Saturday, October 17, 2026

कराडमध्ये उद्या (रविवारी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन ;दुपारी चार वाजता कराडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून संघाच्या संचलनास होणार प्रारंभ : मोठ्या संख्येने उपस्थित रहा; संघाचे कराडशहर कार्यवाह निलेश घार्गे यांचे आवाहन :

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कराड शहरात रविवारी (दि. १८) श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी चार वाजता कराडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान,मुळीक पेट्रोल पंपाजवळ, बुधवार पेठ येथून संघाच्या संचलनास प्रारंभ होणार आहे

सायंकाळी सहा वाजता स्वर्गीय सौ. वेणुताई चव्हाण सभागृहात हा उत्सव होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्राचे सहक्षेत्र प्रचारक चिंतनभाई उपाध्याय मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मे. शिवाजी आप्पा सराफ उद्योग समूहाचे संचालक प्रवीणकुमार जगताप उपस्थित राहणार आहेत. संघाच्या शताब्दी वर्षात समाजसंपर्काच्या माध्यमातून मिळालेली ऊर्जा घेऊन यंदाचा विजयादशमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

हिंदू समाजात विजयादशमी उत्सवातून विजयाची वृत्ती जागृत व्हावी, भारताला सर्वोच्च वैभव प्राप्त व्हावे, समाजाची सामूहिक शक्ती वृद्धिंगत व्हावी आणि ‘भारतमाता की जय’ हा जयघोष सर्वत्र दुमदुमावा, या भावनेतून उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, विजयादशमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी चार वाजता कराडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान,मुळीक पेट्रोल पंपाजवळ, बुधवार पेठ येथून संघाच्या संचलनास प्रारंभ होणार आहे. या संचलनाचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, डॉबिवली बँक, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पाटील गल्ली, कन्याशाळा, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, श्री ज्योतिबा मंदिर, कृष्णा नाका आणि राजाराम नगरमार्गे छत्रपती शिवाजी हायस्कूल सोसायटीच्या स्वर्गीय वेणुताई चव्हाण सभागृहापर्यंत राहणार आहे.

या उत्सवाला आणि संचलनाला नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कराडशहर कार्यवाह निलेश घार्गे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment