Sunday, October 11, 2020

आज जिल्ह्यात 422 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 11 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 422 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 56 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
56 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 5, उपजिल्हा रुग्णालय फलटण 10, पानमळेवाडी 20, महाबळेश्वर 16, पिंपोडा 5 असे एकूण 56 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 162111
एकूण बाधित -- 41611
घरी सोडण्यात आलेले ---33533 
मृत्यू -- 1364
उपचारार्थ रुग्ण --  6714
00000

No comments:

Post a Comment