Friday, October 9, 2020

आज जिल्ह्यांतील 557 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 9 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 557 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 475 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 27, कराड 15, उपजिल्हा रुग्णालय फलटण 27, कोरेगाव 37, वाई 30, खंडाळा 69, रायगांव 37, पानमळेवाडी 39, मायणी 9, महाबळेश्वर 12, दहिवडी 33, खावली 14, तळमावले 33, म्हसवड 19,  पिंपोडा 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 66 असे एकूण 475 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -- 158771
एकूण बाधित -- 40981
घरी सोडण्यात आलेले --- 32752
मृत्यू -- 1332
उपचारार्थ रुग्ण -- 6897
00000

No comments:

Post a Comment