Tuesday, October 13, 2020

देशाच्या उभारणीमध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा-रो.गजानन माने

कराड
शिक्षक हा विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे घडवत असतो आणि हेच विद्यार्थी देश घडवत असतात. शिक्षकांच्या योगदानामुळेच चारित्र्यसंपन्न नागरिक व समर्थ देशाची पायाभरणी होते. शालेय कामकाजाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यां च्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन प्रयोग राबवणारे शिक्षक हे विद्यार्थी व शाळेसाठी अहोरात्र झटत असतात. असे गौरवोद्गार रोटरी क्लब कराडचे प्रेसिडेंट रो. गजानन माने यांनी काढले. शिक्षकांना रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने नेशन बिल्डर अवॉर्ड 2020 ने सन्मानित करण्यात आले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दरवर्षी निवडक शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. रोटरी इंटरनॅशनल चे प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे फक्त शिक्षकांना बोलवून व कोविड च्या सूचनांचे तंतोतंत पालन करून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
श्रीमती नाजुकबी इलाही जामदार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कामर गाव,
श्री जगन्नाथ सदाशिव माळी, स्वा. सौ. दादासाहेब उंडाळकर विद्यालय, उंडाळे,
श्री राजेन्द्र नारायण जाधव, श्री शिवाजी हायस्कूल, मसूर,
श्री अनिल महादेव थोरात, एस आर के लाहोटी कन्या प्रशाला, कराड,
सौ जयश्री रमेश शेंडगे, आत्माराम विद्या मंदिर, ओगलेवाडी,
श्री जीवन मारुती राव थोरात, टिळक हायस्कूल, कराड,
श्रीमती मीना शंकरराव थोरात, प्रेमला काकी चव्हाण माध्यमिक विद्यालय, विजयनगर,
श्री रवि चंद्रकांत जाधव, न्यू इंग्लिश स्कूल, सदाशिवगड,
डॉ सुधीर अण्णासाहेब कुंभार- रयत शिक्षण संस्था. केबिपी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, ढेबेवाडी,
श्रीमती स्मिता विकास रणदिवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाघेरी,
सौ संगीता सारंग भोई, श्री शिवाजी हायस्कूल, कराड,
सौ रुपाली प्रमोद तोडकर, सरस्वती विद्या मंदिर, कराड,
सौ राजश्री प्रदिप रवलेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळे,
श्रीमती मंजुषा शामराव चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिजामाता नगर, वारुंजी,
शुभांगी विलास पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाल (बेघरवस्ती),
सौ पूनम अनिल पवार, नूतन मराठी प्राथमिक शाळा, अगाशिवनगर,
श्री नारायण बाळकृष्ण जगताप- डी के पालकर माध्यमिक विद्यालय, कराड,
श्री सुनील शामराव भिलारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गलमे वाडी,
इत्यादी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. 
        
 रोटरी क्लबचे सेक्रेटरी  रो. डॉक्टर शेखर कोग्नुळकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. रो. किरण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रो. जगदीश वाघ यांनी आभार मानले. रो रघुनाथ डुबल, मनीष जैन यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रो राहुल पुरोहित यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment