Friday, October 2, 2020

कराड पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मुख्याधिकारी डाके यांनी केला "अनोखा' सन्मान.....

कराड
येथील पलीकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके हे आपले वेगळेपण वारंवार दाखवून देत आहेत आणि त्यातून त्यांच्या माणुसकीचे दर्शनही कराडकराना सातत्याने होत आहे... नुकतीच घडलेली ही घटना...
नगरपालिकेचे कर्मचारी दत्तात्रय रामचंद्र गजरे यांचा नुकताच सेवा निवृत्तीनिमित्त पालिकेत सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी गजरे यांना आपल्या खुर्चीत बसवून त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त अनोख्या पद्धतीने सन्मान केला. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना दोन तास मुख्याधिकारी पदाचे कामकाज पाहण्याची संधी दिली. डाके यांनी केलेला हा अनोखा सत्कार त्यांचे मनाचे मोठेपण अधोरेखित करणारा आहे आणि पालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात या सत्काराची नोंद नक्कीच ठेवलीही जाणार  आहे. 
           दत्तात्रय गजरे हे नगरपालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. गुरुवारी ते रीतसर सेवानिवृत्त झाले. यावेळी  मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी गजरे यांना बोलावून घेतले. व त्यांना आपल्या खुर्चीवर बसऊन अचमबीत करणारा असा अनोखा बहुमान त्यांना अनपेक्षितरीत्या दिला. मुख्याधिकाऱ्यांच्या कडून मिळालेल्या या अनोख्या सन्मानाने दत्तात्रय गरजे अक्षरशः भारावून गेले.आपल्या आजपर्यंतच्या केलेल्या सेवेचे चीज झाले अशी त्यांची भावना झाली आणि त्यांना त्यावेळी गहिवरून आले. गजरे यांना आपल्या खुर्चीवर बसूऊन दोन तास पालिकेचे कामकाज पाहण्याची संधी डाके यांनी त्यांना दिली. 
मुख्याधिकारी डाके हे येथे रुजू झाल्यापासून त्यांच्या कामाचे वेगळेपण सातत्याने कराडकराना पाहायला मिळत आहे.त्यांचे काम जरी कर्तव्य भावनेने ते करत असले तरी त्यांची शहरातील लोकांबद्दलची आपुलकी वारंवार त्यांच्या एकूणच विचारसरणीतून व कामकाज करण्याच्या पद्धतीतून स्पष्ट दिसते आहे. आपले कर्तव्य व माणुसकी याची सांगड घालून काम कसे करावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुख्याधिकारी डाके  आहेत अशी शहरातून चर्चा नेहमी असते.त्यांनी याच भावनेने यापूर्वीही काम केले आहे. आदर्श मुख्याधिकारी म्हणून त्यांचा गौरव देखील झाला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने हा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आणि येथील पाकिकेच्या परंपरेचा सुसंस्कृतपणा जपला, त्याला खरोखरच तोड नाही...अशी शहरात चर्चा सुरू आहे...

No comments:

Post a Comment