सातारा दि. 6 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 476 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 619 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*619 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 57, कराड 18, उपजिल्हा रुग्णालय फलटण 30, कोरेगाव 35, वाई 63, खंडाळा 33, रायगांव 70, पानमळेवाडी 64, मायणी 3, महाबळेश्वर 30, पाटण 14, दहिवडी 24, खावली 53, पिंपोडा 13 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 112 असे एकूण 619 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -- 152431
एकूण बाधित -- 39757
घरी सोडण्यात आलेले --- 31229
मृत्यू -- 1273
उपचारार्थ रुग्ण -- 7255
00000
No comments:
Post a Comment