Tuesday, October 13, 2020

कराडच्या नगराध्यक्षांनी केले चार कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार...राजकारण राजकारणाच्या ठिकाणी होत राहील...मात्र..."या' रणरागिणीचा अभिमान प्रत्येकाला असायलाच हवा...

कराड
येथील नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे या ग्रेट नगराध्यक्षा आहेत हे त्यांनी आज स्वतः सिद्ध केलं.त्यांनी स्वतः येथील स्मशान भूमीत जाऊन चार कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.कदाचित   कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला नगराध्यक्षा असाव्यात...

नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे या शहराने निवडून दिलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आहेत.त्यांची ही पहिलीच राजकीय इनिंग असली तरी त्या समाजकारणाच्या मैदानात यशस्वी होताना दिसत आहेत. सध्याच्या कोरोना संकटात येथील  कर्मचार्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनेकजण यशस्वी प्रयत्न करताना दिसत आहेत...पण...त्यासाठी कोरोना मृतदेहावर एका महिला नगराध्यक्षांनी अंत्यसंस्कार करताना  पाहण्याचा क्षण कदाचित विरळाच... आणि तो कराडकरांनी आज अनुभवला...म्हणून कराडच्या नगराध्यक्षा ग्रेट असल्याच्या प्रतिक्रिया शहरातून आपसूकच येऊ लागल्या ...
स्वतः नगराध्यक्षा कोरोना पोसिटीव्ह झाल्या होत्या,त्यावर मात करून त्या काही दिवसात सातत्याने लोकांसाठी कोरोनाशी लढताना शहरातून दिसल्या. शहराला सॅनिटायझिंग करणे असो अथवा रुग्णांना सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणे असो,किंवा विलीगिकरण कक्षाच्या निर्मितीपासून ते रुग्णाला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याच्या कुटुंबियांना धीर देणे असो...अशा सर्वच जबाबदारीच्या कक्षा त्यांनी लीलया पेलल्याचे शहराने पाहिले ...त्यांचे कामातील सातत्य कमालीचे आहे.त्यांचे पती तसेच सर्वच कुटुंबीय कोरोना बाधीत असतानाही त्या आपल्या कुटुंबाबरोबरच शहराचीही काळजी घेताना दिसल्या... एकदा स्वतः कोरोना आजारातून बाहेर पडून देखील निडरपणे स्वतःच्या जीवाची परवा न करता पुन्हा त्यात झोकून देऊन काम करणं  म्हणजे काय असते...हे त्यांच्या कामाचा झपाटा बघितला की सगळ्यांनाच समजल...मधल्या काळात कोरोनाचा प्रभाव अधिक वाढला असता मी मी म्हणणारे बाहेर दिसत नव्हते...ही वस्तुस्थिती होतीच...अशा परिस्थितीत एक महिला नगराध्यक्षा कोरोनाशी लढताना पहिल्यापासून सातत्याने दिसत आहेत...आणि हे कौतुकास्पद नक्कीच आहे...आज तर त्यांनी कमालच केली...त्यांनी स्वतः पी पी इ किट घालून चक्क चार कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले...यातून पालिका कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य नक्कीच वाढले, मात्र कराड शहराची मान आज अभिमानाने उंचावलीदेखील... कोरोनाच्या संकटकाळात आपले कर्तव्य धाडस आणि निष्ठा याच्या जोरावर जनतेच्या सेवेत वाहून घेऊन कसे काम केले जाते याचे या नगराध्यक्षा म्हणजे उत्तम उदाहरणच ठरल्या ...राजकारण राजकारणाच्या ठिकाणी होत राहील... मात्र कोरोना मृतदेहाला अग्नी देणारी महिला नगराध्यक्षा कदाचित सम्पूर्ण महाराष्ट्राने आज प्रथमच पाहिली असावी ..आणि हे कराडकरांसाठी अभिमानास्पद नाही का...? आहे...जरूर आहे...कोरोनाच्या संकटामुळे शहरावर येणाऱ्या प्रत्येक कसोटीवर मात करण्यासाठी जीवाची परवा न करता त्याच संकटावर तुटून पडणाऱ्या या रणरागिणीचा अभिमान प्रत्येकाला असायलाच हवा...

No comments:

Post a Comment