कराड
रयत संघटनेचे नेते जिल्हा परिषद सदस्य ऍड उदयसिह पाटील यांची काँग्रेसच्या राज्य कार्यकारणीवर पदाधिकारी म्हणून लवकरच वर्णी लागणार असल्याचे स्वतः उदयदादानीच माध्यमातून दिलेल्या एका प्रतिक्रियेतून स्पष्ट केले आहे.त्यामुळे कराड दक्षिणसाठी आता काँग्रेसला तगडा नेता मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पृथ्वीराजबाबा व काका गटाचे मनोमिलन येथील मलकापूर निवडणुकीवेळीच झाले, त्यामुळे ऍड उदयसिह पाटील यांच्या काँग्रेसच्या राज्य नेतेपदी वर्णी लागणार हे त्याचवेळी नक्की झाले होते. दरम्यानची झालेली विधानसभा निवडणूक त्यातून बाबांना उदयदादांच्या उमेदवारी रूपाने झालेली मदत, आणि त्यातूनच अतुलबाबाना दक्षिणेतून उचल न खाऊ देण्यासाठीच झालेलं राजकारण, भविष्यात उदयदादांना दक्षिणचे नेतृत्व म्हणून पुढे करण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. आता फक्त त्याबाबाबतची औपचारिकता बाकी आहे.यानिमित्ताने दक्षिणेत अतुलबाबा आणि उदयदादां यांचा एकमेकविरुद्धचा विधानसभेसाठीचा संघर्ष यापुढे पहायला मिळणार हे मात्र नक्की आहे !!
माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी कराड दक्षिणचे नेतृत्व 35 वर्षे केलं.कृष्णेच राजकारण देखील त्यांनी आपल्या आमदारकीच्या राजकारणाभोवती फिरवत नेहमीच घडवून आणले. त्यांनी ठरवेल तोच अध्यक्ष त्यावेळी कृष्णेवर होत असे अशी चर्चा होती.कधी मोहिते तर कधी भोसले यांच्या गळ्यात चेअरमन पदाची माळ काकांच्या भूमिकेतून पडल्याचे त्यावेळी अनेकदा स्पष्ट झाले आहे. काकांनी यशस्वी राजकारण करत मतदारसंघात 35 वर्षे नेतृत्व करून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रबल्यात काँग्रेसची आपली जागा मात्र फिक्स करून ठेवली होती. मागील निवडणुकीतून मात्र पृथ्वीराजबाबा याना काँग्रेसने तिकीट देऊन दक्षिण च्या राजकारणातून काकांच्या अस्तित्वाला डिवचले गेले. काका,बाबा गटाचे अंतर्गत राजकारण त्याला कारणीभूत होते.त्यानंतर मात्र अनेक घडामोडी घडल्या आणि डोक्यावरून बरेच पाणी गेले मात्र कालांतराने काका,बाबा यांचे जमले...त्याचेही कारण असे की, त्यांच्या दुफळीमुळे अतुल भोसलेंनी दक्षिणेत आपली जोरदार मुसंडी मारली होती ...तर...दुसरे असे की ...हे दोघेही दिगगज काँग्रेस विचाराचे एकनिष्ठ असल्याने आपल्या वादामुळे वर्षानूवर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेला दक्षिण मतदारसंघ "हात'चा जाऊ नये यासाठी एकत्र आले पाहिजे... या विचारानेही काका बाबा यांचं जमलं, अशीही चर्चा असते... आणि मलकापूर निवडणुकीचे निमित्त साधून या मनोमिलनाचा नारळ फुटला... काका गटाने या निवडणुकीतून केलेल्या मदतीचे फळ म्हणून आताच्या घडीला मनोहर शिंदे यांच्याकडे मलकापूरची सत्ता आहे हे मान्यच करावे लागेल.त्यानंतर झालेल्या विधानसभेसाठी काँग्रेसचे आमंदार म्हणून पृथ्वीराजबाबा निवडूनही आले.त्यावेळी त्यांचे पहिले अभिनंदन याच निवडणुकीतून त्यांच्याच विरोधात उभे राहिलेले उदयदादा यानी केले व याही निवडणुकीतील त्यामागचे इंगित निकालानंतर लोकांना कळले. सदर निवडणुकीत काका आणि भोसले यांच्या ग्रामीण मतात विभाजन होऊन अतुलबाबा आमदारकीला पडले.दादांची उमेदवारी या निवडणुकीत नसती तर काकांची ग्रामीण मते बाबाना पडणे शक्य नव्हते...तर ती मते अतुलबाबाना मिळाली असती अशी परिस्थिती होती.... अतुलबाबाना रोखण्यासाठी व उदयदादांना दक्षिणेत पाय रोवण्यासाठी मोठी खेळी काका बाबा यांच्या मनोमिलनाने उदयदादांच्या उमेदवारीने त्यावेळी खेळली. आणि ती यशस्वि देखील झाली, म्हणजेच निवडणूक तिरंगी होणे गरजेचे होते आणि ती दादांना उभे करून तशीच घडवून आणली... अशी त्यावेळी चर्चाही झाली......पृथ्वीराजबाबा आमदार झाले ..आणि उदयदादा त्यांचे अभिनंदन करायला पुष्पगुच्छ घेऊन सर्वप्रथम त्यांच्या बंगल्यावर पोहोचले...
पृथ्वीराजबाबा हे काँग्रेसचे अत्यन्त निष्ठावान नेते म्हणून देशात परिचित आहेत तर काका याना देखील त्यांच्या विधानसभेतील पराभवानंतर अनेक इतर राजकीय पक्षाकडून मंत्रीपदासाहित अनेक संधी आल्यातरी काका आपल्या काँग्रेस विचारधारेला न सोडणारे व काँग्रेसच्या विचाराचेच पाईक असल्याचे त्यांनी तटस्थ राहून दाखवून दिले. वेगवेगळ्या सत्तेच्या मोहाला ते आपली तत्व सोडून बळी पडले नाहीत. अनेकदा वेगवेगळ्या व्यासपीठावरून पृथ्वीराज बाबांनी देखील काकांच्या जेष्ठत्वाचा मान राखत "तेही काँग्रेसचे नेतेच आहेत, काँग्रेसच्या विचाराचे कट्टर पाईक आहेत' असा खूपवेळा आदरयुक्त उल्लेख केला आहे.त्यांची तब्बेत बरी नाही कळल्यानंतर आवर्जून काकांना साताऱ्यात जावून त्यांची भेट घेऊन पृथ्वीराजबाबा व काका यांनी यावेळी सातारा जिल्ह्यासह कराड दक्षिण च्या काँग्रेसच्या नव्याने करण्यात येणाऱ्या उभारणीसाठीची पायाभरणी करणारी चर्चा मंत्री सतेज पाटील यांच्या साक्षीने केली व उदयदादांच्या नावावर त्यांना यशस्वीरित्या सक्रिय करण्याबाबत दोघांचं एकमत झालं...आता याच विषयाला पुढे नेत ऍड उदयसिह पाटील यांचा जिल्ह्याचा काँग्रेस नेता होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नुकतेच उदयदादांदेखील माध्यमांशी बोलताना म्हणाले की काँग्रेसचे राज्य पातळीवरील नेते मला जी पक्षाची जबाबदारी देतील ती मी यशस्वीरीत्या पार पाडणार आहे...याचाच अर्थ आता सातारा जिल्ह्यातील काँग्रेसला चेहरा मिळाला आहे व या चेहऱ्याला लोकनेत्याचा वारसा व वलयही आहे, आणि पक्षीय पातळीवरील पृथ्वीराजबाबा यांचेसाहित अनेक दिगगजांचे पाठबळ व आशीर्वाद देखील आहे...मग...देर किस बात की..उदयदादां तुम आगे बढो... एवढाच काँग्रेसजनांचा आवाज दक्षिणेत आता घुमायचा बाकी आहे,. त्यानंतर मात्र उदयदादा आणि अतुलबाबा यांचा विधांसभेसाठीचा एकमेकविरुद्धचा संघर्ष कराड दक्षिणेत पहायला मिळणार हे मात्र नक्की आहे !!
No comments:
Post a Comment