहे.



२)    स्वस्त धान्य दुकान

·        धान्य विकत घेताना लाभार्थीना POS मशीन मध्ये बोटांचा ठसा उमटला नाही तर त्यांना धान्य दिले जात नाही, परंतु शासनाच्या १७ मार्च, ३१ मार्च व १७ एप्रिल च्या परिपत्रकानुसार POS चा वापर न करता धान्य दिले पाहिजे असे परिपत्रक आहे. पण त्याबद्दल GR नसल्यामुळे त्याची माहिती दुकानदारांना व ग्राहकांना नाही त्यामुळे या निर्णयाची माध्यमांमधून जाहिरात करण्यात यावी.

·        बाहेरच्या राज्यातील किंवा जिल्ह्यातील मजुरांकडे शिधा पत्रिका नसल्यास त्यांना अंत्योदय योजनेप्रमाणे तीन महीने धान्य दिले जावे. त्याचबरोबर त्यांना आधार कार्डवर – बांधकाम मजुरांप्रमाणे महिना २००० रुपये भत्ता देण्यात यावा.



३)    कृषि अर्थ व्यवस्था

·        शेतकर्‍यांनी मागील कर्जाचे हफ्ते न दिल्यास त्यांना नवीन कर्ज मिळाले पाहिजे.

·        खरीप हंगामाकरिता शेतकर्‍यांना खाते व बियाणे यांचा योग्य पुरवठा करावा.

·        कापूस खरेदी यंत्रणा मजबूत करावी व शेतकर्‍यांना हमीभावाची खात्री द्यावी.

·        RBI ने हफ्ते व व्याज भरण्याकरिता तीन महिन्याची मुदतवाढ दिली आहे. ती सहकारी पतसंस्था व विकास संस्था सेवा सोसायट्यांनाही लागू करावी.

·        राष्ट्रीयीकृत बँकांचे व सहकारी बँकांची कर्जे तीन महिन्यांवरून सहा महिन्यापर्यंत मुदत वाढवावी तसेच सहा महिन्यांचे व्याज केंद्र शासनाने भरण्याची विनंती करावी.



४)    कोरोना साथीबद्दल अधिकृत माहिती

·        वर्तमानपत्रांचे वितरण चालू ठेवावे.

·        केबल कंपन्यांना विनंती करून केबल कंपन्यांचे दर पुढील तीन महिन्याकरिता कमी करण्यात यावेत.

·        WiFi ची व्यवस्था ही आज जीवनावश्यक गरज झाली आहे. त्यांचे दर ही पुढील तीन महिन्याकरिता कमी करावयास टेलिकॉम कंपन्यांना सांगावे.



५)    लॉकडाऊन

·        परदेशात ५०,००० वर भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत, त्यापैकी ५००० ते ७००० महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत. त्यांचे जेवणाचे व राहण्याचे हाल चालले आहेत. त्यांना विमानाने भारतात परत आणण्यासाठी केंद्राशी संपर्क साधावा.

·        कोटा राजस्थान येथे हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी जातात, त्यातील महाराष्ट्राचे २००० वर विद्यार्थी आहेत. त्यांना परत आणण्यासाठी विशेष बसेस पाठविल्या पाहिजेत. उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ७५०० विद्यार्थी २५० बसेस पाठवून घरी परत आणले आहेत.



सध्या कोरोनाच्या अनुषंगाने देशभर लॉकडाऊन सुरु आहे अश्या परिस्थितीत हातावर पोट असणारे व शेतकरी यांचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत तसेच महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी परदेशात राहत आहेत त्यांची तिथे गैरसोय होत आहे तसेच राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्रातील २००० च्या वर विद्यार्थी अडकले आहेत तसेच इतरही महत्वाचे प्रश्न, सूचना व मागण्या माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात आहेत.

आज अवघ्या काही तासात तीन रुग्ण पोसिटीव्ह सापडले ; कराड व मलकापुरात खळबळ

कराड
 सातारा जिल्ह्यात काेराेनाचे एकूण 21 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 16 जणांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत दाेन जणांचा मृत्य झाला आहे तर तिघे काेविड 19 मुक्त झाले आहेत. दरम्यान आज (गुरुवार) अवघ्या काही तासांत तीन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने कराड आणि मलकापूर येथे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कऱ्हाड जवळील मलकापुर परिसरातील आगाशिवनगमध्ये आज (गुरुवार) आणखी दोघांना तर वनवासमाची येथील एक महिलेला कोरोना विष्णाुची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाकडुन आलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले. त्यामुळे कऱ्हाडमध्ये एकुण रुग्णांची संख्या नऊ झाली आहे तर उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या सात झाली आहे. एकाच दिवशी आज तब्बल तीन रुग्ण सापडल्याने शहरासह मलकापुर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान कऱ्हाड तालुका हा सध्या कोरोनासाठी हॉटस्पॉटच बनला आहे

लॉक डाऊन च्या पार्शवभूमीवर पालकमंत्र्यांची कराड शहर व परिसरातील परिस्थितीची पाहणी...


अजिंक्य गोवेकर
कराड
तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून कडक पाऊले उचलत कराड शहर व परिसर १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आला आहे. हॉस्पिटलांव्यतिरिक्त  कोणतीही सुवीधा सुरू नाही,या पार्श्वभूमीवर कराड शहराच्या संपूर्ण परिस्थितीची पाहणी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी केली व डी.वाय.एस.पी.सुरज गुरव, पी.आय.बी.आर.पाटील, ए. पी.आय.विकास बडवे यांच्याशी  संपूर्ण परिस्थितीबाबत व अडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा केली .

43 वर्षीय महिला कोरोना बाधित; आणखी 10 जणांना केले दाखल...

कराड
 कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित 43 वर्षीय महिलेचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने  ही 43 वर्षीय महिला कोरोना बाधित असलयाची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 14  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 4, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 8 व फलटण येथील 11 असे एकूण 55 रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे मृत झालेल्या 5 महिन्याच्या बालकाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचेही कळविण्यात आले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 13 वर्षीय मुलाचा अहवाल अनिर्णित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे.

दि. 22 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे बाधीत रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून 10 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

Wednesday, April 22, 2020

वाधवान बंधूना 5 मे पर्यंत सातारा न सोडण्याचे सी. बी. आय चे. आदेश....


अजिंक्य गोवेकर
कराड
लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना नियमांची पायमल्ली करत वाधवान कुटुंबियांनी मुंबई, खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. जिल्हाबंदीचे आदेश मोडून वाधवान यांनी सातार्‍यात प्रवेश केल्याने पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच महाबळेश्वरातील एका खाजगी शाळेत त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र आता  वाधवान बंधूंचा क्वारंटाइन काळ संपल्याने आता पुढे काय असा अनेकांना प्रश्न होता. यापार्श्वभुमीवर वाधवान बंधूंना ५ मे पर्यंन्त सातारा जिल्हा न सोड्ण्याचा आदेश CBI न्यायालयाने दिले आहेत.

 सातारा जिल्हा सोडण्याआधी वाधवान यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची परवानगी घ्यावी लागणार अाहे. ३ मे पर्यन्तचा लाॅकडाऊन संपल्यावर CBI कडून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे समजत आहे. आज वाधवाना प्रकरणावरही गृहमंत्री देशमुख यांनी फेसबुकच्या माध्यमातून भाष्य केले. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या फार मोठ्या चुकीमुळे वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली. त्या वाधवान कुटुंबाचा आज दुपारी २ वाजता क्वारंटाइनची वेळ संपतेय. त्यामुळे पोलीस खात्याकडून ईडी आणि सीबीआय यांना पत्र लिहून कळवलं आहे. आज दुपारी २ नंतर वाधवान कुटुंबाला ताब्यात घ्यावं. सीबीआयचे अधिकारी जो पर्यंत वाधवान कुटुंबाला ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते आमच्या ताब्यात असतील अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.

तीन वर्षाचा मुलगा कोरोना बाधित...


 सातारा
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित तीन वर्षीय मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हा मुलगा कोरोना बाधित असलयाची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्याची काेराेना बाधित रुग्णांची आज संख्या 18 इतकी झाली आहे.

याबराेबरच विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा 14 दिवसानंतरचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला घशातील स्त्रावाचा नमुना पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस त्याच्यावर उपचार व पुर्नतपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. गडीकर यांनी दिली.
आता सातारा जिल्ह्यात 13 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत तीन (कोविड19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर दाेघांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल असणाऱ्या एका अनुमानित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे एक , बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आलेले दाेन व सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित नऊ तर कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे चार, सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित 24 व उपजिल्हा जिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाचा निकट सहवासित एक अशा एकूण 41 जणांना अनुमानित म्हणून आज (बुधवार) विलिगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे

कराड तालुक्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश... पुढील आदेश येईपर्यंत उद्यापासून कडकडीत बंद.....

सातारा दि. 22( जि. मा. का ) : कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.  सातारा जिल्हयात सध्यस्थितीत कोरोनाबाधित  रुग्णांपैकी 8 रुग्ण हे कराड तालुक्यातील असल्याने कराड शहर व नजीकचे नगरपरिषद व शहरानजीकच्या विविध ग्रामपंचायते क्षेत्र हे प्रतिबंधात्मक क्षेत्र करण्याकरीता उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर कराड  यांनी प्रस्तावित केले आहे.
या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कराड तालुक्यात जास्त प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने कराड तालुक्यातील संपुर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुंढे, कोयना वसाहत या ग्रामपंचायतींचे क्षेत्र या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी  क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार पुढीलप्रमाणे 23 एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
याप्रमाणे सातारा जिल्हयातील कराड तालुक्यातील संपुर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुंढे, कोयना वसाहत या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस 2 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस सक्त मनाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात दवाखाने, हॉस्पीटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.  फक्त अत्यावश्यक सेवेतील औषधे घरपोच पुरविण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर कराड ज्याप्रमाणे यंत्रणा उभारतील, त्याप्रमाणे औषधे घरपोच पुरविण्यात येतील.  या प्रतिबंधीत क्षेत्रातील पोलीस विभागाचा पेट्रोलपंप वगळून इतर सर्व पेट्रोल पंप बंद राहतील. या पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त केले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनांना इंधनपुरवठा करण्यात यावा. निकडीच्या प्रसंगी रुग्ण असल्याची खातरजमा करुनच रुग्णाची वाहतूक करणा-या वाहनांसाठीच मर्यादीत स्वरुपात इंधन पुरवठा करणेत यावा. या आदेशामधून अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय, निम शासकीय, खाजगी अधिकारी  कर्मचारी वगळणेत येत आहेत.  प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची आरोग्य विषयक माहिती संकलित करणेकामी नियुक्त करणेत आलेल्या कर्मचाऱ्यांना चूकीची माहिती देणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून अशी चूकीची माहिती देणा-या विरुध्द कठोर कारवाई करणेची तरतूद आहे. त्यामुळे विचारलेली माहिती न लपविता पूर्णपणे तसेच अचूकरित्या नागरिकांनी द्यावी. व नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे.  यापुर्वी वेगवेगळया विभागामार्फत देण्यात आलेले सर्व पास रदद करण्यात आले आहेत.   यापूर्वी नियुक्त केले अधिकारी, कर्मचारी यांचेपैकी अत्यावश्यक असलेले अधिकारी- कर्मचारी यांनाच उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सीडंट कमांडंर कराड यांनी स्वतंत्र नव्याने ओळखपत्र तसेच वाहन परवाना वितरीत करावा. वितरीत करण्यात येणाऱ्या ओळखपत्र तसेच वाहन परवान्यावर क्रमांक,दिनांक, वेळ व कार्यक्षेत्र  यांचे वैधतेसह आवश्यक असणारा सर्व तपशिल नमूद करावा.  पोलीस विभागाने त्यांचेशी निगडीत बाबींच्या अनुषंगाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

पाच महिन्याच्या बाळाचा मृत्यू : 41 जण अनुमानीत म्हणून दाखल...



 सातारा
 क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे दाखल असणाऱ्या एका अनुमानित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 1, बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आलेले 2 व सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित 9 तर कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 4, सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित 24 व उपजिल्हा जिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाचा निकट सहवासित 1 अशा एकूण 41 जणांना अनुमानित म्हणून आज विलगीकरण  कक्षात दाखल करण्यात आले आहे.  या 41  अनुमानितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, कृष्णा मेडिकेल कॉलेज, कराड येथील अनुमानित रुग्णांमध्ये  5 महिन्याच्या पुरुष जातीच्या बाळाचा समावेश असून त्याचा मृत्यु झाला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

त्या 32 वर्षीय मृत तरुणाचा रिपोर्ट निगेटिव्ह

कराड
 मृत्यु झालेल्या 32 वर्षीय पुरुषाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, कृष्णा मेडिकल येथील 5 व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 अशा एकूण 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले   असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दि.21 एप्रिल रोजी रात्री उशिरा 6 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 1, आरोग्य कर्मचारी 1, प्रवास करुन आलेला 1 व 3 निकट सहवासितांचा समावेश आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

ना.शंभूराज देसाई यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला पाच जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचा आढावा...


 अजिंक्य गोवेकर
 कराड
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उभे राहून १४ ते १६ तास आपले कर्तव्य बजाविणाऱ्या कोल्हापुर परिक्षेत्रातील कोल्हापुर,सोलापुर,सांगली,सातारा व पुणे जिल्हयातील सर्व पोलीस विभागांचा आढावा आज राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला.पालघरसारखी घटना घडू नये याची खबरदारी कोल्हापुर परिक्षेत्रातील सर्वांनी घ्यावी.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व लॉकडाऊनच्या काळात सर्व पोलीस यंत्रणेचे उत्कृष्ट काम सुरु असून कोल्हापुर परिक्षेत्रामध्ये  आपल्या सर्वांच्या नियत्रणांखाली काम करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी,कर्मचारी हे जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अश्या सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांना देवून माझा हा संदेश तळागाळातल्या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत पोहचवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

          सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली  कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व कोल्हापुर,सोलापुर, सांगली, सातारा  व पुणे जिल्हयातील पोलीस अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजीत केली होती. यावेळी ना.देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे या पाच जिल्हयातील कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

            प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी जिल्हानिहाय संबधित जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांचेकडून पोलीस यंत्रणांचा आढावा घेतला व कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना आतापर्यंत या पाच जिल्हयामध्ये ज्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहणेकरीता आपण सर्वांनी खबरदारी घेतली आहे त्याचप्रमाणे पुढील काळातही खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या.पालघरसारखी एखादी घटना कोल्हापुर परिक्षेत्रातील एखादया जिल्हयात घडू नये याचीही विशेष खबरदारी सर्वांनी घ्यावी. असे सांगत कोणत्या जिल्हयामध्ये किती कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत आता जिल्हयामध्ये कोरोना तसेच लॉकडाऊनच्या संदर्भात काय परिस्थिती आहे?कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणणे करीता पोलीस यंत्रणेकडून कोणकोणत्या उपाययोजना तसेच प्रतिबंध करण्यात आले आहेत यामध्ये कोणत्या अडचणी पोलीस विभागाला येत नाहीत ना ? कोणकोणत्या जिल्हयामध्ये किती ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे बंदोबस्ता करीता पुरेसे पोलीस बळ आपल्या सर्वांच्या जवळ आहे काय? होमगार्ड तसेच एसआरपीच्या तुकडया आहेत का? आपल्या जिल्हयामधील पोलीस यंत्रणा किती किती तास आपले कर्तव्य बजावित आहेत त्यांना कोणती अडचण तर येत नाही ना? याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी घेतली व कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या काळात पोलीस यंत्रणेला कोणत्या अडीअडचणी येत असतील तर त्यांनी तात्काळ मला सांगाव्यात जेणेकरुन त्यावर तात्काळ कार्यवाही करणे सोपे जाईल.गृहराज्यमंत्री म्हणून आवश्यक ती सर्व मदत मी करण्यास तयार असून वाढीवच्या मदतीकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेशी संपर्क साधून आपल्या विभागा करीता आवश्यक असणाऱ्या यंत्रणा उभ्या करणेकरीता मी प्रयत्नशील आहे.

            लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सर्व पोलीस यंत्रणा जबाबदारीने कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहणेकरीता उत्कृष्टपणे काम करुन आपले कर्तव्य बजावित आहेत.आजघडीला राज्यातील एक एक पोलीस १४ ते १६ तास आपले कर्तव्य बजावित आहे ही कौतुकास्पद बाब आहे. राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे.कोल्हापुर परिक्षेत्रामध्ये कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच कोल्हापुर, सोलापुर, सांगली, सातारा  व पुणे जिल्हयातील पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट राहून काम करीत आहे.जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने दिवसरात्र रस्त्यावर उभे राहून पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावित आहेत. हे आपले कर्तव्यच आहे परंतू आपली जबाबदारीही आहे हे ओळखून पोलीस यंत्रणेचे सुरु असलेले काम उल्लेखनीय आहे असे सांगून ना.शंभूराज देसाईंनी लॉकडाऊनच्या काळात महिला पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना रात्रीची डयुटी लावू नये अशी महत्वाची सुचनाही विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांना केली.

 सर्व पोलीस यंत्रणेला एखादे विशेष पदक देण्याची विनंती मुख्यमंत्र्याकडे करणार- ना.शंभूराज देसाई.

       कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या काळात दिवसरात्र आपले कर्तव्य बजाविणाऱ्या राज्यातील पोलीस यंत्रणेतील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या पोलीस विभागामार्फत एखादे विशेष पदक देवून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा, त्यांच्या कामाचे कौतुक करावे अशी विशेष विनंती राज्याचा गृहराज्यमंत्री या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेकडे करणार असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.

Tuesday, April 21, 2020

पालकमंत्र्यांची स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट...धान्य पुरवठा व्यवस्थित होतोय का नाही याबाबत केली नागरिकांशी चर्चा...



अजिंक्य गोवेकर
कराड
नागठाणे ( जि.सातारा) येथे मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे  सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी येथील स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट दिली.  रेशन वितरणाचे काम सुरू होते तेथे त्यांनी दुकानाचे मालक यांच्याशी चर्चा केली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या नागरिक व महिलांशीही चर्चा केली. दुकानासमोर उभ्या असणाऱ्या ग्राहकांना सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या सूचना ठेऊन धान्याचा व्यवस्थित पुरवठा होत आहे का याची माहिती घेतली.

त्याचबरोबर दुकानासमोर गर्दी होऊ नये यासाठी दुकानातील वजन काटे वाढवून तातडीने रेशन देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क रहाणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांसाठी लोकांनी बाहेर पडणे टाळवे. असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' बंगल्यावर बंदोबस्तास असणारी महिला पोलीस अधिकारी कोरोनाग्रस्त...



अजिंक्य गोवेकर
मंबई
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या मलबार हिल येथील वर्षा बंगल्यावर बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याला 'कोरोना'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आधी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या परिसरातील चहाविक्रेता कोरोना पाॅझिटिव्ह आढळला होता. आता वर्षा बंगल्याचा परिसरही सॅनिटाईज करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला पोलिस अधिकारी पायधुणी पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहे. तिला वर्षा बंगल्यावर बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी तिला या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी नेमण्यात येणाऱ्या प्रत्येकाचे बाॅडी टेंपरेचर घेतले जाते. त्यात या महिला अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने तत्काळ दक्षिण मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पायधुनी पोलिस ठाण्यात या महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या अन्य काही कर्मचाऱ्यांचेही विलिगीकरण करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात पोलिस अधिक काळ रस्त्यावर नाकाबंदी सारख्या ड्युट्या करत आहेत. त्यात त्यांना लागण होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत राज्यभरात सुमारे पन्नास पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आज पुण्यातही मध्यवस्तीतल्या पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे पोलिस कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

आगशिवनगर,खोडशी भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले- कराडमध्ये खळबळ


कराड
 वनवासमाची (खोडशी) आणि आगाशिवनगर (मलकापूर) येथील दोघांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच  कराड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ८ झाली असून सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या १६ इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील तीन कोरोनाग्रस्त रूग्ण यापूर्वीच बरे होऊन रूग्णालयातून घरी गेले आहेत. याशिवाय दोन कोरोनाग्रस्त रूग्णांचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मागील सहा दिवसांत जिल्ह्यातील एकट्या कराड तालुक्यात ६ नवे कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी बाबरमाची परिसरातील रूग्णास कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले होते. या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन करून त्यांची तपासणी केली होती. या लोकांपैकी वनवासमाची (खोडशी) आणि आगाशिवनगर (मलकापूर) येथील दोघांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संपूर्ण सातारा जिल्ह्यात १६ कोरोनाबाधित रूग्ण आजवर सापडले आहेत. त्यापैकी एकट्या कराड तालुक्यात ८ जण आढळून आल्याने कराडकरांची चिंता वाढली असून आता प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.





रमजान महिन्यात शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे - जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांचे आवाहन


अजिंक्य गोवेकर
सातारा
 कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लॉकडावूनच्या परिस्थितीत ज्या प्रमाणे सामाजिक विलगीकरण पालन करण्याबाबतच्या राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहे त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्येही कटाक्षाने करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इप्तारसाठी एकत्र येवू नये. घराच्या, इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इप्तार करण्यात येवू नये, मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण अथवा इप्तार करण्यात येवू नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येवून करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इप्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पाडावे. लॉकडावून विषीय पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.