वेध माझा ऑनलाईन।
सोमवारी दिल्लीमध्ये आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, दरम्यान त्यानंतर आता या आंदोलनावर अभिजीत दिपके यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कॉकोरच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते. या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अजूनही दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरूच आहे. यावर आता अभिजीत दिपके यांच्या आई अनिता दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘लाठीचार्ज व्हायला नव्हता पाहिजे, लेकर तिथे आंदोलन करण्यासाठी गेले होते. आज एक महिना झाला तिथे त्यांचं आंदोलन सुरू आहे. तिथे कोणतीही घटना झाली नाही आणि यांनी लाठीचार्ज केला. लेकर काय दहशतवादी आहे का ते? 18 -20 वर्षांची मुलं आहेत ती. तुम्ही दहशतवाद्यांना सोडून देतात आणि तुम्ही लेकरांवर लाठीचार्ज करता, सरकारने हे योग्य केलं नाही.
सरकारने आधी त्यांच्या मागण्या ऐकायच्या होत्या, काय ते बघायचं होतं, आणि नंतर काय तो निर्णय घ्यायचा होता. आमचे लेकर तिथे काय मार खायला गेले होते का? असा सवाल अभिजीत दिपके यांची आई अनिता दिपके यांनी सरकारला केला आहे.
No comments:
Post a Comment