कराड: अतिवृष्टी व पुरामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. या पंचनाम्यातून एकही बाधित शेतकरी राहू नये, व अतिवृष्टीमधील सर्व बाधितांना सरकारकडून मदत मिळेल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिवृष्टी संदर्भात झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आज आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा घेतला यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जि प सदस्य निवासराव थोरात, शंकरराव खबाले, मंगला गलांडे, विद्याताई थोरवडे, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष झाकीर पठाण, पं स सदस्य उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, वैशाली वाघमारे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजित गुजर, प्रदीप जाधव, नितीन थोरात, तानाजी चौरे, इंद्रजित चव्हाण, वैभव थोरात, सतीश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हि मदत मतदारसंघातील अतिवृष्टीने बाधितांपर्यंत पाहोचण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. अतिवृष्टीने बाधित क्षेत्राचा पंचनामा केला असून तो अहवाल शासनाकडे पाठविला आहे. बाधितांना लवकरच शासकीय मदत मिळेल.
No comments:
Post a Comment