Thursday, October 22, 2020

आज जिल्ह्यांतील 575 जणांना डिस्चार्ज

सातारा दि. 22 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 575 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 331 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
331 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 41, कराड येथील 10, फलटण येथील 15, कोरेगाव येथील 51, वाई येथील 31, खंडाळा येथील 18, रायगाव येथील 17, पानमळेवाडी येथील 21, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 9, खावली येथील 27, पिंपोडा येथील 27, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 59 असे एकूण 331 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 176051
एकूण बाधित -- 44410
घरी सोडण्यात आलेले -- 38268
मृत्यू -- 1466
उपचारार्थ रुग्ण -- 4676
00000

No comments:

Post a Comment