सातारा दि. 10 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 359 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 511 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*511 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 54, कराड 29, उपजिल्हा रुग्णालय फलटण 16, कोरेगाव 44, वाई 52, खंडाळा 24, रायगांव 27, पानमळेवाडी 48, महाबळेश्वर 8, पाटण 16, दहिवडी 22, खावली 29, म्हसवड 27, पिंपोडा 4 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 111 असे एकूण 511 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -- 160455
एकूण बाधित -- 41295
घरी सोडण्यात आलेले --- 33111
मृत्यू -- 1346
उपचारार्थ रुग्ण -- 6838
00000
No comments:
Post a Comment