कराड शहरातील महत्वाच्या असलेल्या विषयांवर मंगळवारी घेण्यात आलेली नगरपालिकेची मासिक सभा चांगलीच वादळी ठरली. विविध विषयांवरील चर्चा व त्यावरून झालेली वादावादी सध्या शहरात चर्चेत असतानाच सोमवार पेठेमध्ये रस्ता कमी करण्यावरून यावेळी सुरुवातीलाच जोरदार चर्चा झाली भाजपचे नगरसेवक अजय पावसकर यांनी तो विषय मांडला. त्यावेळी लोकांची घरे त्या रस्त्यात जात आहेत. त्यामुळे ती घरे जाऊ नये यासाठी रस्त्याची रुंदी कमी करावी अशी मागणी त्यांनी केली. नगराध्यक्षांनी या रस्त्यांचा अभ्यास करून अधिकार्यांनी अहवाल द्यावा, अशा सूचना दिल्या.
दरम्यान यावेळी प्रेक्षक गॅलरी बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते...कराडच्या नागरिकांना ही गॅलरी खुली करून द्या अशी मागणी करत बराचवेळ याठिकाणी या नगरसेवकांनी आग्रह धरून ठेवला होता...
याचदरम्यान नगरसेवक अल्ताफ शिकलगार यांनी एका विषयावर बोलताना फालतू असा शब्द वापरला त्यामुळे सभागृहात भाजप नगरसेवकांनी त्यांना शब्द मागे घ्या अस म्हणत त्याठिकाणी मोठी वादावादी झालेली पहायला मिळाली
सदर सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांची उपस्थिती होती.
दरम्यान यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी नेकलेस रोडला विरोध होण्यामागचे कारण विचारत सत्ताधार्यांवर आरोप केले. विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी अतुलबाबा यांची आणलेली कामे तुम्हाला करायची नाहीत का... असा सवाल सत्ताधार्यांना विचारत याबाबतचा खुलासा विचारला असता... त्याला प्रत्युत्तर देताना सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली... नेकलेस रस्ता आणि पर्यटन विकास काय होणार... याबाबत कोणताही खुलासा अधिकृत शासकीय विभागाकडून झालेला नाही. पालिकेने वारंवार मागणी करूनही त्याचे प्रेझेंटेशन दिले नसल्यामुळे हा ठराव तहकूब करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष यादव यांनी सांगितले.
विरोधी पक्ष नेते वाटेगावकर यांनी आमदारांनी दिलेले प्रकल्प व निधी वापरायचेच नाही असं काही ठरलं आहे का? असा प्रति प्रश्न केल्यानंतर पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार चकमक उडाली
नगराध्यक्ष यादव यांनी त्यात तोडगा काढत हा साडेसहा कोटींचा प्रकल्प आहे. हा संवेदनशील विषय असल्यामुळे आपण तो सध्या तहकूब करत आहोत असे सांगितले. यावर भाजपच्या नगरसेवकांनी याला आमची मंजुरी आहे असे स्पष्ट केले. सत्ताधारी गटाकडुन विषय तहकूब करण्यात आला.
मंगळवार पेठेतील मोकळ्या भूखंडावर एक कोटी वीस लाखांची बाग विकसित करण्याचा विषयही या सभेत तहकूब करण्यात आला. त्यावरही भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका मांडत बाग होण्यास काही हरकत नाही अशी भूमिका घेतली. त्यावर सत्ताधारी गटात बागेला विरोध नाही मात्र तेथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करायचे आहे त्यातून नगरपालिकेला उत्पन्नाचा सोर्स चालू होईल त्यामुळे हा विषय तहकूब करण्यात येत आहे अशी भूमिका मांडली.
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती सदन मध्ये सुधारणा करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी साडेतीन कोटी रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर झाल्याची घोषणा केली. दरम्यान प्रशासकीय कालावधीमध्ये झालेल्या घनकचरा प्रकल्प, रस्ते आणि अन्य कामाची चौकशी होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.
तसेच सभेच्या शेवटी शहरातील प्रभाग निहाय बसवण्यात येणारे सीसीटीव्ही तसेच शहरातील नो फ्लेक्स झोन एरिया लवकरच
जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले
No comments:
Post a Comment