Friday, October 30, 2020

आज जिल्ह्यातील 333 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 30 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 333 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 300 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
300 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, , फलटण येथील 28, वाई येथील 13 खंडाळा येथील 10, रायगाव येथील 40, पानमळेवाडी येथील 16, महाबळेश्वर येथील 7, खावली 133, तळमावले येथील 35,असे एकूण 300 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 187310
एकूण बाधित -- 46219
घरी सोडण्यात आलेले -41380
मृत्यू -- 1536
उपचारार्थ रुग्ण -- 3303
00000

No comments:

Post a Comment