Sunday, October 25, 2020

आ पृथ्वीराजबाबा पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर; पीक नुकसानीची केली पाहणी...

कराड: 
कराड दक्षिण मधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, कर्मचारी तसेच मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवानेते इंद्रजित चव्हाण तसेच पाचवड गावचे शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

नुकताच माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा प्रशासनाकडून घेतला आहे तरी शेतकऱ्यांच्या बांधावर स्वतः जाऊन बाधित क्षेत्राची पाहणी आ चव्हाण यांनी आज केली. आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रत्यक्ष भेटीने शेतकऱ्यांना आधार मिळाला यावेळी शेतकऱ्यांना पृथ्वीराज बाबांनी आधार देत सांगितले कि, कराड दक्षिण मधील अतिवृष्टीने बाधित जवळपास सर्व क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत काही पंचनामे राहिले आहेत का हे तपासून मुख्य अहवाल शासनाकडे पाठविला जाईल व लवकरात लवकर आपणा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल. त्याचबरोबर अतिवृष्टीने कुठे रस्ता व पूल खचले आहेत का याचीसुद्धा पाहणी आ चव्हाण यांनी केली व त्यानुसार अहवाल लवकरात लवकर बनवून शासनाकडे पाठवावा अश्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

No comments:

Post a Comment