सातारा दि.19 (जिमाका): सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या कोविड-19 रुग्णांचे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यास अधिन राहुन शेखर सिंह, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी , सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणी येथील “घोडेस्वारी” तसेच महाबळेश्वर येथील “वेण्णा लेक बोट क्लब येथे नौका विहार” पर्यटनाच्या बाबीसाठी खुले करण्यास तसेच व्यवसाय सुरु करण्यास खालील सूचना व मार्गदर्शक सूनचेस अधिन राहुन मान्यता देत आहे.
घोडेस्वारी : नगरपालिकेने घोडेस्वारांना 1 दिवसाआड 50 टक्के घोडस्वारांचे नियोजन करुन देणे बंधनकार राहिल. दररोज प्रत्येक पर्यटकांची नोंद नोंदवहीत ठेवणे घोडेस्वारांवर बंधनकारक राहिल. जी पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली नाहीत अशा ठिकाणी घोडेस्वारी करण्यास मनाई राहील. घोडेस्वारीसाठी वारपण्यात येणाऱ्या घोड्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी घोडे चालक अथवा मालक यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. घोडेस्वारीसाठी नागरपरिषद परवाना व बॅचक्रमांकं असणे आवश्यक आहे. देण्यात येणरा बॅचक्रमांक दर्शनी भागामध्ये लावणे बंधनकारआहे. संघटनेमार्फत घोड्यांना क्रमांक देण्यात व दिलेल्या क्रमांकानुसाराच (Queue System) घोडेस्वारी करणे बंधनकारक आहे. कोणत्या ही प्रकारची गर्दी होणर नाही याची खबरदारी घेण्यात यावी. ज्या पर्यटकांचे तापमान 38.0 किंवा 100.4 पेक्षा जास्त आहे व ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असल्यास अशा पर्यटकांना घोडेस्वारी करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा. तापमान जास्त अथवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास संबंधित व्यक्तीस रुग्णालयामध्ये संदर्भित करावे. ज्या पर्यटकांना कोविड-19 सदृश्य लक्षणे उदा. सर्दी, खोकला इ. लक्षणे असल्यास घोडेस्वारीसाठी प्रतिबंध करण्यात यावा व दवाखान्यामध्ये संदर्भित करावे. संघटनेने येणाऱ्या पर्यटकांचे नांव, पत्ता, वय, Co morbidity, तापमान, SpO2 व मागील 14 दिवसांच्या प्रवासाची माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात यावी. घोडे चालक व मालक यांची प्रत्येक 15 दिवसांनी कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे व चाचणी केलेबाबतचा अहवाल नगरपरिषद कार्यालयामध्ये सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता परवाना रद्द करण्यात येईल. घोडेस्वारी करतांना घोडेव्यावसायिक यांनी मास्क, ग्लोब्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करावा. पर्यटकांना देखील मास्क ग्लोब्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक आहे. घोडेस्वारीच्या दरम्यान मानवी संपर्क होत असलेल्या वस्तू निर्जंतूक करण्यात याव्या. ज्या ठिकाणी घोडे स्वारीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी घोडेस्वारी करण्यात यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रस्त्यावर घोडेस्वारीच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी घोड्यांची विष्टा पसरणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. वेळोवेळी शासनमार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात यावे.
वेण्णा लेक बोट कल्ब येथे नौका विहार : नगरपालिकेने दर दिवाशी एका बोटीच्या फक्त दोन फेऱ्या होतील एवढ्याच फेऱ्यांचे नियोजन करावे. बोटिंग क्लबच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे, बोटी सॅनिटाईज करणे,पर्यटकांना सुरक्षिततेच्या सुचना देणे, मास्क व सॅनिझाटयझरचा वापर इ. सर्व नियोजन करण्याची जबाबदारी नगरपालिकेची राहील. बोटिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना सामाजिक अंतर राखणेबाबत सूचित करण्यात यावे व रांग पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. बुकिंग ऑफिसच्या ठिकाणी सामाजिक अंत राखण्यासाठी 1 मीटर अंतरावर खुणा करुन घेणे. ऑनलाईन बुकिंग करीता प्राधान्य देण्यात यावे. बुकिंग ऑफिस येथे पर्यटकांना ई-पेमेंट सुविधा देण्यात यावी. बोटिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांचे प्रवेशद्वाराजवळ सामाजिक अंतर राखून तपासणी करण्यात यावी. यामध्ये पर्यटकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यात यावी. बोटिंगसाठी यणाऱ्या पर्यटकांचे नाव, पत्ता,वय, Co morbidity, तापमान, SpO2 व मागील 14 दिवसांच्या प्रवासाची माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात यावी. ज्या पर्यटकांचे तापमान 38.0 किंवा 100.4 पेक्षा जास्त आहे व ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असल्यास अशा पर्यटकांना घोडेस्वारी करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा. तापमान जास्त अथवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास संबंधित व्यक्तीस रुग्णालयामध्ये संदर्भित करावे. ज्या पर्यटकांना कोविड-19 सदृश्य लक्षणे उदा. सर्दी, खोकला इ. लक्षणे असल्यास घोडेस्वारीसाठी प्रतिबंध करण्यात यावा व दवाखान्यामध्ये संदर्भित करावे. तिकीट विक्रीच्या ठिकाणी असलेल्या कर्मचारी यांनी मास्क, ग्लोब्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. बोटमन यांनी मास्क, फेस शिल्ड, ग्लोब्ज, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. पर्यटक यांनी मास्क, फेस शिल्ड, ग्लोब्ज, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. तिकीट मिळाल्यानंतर सामाजिक अंतर पाळून बोट पर्यटकांना देण्यात यावी. जेट्टीवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. एका बोटीमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा. एका बोटीमध्ये जास्तीत जास्त 6 पर्यटक व 1 चालक यापेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये. नौका विहाराच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. सहली अथवा मोठया समूहांना (ग्रुप) बोटिंगसाठी परवानगी देण्यात येऊ नये. प्रत्येक फेरीच्या वेळी बोट निर्जंतुक करणे बंधनकारक आहे. वेळोवेळी शासनमार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात यावे.
या आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधितंविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल.
000000000
*काळी पिवळी टॅक्सी व्यवसाय सुरु करण्यास सशर्त परवानगी*
सातारा दि.19 (जिमाका): सातारा दि.19 (जिमाका): सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या कोविड-19 रुग्णांचे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यास अधिन राहुन शेखर सिंह, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी , सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील “काळी पिवळी टॅक्सी” व्यवसाय सुरु करण्यास खालील सूचना व मार्गदर्शक सूचनेस अधिन राहून मान्यता दिली आहे.
काळी पिवळी टॅक्सी व्यावसायिक यांनी बुकिंग ऑफिस येथे प्रत्येक पर्यटकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासणी करणे आवश्यक आहे. ज्या पर्यटकांचे 38.0 अंश किंवा 100.4 पेक्षा जास्त आहे अशा पर्यटकांना काळी पिवळी टॅक्सी मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. ज्या पर्यटकांना फ्लू सदृश्य लक्षणे उदा. सर्दी, खोकला इ. लक्षणे असल्यास प्रवासासाठी प्रतिबंध करण्यात यावा व संबंधित पर्यटकास दवाखान्यामध्ये संदर्भित करण्यात यावे. पर्यटकांची नोंद रजिस्टरमध्ये ठेवणे बंधनकारक आहे. एका टॅक्सीमध्ये एका वेळी एकाच कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा. एका टॅक्सीमध्ये एका वेळी 3 + 1 पेक्षा जास्त प्रवासी संख्या असू नये. टॅक्सीचालक यांचे बाजूला पर्यटकांना बसण्यास प्रतिबंधन करावा. टॅक्सीचालक व प्रावासी यांच्यामध्ये पार्टीशन असणे आवश्यक आहे. टॅक्सीचालक यांनी टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक फेरीवेळी निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे. वेळोवेळी शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात यावे.
या आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधितंविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल.
00000
*इनडोअर हॉलमधील खेळांच्या सुविधा सशर्त सुरु*
सातारा दि.19 (जिमाका): सातारा दि.19 (जिमाका): सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या कोविड-19 रुग्णांचे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यास अधिन राहुन शेखर सिंह, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील क्षेत्रामध्ये ज्या खेळांमध्ये सुरक्षित अंतर राखून खेळता येणारे इनडोअर खेळ उदा. बॅडमिंटन, लॉनअेनिस, टेबल टेनिस, बॉक्सींग इ. खेळांच्या सरावाकरिता खालील मार्गदर्शक सूचना व अटी शर्तींच्या अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील क्षेत्रांमध्ये क्रिकेट, खो-खो, इ. मैदानी खेळ तसेच ज्या खेळामध्ये सुरिक्षत अंतर राखून खेळता येणारे इनडोअर खेळ उदा. बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सींग इ. खेळांच्या सरावाकरिता पुढील मार्गदर्शक सूचना व अटींच्या अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे. सदर आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी सरावाकरिता आवश्यक तेवढ्याच व मर्यादित खेळाडूंना प्रवेश देण्यात यावा व सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकार राहील. वय वर्ष 10 वर्षाच्या आतील मुलांना तसेच 65 वर्षावरील व्यक्तींना प्रवेशास मनाई करण्यात येत आहे. सरावास येणाऱ्या खेळाडू तसेच कर्मचारी यांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्यात यावी. इनडोअर हॉलमध्ये सराव करताना दारे, खिडक्या उघडी ठेवावीत व ए.सी.चा वापर टाळावा. ए. सी. वापरणे अनिवार्य असल्यास त्या यत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे, शक्य असल्यास पोर्टेबल हाय एफीशियंसी एअर क्लिनर बसवावेत. मैदानावर तसेच इनडोअर हॉल येथे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे. खेळासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रीडा साहित्यांचे वापरण्यापूर्वी व वापरानंतर निर्जंतुकीकरण करणे बंधनकार आहे. मैदानाच्या प्रवेशद्वारावर तसेच मैदानावर व इनडोअर हॉल येथे ठिकठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी करण्यात यावी. तसेच कर्मचाऱ्यांनी मास्क , ग्लोव्हज, फेसशिल्ड यासारख्या सुरक्षा साधनांचा वापर करावा. संबंधित आस्थापनांनी कोविड-19 संदर्भात लक्षणे नसल्यास खेळाडूंना सरावासाठी प्रवेश देण्यात यावा. ताप, सर्दी, खोकला यासरखी लक्षणे असल्यास प्रवेश देण्यात येवू नये. काँटॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने सरावास येणाऱ्या खेळाडूंचे नाव, संपर्क क्रमांक, ई मेल आयडी, दिनांक, वेळ इ. माहितीच्या नोंदी दररोज ठेवण्यात याव्यात. काँटॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने खेळांडूंची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देणेबाबत त्यांची ना-हरकत घेण्यात यावी. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने तसेच क्रीडा विभागाकडून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधितंविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल.
0000
No comments:
Post a Comment