Saturday, October 3, 2020

आज जिल्ह्यात839 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 839 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 727 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*727 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 32, कराड 27, उपजिल्हा रुग्णालय फलटण 33, कोरेगाव 55, वाई 132, खंडाळा 61, रायगांव 93, पानमळेवाडी 24, मायणी 12, महाबळेश्वर 60, दहिवडी 50, म्हसवड 13, पिंपोडा 4 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 131 असे एकूण 727 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -- 148255
एकूण बाधित -- 38718
घरी सोडण्यात आलेले --- 29494
मृत्यू -- 1214
उपचारार्थ रुग्ण -- 8010
00000

No comments:

Post a Comment