Monday, October 26, 2020

एकनिष्ठ विचाराचे पाईक - नगरसेवक अप्पा माने...

कराड
 राजकारणात अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे राजकारणी दिसून येतात.त्यामध्ये इकडून तिकडे उड्या मारणारे, कधी याला तर कधी त्याला आपल्या सोयीने जवळ करणारे,तर काही स्वयंभू असतात मात्र, एकनिष्ठ असणाऱ्याना राजकारणात वेगळी उंची असते,.आणि त्याच पठडीतील, आमदार पृथ्वीराजबाबा यांच्याशी एकनिष्ठ राहून शहरात यशस्वी समाजकारण करणारे नगरसेवक राजेंद्र उर्फ अप्पा माने यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे...

अप्पा माने हे ग्राऊंडवर काम करणारे नगरसेवक म्हणून शहरात परिचित आहेत.कोणाला कसलीही अडचण असली तरी तो कोणत्या पार्टीचा आहे ,आपला आहे का परका आहे... असला विचार न करता एक माणूस म्हणून ते लोकांच्या मदतीला उपयोगी पडण्याचे पुण्य नेहमीच आपल्या पदरात पाडून घेतात.
खरतर पालिकेतील कोणतेही सत्तेतील पद त्यांच्याकडे नाही...तरी... केवळ आपल्या व्यक्तिगत इमेजवर ते लोकांना आपलेसे वाटतात...लोकांची कामे करतात...काँग्रेस पक्षाचे नेते  म्हणूनदेखील त्यांचा लौकिक आहे.वेळप्रसंगी पदरमोड करून ते  जनतेसाठी मदतीला धावून जातात अशीही त्यांची ओळख आहे....  जनतेतून निवडून येण्याची त्यांची स्वतंत्र ताकद त्यांच्या प्रभागात नक्कीच आहे.... ते आ पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत. राजकारणात राहून लोकांशी बांधिलकी जपणारा माणूस विचारधारेशी एकरूप व तत्वनिष्ठ असतो हे त्यांच्या संपर्कात आल्यानंतर जरूर समजते.शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते यशस्वी समाजकारण देखील करत आहेत आणि म्हणूनच, जिकडे सत्ता तिकडे चांगभलं म्हणणारे राजकारण सगळीकडेच होत असताना दुसरीकडे मात्र,अप्पा माने यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक त्यांचे विरोधकदेखील करताना दिसतात...संधीसाधू राजकारणात त्यांना अजिबात इंटरेस्ट नाही...सडेतोड आणि जे काही आहे ते रोखठोक तोंडावर बोलणारे अप्पा माने त्यांच्या संवेदनशील वृत्तीमुळे स्वाभिमानी जनतेच्या गळ्यातील अल्पावधीतच ताईत बनले आहेत...त्यांच्यासारख्या निस्वार्थी,निगर्वी आणि माणुसकी जपणाऱ्या नेतृत्वाचा आज वाढदिवस साजरा होत आहे... त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा...

No comments:

Post a Comment