Sunday, October 11, 2020

बॉलिवूडचा महानायक,महान अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस ; त्यांच्या विषयी जाणून घेऊया थोडक्यात...

कराड
बॉलिवूड चा महानायक अमिताभ बचचन यांची लोकप्रियता कायम आहे. बिग बींनी जवळपास १८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. आज बिग बींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊ बच्चन यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी..

११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. जन्मापूर्वी त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. परंतु त्यांचं हे नाव बदलून अमिताभ असं ठेवण्यात आलं. अमिताभ म्हणजे असा प्रकाश जो कधीही कमी होत नाही. त्यामुळे बिग बींचं अमिताभ हे नामकरण करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांच्या आईमुळे त्यांची पावलं रंगभूमीकडे वळली आणि याच जोरावर ते मुंबईमध्ये आले.

अमिताभ यांनी मुंबई गाठल्यानंतर ‘भुवन शॉ’, ‘सात हिंदुस्तानी’ हे त्यांच्या कारकीर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट होते. चित्रपट गाजविणाऱ्या अमिताभ यांना ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर ‘जंजीर’, ‘कुली’, ‘लावरिस’, ‘त्रिशूल’, ‘खून-पसीना’, ‘कालिया’, ‘अग्नीपथ’, ‘काला पथ्थर’, ‘डॉन’ या चित्रपटांमध्ये ते झळकले. विशेष म्हणजे हे सारेच चित्रपट त्याकाळी प्रचंड हिट ठरले. 

आपल्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये अमिताभ यांनी सिनेसृष्टीवर राज्य केलं. त्यांचा अभिनय आजही चाहत्यांना भूरळ पाडतो. बीग बींबद्दल सगळ्यात खास गोष्ट म्हणजे वयाची 78 वी आली तरी ते आजही काम करत आहेत

अमिताभ बच्चन यांना सात हिंदुस्थान चित्रपटाने पहिला पुरस्कार मिळवून दिला.तसेच 1984 ला पद्मश्री, 2001 मध्ये पद्माभूषण, आणि 2015 मध्ये पदमविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच 14 फिल्म पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. 1984 ते 1987 काळात ते लोकसभेवर निवडून गेले होते. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment