कराड, ता. 19 : पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 2500 हून अधिक कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 24 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा आज 2529 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान दिले. हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे 18 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगरानीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत, आज कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचा 2500 चा टप्पा पार केला.
आज 24 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्च देण्यात आला. कोरोनामुक्तीची ही लढाई जिंकलेल्या रूग्णांचा सत्कार कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, माजी जि. प. सदस्य डॉ. राजकुमार पवार, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, योगेश कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये गोरेगाव-वांगी येथील ४२ वर्षीय महिला, कवठे येथील ३९ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, कराड येथील ४९ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ४७ वर्षीय पुरुष, पोतले येथील ३६ वर्षीय महिला, मुंबई येथील ३० वर्षीय महिला, जावळी येथील २७ वर्षीय महिला, केसे येथील २० वर्षीय महिला, काले येथील ४० वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील ५७ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय महिला, काळगाव येथील ३६ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष, देवराष्ट्रे - कडेगाव येथील ५० वर्षीय महिला, नेर्ले - वाळवा येथील ६२ वर्षीय पुरुष, बोरगाव - वाळवा येथील ६२ वर्षीय महिला, बलवडी आंधळी - पलूस येथील ४८ वर्षीय महिला, संबुर - शिराळा येथील ७० वर्षीय महिला, तारळे येथील ६० वर्षीय महिला, कार्वे येथील ५४ वर्षीय महिला, विंग येथील ६७ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे
No comments:
Post a Comment