Friday, October 2, 2020

केंद्रातील भाजप सरकारचा सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांकच्या वतीने जाहीर निषेध...

कराड
केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी व कामगार विधेयक बिल विरोधात सातारा जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभाग व कराड तालुका काँग्रेस यांच्यावतीने कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जाहीर निषेध करण्यात आला.
 यावेळी उत्तरप्रदेश येथील हाथरसमधील पीडितेच्या दुःखात बुडालेल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पायी चालत निघालेले काँग्रेसचे नेते  राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा जाहीर निषेधही करण्यात आला.यावेळी सातारा जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष झाकीर पठाण, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे,तसेच डॉ इंद्रजित मोहिते  इंद्रजित चव्हाण, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने,मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे,  सुनील बरिदे अशोकराव पाटील, विद्याताई थोरवडे,मंगला गलांडे, मलकापूरच्या नगरसेविका गीतांजली पाटील,आनंदी शिंदे, स्वाती तुपे, तसेच सागर जाधव,  किशोर येडगे मोहन शिंगाडे आनंदराव सुतार दीपक लिमकर अमित जाधव वैभव थोरात दिग्विजय सूर्यवंशी 
राजेंद्रचव्हाण,आजितपवार,अभिजितचव्हाण,शिवाजीराव मोहिते शहाजी पाटील गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment