Monday, May 31, 2021

कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत**जिल्हादंडाधिकारी यांचे 8 जून पर्यंत कडक निर्बंध ; आदेश जारी...

सातारा दि. 31 (जिमाका) : शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत सध्याचा लॉकडाऊन दि. 15 जून 2021 पर्यंत वाढविला आहे. तथापि, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता व जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी सध्यस्थितीत लागू असलेल्या निर्बंधानुसार जिल्हादंडाधिकारी  शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 01 जून 2021 रोजीचे 07.00 वा पासून ते दिनांक 08 जून 2021 रोजीचे 07.00 वा पर्यंत खालीलप्रमाणे सुधारित आदेश जारी केले आहेत.  
 
*कलम 144 आणि संचारबंदी लागू करणे जमाव बंदी व संचार बंदी* 
  सातारा जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणेत येत आहे. या कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा खाली दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे. 
  पुढील नमूद अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील. पुढील अत्यावश्यक बाबींमध्ये उल्लेख केलेल्या सेवा आणि क्रियांना सूट देण्यात आली आहे आणि त्यांच्या हालचाली आणि ऑपरेशन्स प्रतिबंधित नसतील. या आदेशात सूट देणेत आलेल्या बाबी व आस्थापना ( Exemption Category)   यांना सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत परवानगी असेल.

*अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल*
  रुग्णालये ,निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर , मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.  व्हेटरीनरी हॉस्पिटल्स,  अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स. दुध संकलन केंद्रे सकाळी  07.00 ते 09.00 व सायंकाळी 6.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दुध वितरणास परवानगी असेल.  शेती विषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने सकाळी 09.00 ते  दुपारी 03.00 या वेळेत चालू राहतील. तसेच घरपोच सेवा सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी असेल. त्यासाठी ग्राहकांना विक्रेत्यांकडे ऑनलाईन किंवा फोन संपर्काने मागणी करावी लागेल.  शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु राहील.  शीतगृहे व गोदाम सेवा. स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम व सर्व लोकांची इमारतीबाबतची मान्सूनपूर्व कामे. स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा, भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळची कार्यालये  (SEBI) आणि (SEBI) मान्यता प्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा.स्टॉक एक्सचेंज (stock exchanges) डिपॉजिटर्स व क्लिअरींग कार्पोरेशन व (SEBI) कडे नोंदणीकृत असलेले एजंट,  टेलीकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा,  ई – व्यापार फक्त (अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणेसाठी),  प्रसार माध्यमे (Media), पेट्रोल/डिझेल पंप फक्त वर नमूद केलेल्या सुट दिलेल्या वाहनांसाठी व अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने,प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी, माल वाहतूक करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा यासाठी, पेट्रोल/डिझेल पंप 24 तास चालू राहतील. पाणी पुरवठा सेवा,सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, विद्युत व गॅस पुरवठा सेवा, टेलीफोन सेवा. ATM’s सेवा, टपाल सेवा,  लस/औषधे/जीवनरक्षक औषधे सबंधित वाहतूक हाताळणारे कस्टमहाउस एजंट (Custom House Agent/ परवानाधारक  मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स Multi Modal Transport Operators ), कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चा माल व त्याची पॅकेजिंग मटेरियल (Packaging material) ची उत्पादन केंद्रे, रास्त भाव दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीत चालू ठेवणेस परवानगी असेल. औषधे दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या कालावधीत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील औषध दुकाने 24 तास चालू ठेवणेस परवानगी असेल. सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या फळे, भाजीपाला घाऊक खरेदी विक्रीसाठी सकाळी 6.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत चालू राहतील. या कालावधीत फक्त घाऊक व्यापाऱ्यांना खरेदी करता येईल. तेथे किरकोळ ग्राहक व किरकोळ विक्रेता यांना खरेदी करणेस मनाई आहे. घाऊक व्यापारी यांनी किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करावी. सदर ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच कोरोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल., याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी नियोजन करावे व त्याचे पर्यवेक्षण जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा व  संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी करावे. तसेच घरपोच फळ व भाजीपाला सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 या कालावधीत पुरविणेस परवानगी राहील व याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी तथा Incident Commander यांनी नियोजन करावे. या नमूद केलेल्या सेवांची अंमलबजावणी  करणाऱ्या संस्थांनी पुढील बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे. सर्व अंमलबजावणी प्राधिकरण/संस्था यांनी हि बाब विचारात घ्यावी कि, सदर आदेशामध्ये वस्तू व माल यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध/निर्बंध नसून सदरचे प्रतिबंध/निर्बंध हे लोकांच्या हालचालीवर आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळ काळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवे मध्ये गणल्या जातील. 
  *या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेच्या दुकानांनी खालील निर्देशांचे पालन करावे.*
  संबंधीत अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक व कामगार / कर्मचारीव ग्राहक हे कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करतील.  अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उदा. विक्रेता व ग्राहक यांमध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) इत्यादी आवश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर  र.रु  500 /-  इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड - 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना/दुकान बंद केले जाईल. अत्यावश्यक सेवा सबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास / हालचालीस वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.  सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानांच्या दुकान मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करीत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच ,इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) वापरून ग्राहकांशी संवाद साधनेसाठी तयार करावे. जेणे करून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येतील.
*सातारा जिल्हा स्थलसीमा हद्दीत खालील बाबी पूर्णपणे बंद राहतील*–
  व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट बंद राहतील. भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील. वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना बंद राहतील.मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री पूर्णपणे बंद राहतील
रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील. सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापरी दुकाने व    इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. सर्व  बेकरी पदार्थ विक्री पूर्णपणे बंद राहतील. माल वाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, तसेच सदर वाहनांच्या स्पेअरपार्टचा पुरवठा स्पेअरपार्ट दुकाने पूर्णपणे बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाव्दारे विहित केलेल्या सर्व सेवा बंद राहतील. सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) व खाजगी बँका व सहकारी बँका यांचेशी संबंधित फक्त शेतक-यांना खरीप हंगामाचे अनुषंगाने पीक कर्जाचे कामकाज, ATM's मध्ये पैसे भरणे, Cheque Clearance, Data Centre ही कामे कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या कालावधीत चालू राहील. तसेच सदर बँकांचे उर्वरित सर्व कामकाज पूर्णपणे बंद राहील. सदर ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच कोरोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल., याची जबाबदारी संबंधित बँक व्यवस्थापक यांची राहील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिनस्त असलेल्या संस्था व मध्यस्थीच्या समावेशासह स्टँडअलोन प्राइमरी डीलर्स (Intermediariesincluding standalone primary dealers). क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पेमेंट सिस्टम ऑपरेटर (Payment System Operators), RBI ने नियमन केलेल्या बाजारामध्ये सहभागी होणारे वित्तीय बाजार पूर्णपणे बंद राहतील. सर्व नॉन बँकिंग (Non-Banking) वित्तीय महामंडळे पूर्णपणे बंद राहतील. सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था (Micro Finance Institutions) पूर्णपणे बंद राहतील.बांधकाम क्रिया (Costruction Activity) पूर्णपणे बंद राहतील. तथापि, आपत्ती व्यवस्थापनाचे अनुषंगाने मान्सून पूर्व अत्यावश्यक असलेले काम करणेस परवानगी असेल.
*प्रवासी वाहतूक : सार्वजनिक वाहतूक*
  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस वाहतूक जिल्ह्यांतर्गत पूर्णपणे बंद राहील.  इतर सार्वजनिक वाहतूक (उदा.रिक्षा, टैक्सी-4 चाकी) हि अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी पुढील क्षमतेप्रमाणे सुरु राहतील.रिक्षा- चालक+ 2 प्रवासी, टैक्सी (4 चाकी)- चालक+ RTO नियमाच्या 50 % प्रवासी 3. वाहतुकी दरम्यान खालील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. . सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी मास्क चा वापर करणे बंधनकारक असेल. सदर आदेशाचे  उल्लंघन केलेस प्रतिव्यक्ती र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.  टॅक्सी (4 चाकी) मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केला नसेल तर मास्क परिधान न करणारी व्यक्ती व वाहन चालक यांचेकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. प्रत्येक प्रवासा नंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.  सर्व सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणारे कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे आणि कोव्हीड –19 च्या निर्देशांचे फलक लावावे. टॅक्सी व रिक्षा चालक यांनी स्वतःला प्रवाशांपासून प्लास्टिक आवरणाने अथवा इतर आवरणाने अलगीकरण करून घेणे बंधनकारक असेल.  सार्वजनिक वाहतुकीसबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.  रेल्वेच्या सर्वसाधारण बोगीमध्ये (General Compartment) कोणीही उभा राहून प्रवास करणारा प्रवासी नसेल तसेच सर्व प्रवासी यांनी मास्क परिधान केला असलेबाबतची खात्री सबंधित रेल्वे प्राधिकरणाने करावी. रेल्वे मध्ये मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तीकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.  सार्वजनिक वाहतुकीस वरील अटी च्या आधारे परवानगी देत असताना सदरची वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सेवा सुरु राहतील. सदर सेवेमध्ये हवाई सेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या मालवाहतुक सारख्या सेवा, तसेच तिकीट विषयक सेवांचा समावेश राहील.  बस, ट्रेन, विमानाने येणाऱ्या / जाणाऱ्या प्रवाशांना सदर ठिकाणाहून घरी जाणेस अथवा येणेस सोबत तिकीट बाळगणेच्या अटीवर परवानगी असेल.
*खाजगी वाहतूक*:  सर्व खाजगी प्रवासी वाहतूक अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहील. खाजगी बसेस वगळता खाजगी प्रवासी वाहतूक ही फक्त आपत्कालिन किंवा अत्यावश्यक सेवा किंवा वैध कारणासाठी वाहन चालक + प्रवासी आसन क्षमतेच्या 50 % प्रवासी इतक्या क्षमतेने सुरु राहणेस परवानगी असेल. सदरची प्रवासी वाहतूक हि आंतर जिल्हा किंवा आंतर शहर असणे अपेक्षित नाही आणि ती प्रवाशांच्या राहत्या शहरापुरतीच मर्यादित असावी. आंतर जिल्हा किंवा आंतर शहर प्रवासी वाहतूकीस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या किंवा आपत्कालिन वैद्यकीय परिस्थिती किंवा अंत्यसंस्कारासाठी किंवा कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असलेस परवानगी असेल. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करणाऱ्या व्यक्तीस र.रु.10,000 /- इतका दंड आकारला जाईल. खाजगी बसेस ने होणारी आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक खालील प्रमाणे सुरु राहील. बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील. उतरणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस ऑपरेटर द्वारे गृह विलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल. शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे. थर्मल स्कॅनरचा उपयोग करावा आणि जर कोणत्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठवावे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शहरात आगमनाच्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) करण्याचा निर्णय घेतील आणि त्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेची जबाबदारी देतील. सदर चाचणीसाठी लागणारा खर्च, ठरवले असल्यास, प्रवासी किंवा सेवा प्रदाता यांना करावा लागेल. जर एखादा ऑपरेटर सदर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळला तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याच्या विरोधात र.रु.10,000/- इतका दंड आकारील आणि असे उल्लंघन वारंवार केले जात असतील तर त्या ऑपरेटरचा परवाना कोविड-19 परिस्थिती संपेपर्यंत रद्द करण्यात येईल.
*सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना(Exemption Category)*
  *कार्यालये:* पुढील कार्यालयांना सूट असेल केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये . विमा/ वैद्यकीय हक्क सबंधित सेवा. औषध उत्पादन/ वितरण सबंधित नियोजन करणारी कार्यालय
  कोव्हीड-19 सबंधित अत्यावश्यक सेवेशी निगडीत शासकीय कार्यालये वगळता सर्व शासकीय कार्यालये 15% क्षमतेच्या उपस्थितीसह सुरु राहील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील. उपरोक्त नमूद इतर सर्व कार्यालये एकूण कर्मचारी संख्येच्या 15% क्षमतेसह अथवा जास्तीत जास्त 5 व्यक्तींच्या/ कर्मचारी/ अधिकारी यापैकी जे जास्त असेल इतक्या उपस्थितीसह सुरु राहील. या आदेशामधील मुद्दा क्र.2 मध्ये नमूद इतर अत्यावश्यक सेवेतील कार्यालये 50 % पेक्षा जास्त नसेल इतक्या कमीत कमी कर्मचारी क्षमतेसह सुरु राहणेस परवानगी असेल. जे व्यक्ती प्रत्यक्ष अत्यावश्यक सेवा पुरवितात त्यांनी त्यांची कर्मचारी संख्या कमी करावी तथापि अपवादात्मक परिस्थितीत ती 100 % पर्यंत ठेवता येवू शकेल. या कार्यालयामध्ये काम करीत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे. अभ्यागतांना शासकीय कार्यालयात / कंपनीत येणेस प्रतिबंध असेल व शासकीय कार्यालये / कंपनी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस कार्यालया बाहेरील व्यक्तींची उपस्थिती आवश्यक असलेस, अशा बैठकी Online आयोजित कराव्यात. सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*रेस्टॉरंट, बार, हॉटेल* : सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व बार हे एकत्रित बसून सेवा देणेस बंद राहतील. हॉटेल (लॉजिंग) आवारामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत प्रवाशांसाठी रेस्टॉरंट सुरू राहील.  बार सेवा बंद राहतील. कोणासही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवा घेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंटसाठी घरपोच सेवा (Home Delivery) बंद राहतील. बार करीता घरपोच सेवा (Home Delivery) लागू राहणार नाही. हॉटेल्स मधील रेस्टॉरंट हे फक्त निवासी ग्राहकांसाठी सुरु राहील. बाहेरील ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत हॉटेल मध्ये प्रवेशास परवानगी नसेल. बाहेरील ग्राहकांसाठी वरील प्रमाणे प्रतिबंध लागू असेल. हॉटेल मध्ये वास्तव्यास असलेले ग्राहक यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडता येईल. घरपोच (Home Delivery) सेवा देणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. इमारतीमध्ये घरपोच सेवा देत असताना एका पेक्षा जास्त कुटुंबाना देणेत येणार असेल तर  घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस इमारतीमध्ये प्रवेश निषिद्ध असेल. इमारतीमधील अंतर्गत घरपोच सेवा हि इमारतीमधील स्टाफ द्वारे करणेची आहे. घरपोच सेवा देणारे कर्मचारी व इमारती मधील व्यक्तींना राज्यशासनाने व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाई, तसेच सदर आस्थापनेकडून र. रु. 10,000/- इतका दंड आकाराला जाईल. ही कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. रेस्टॉरंट, हॉटेल व बार मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*उत्पादन क्षेत्र* : पुढील नमूद उत्पादन केंद्रे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये सुरु राहतील.  या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा माल तयार करणारे कारखाने पूर्ण क्षमतेनुसार चालू राहतील.  ज्या उत्पादन केंद्रांना, निर्यात पुरवठा आदेशानुसार विहित मुदतीत निर्यात पुरवठा करणे बंधनकारक आहे, अशी उत्पादन केंद्रे सुरु राहतील. ज्या कारखान्यांमध्ये अचानक उत्पादन थांबविता येणार नाही आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय उत्पादन पुन्हा सुरु होवू शकणार नाही अशा सर्व कारखान्यांना कर्मचाऱ्याच्या 50 % क्षमतेच्या उपस्थितीसह काम करता येईल. महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक / उद्योग विभागाने एखादे उत्पादन क्षेत्र / कारखाना सदर नियमाचा गैरवापर करून त्यांचे उत्पादन सुरु ठेवणार नाही याची खात्री करावी. तसेच सदर ठिकाणी राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होत असलेबाबत खात्री करावी. सुरु असलेली उत्पादन केंद्रे जर ऑक्सिजनचा वापर करीत असतील तर ते फक्त अत्यावश्यक सेवेसाठी लागणाऱ्या माल उत्पादनासाठीच असेल याची खात्री करावी. तसेच सदर उत्पादन क्षेत्रातील कर्मचारी / कामगार यांची राहण्याची व्यवस्था कारखाना परीसरामध्येच करणे अपेक्षित आहे. जर ते कारखाना क्षेत्राच्या बाहेर राहत असतील तर त्यांची हालचाल हि शक्यतो (ISOLATION BUBBLE) मध्येच होत असलेची खात्री करावी.
  सर्व कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करूनघ्यावे. जे कारखाने  केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या कार्यस्थळ लसीकरण या अटीमध्ये बसत असतील तर त्यांनी त्यांच्या कामगार / कर्मचारी यांचेसाठी लसीकरणाची व्यवस्था करावी.
  कारखाने व उत्पादन केंद्रे यांना पुढील अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असेल.  कारखाने व उत्पादनकेंद्रामध्ये कामगारांच्या प्रत्येक प्रवेशावेळी शरीराचे तापमान तपासणे बंधनकारक असेल आणि त्यांचेकडून कोव्हीड-19 च्या नियमांचे पालन करून घ्यावे. कारखाने व उत्पादनकेंद्रामध्ये काम करणाऱ्या कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आलेस, कारखाने व उत्पादन क्षेत्र व्यवस्थापनाने सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस पगारासह स्वखर्चाने विलगीकरणामध्ये ठेवावे. ज्या कारखाने/ उत्पादन केंद्रामध्ये 500 पेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी काम करीत असतील अशा कारखाने/ उत्पादन केंद्र व्यवस्थापनाने स्वतःचे विलगीकरण केंद्र उभे करावे. सदर केंद्रामध्ये सर्व मुलभूत सुविधा असाव्यात आणि जर सदर सुविधा कारखाना परिसराच्या बाहेर असतील तर सर्व सुरक्षा उपाय करून कोरोना +ve व्यक्तीस इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता त्या सुविधा केंद्रा पर्यंत घेवून जावे लागेल. जर एखादा कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला असेल तर सबंधित कारखाने/  उत्पादन केंद्राचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण होईपर्यंत बंद राहील.   गर्दी टाळणेसाठी जेवणाच्या व चहाच्या वेळा टप्प्याटप्प्याने ठेवणेत याव्यात. एकाच ठिकाणी जेवणासाठी एकत्र येवूनये. सार्वजनिक स्वच्छता गृहाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणेत यावे. जर एखादा कामगार / कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला तरत्यांस कामावरून न काढता त्यांस वैद्यकीय रजा देणेत यावी. सदर कर्मचारी पूर्ण वेतनासाठी पात्र राहतील.

*वर्तमानपत्रे* / *मासिके*/ *नियतकालिके* : वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असेल. वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके यांची फक्त घरपोच सेवा सुरु राहील. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*करमणूक, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर इ.* :  सिनेमागृहे बंद राहतील.  नाट्यगृहे व सभागृहे बंद राहतील. करमणूक नगरी/ आर्केड्स (Arcades) / व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील. जल क्रीडा स्थळे बंद राहतील.  क्लब (Clubs), जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा संकुले बंद राहतील. वरील आस्थापनांमधील मालक व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.   चित्रपट / मालिका / जाहिरात यांचे छायाचित्रण बंद राहील. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारे सर्व दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील.  सर्व सार्वजनिक ठिकाणे ( उदा. बगीचे, मैदाने व इतर ) बंदराहतील.

*धार्मिक प्रार्थनास्थळे* : सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील. धार्मिक प्रार्थना स्थळांमधील विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सामान्य नागरिकांना धार्मिक प्रार्थना स्थळांना भेटी देणेस मनाई असेल.  धार्मिक प्रार्थना स्थळांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स* :  केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स बंद राहतील. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*शाळा व महाविद्यालये* :  शाळा व महाविद्यालये बंद राहतील.  महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परिक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणामार्फत सातारा जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी घेणेत येणाऱ्या परीक्षांना परवानगी देणेत येत आहे. सबंधित विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सदर परीक्षेबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक असेल.  परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास सदर परीक्षेस व्यक्तीशःउपस्थित राहणे आवश्यक आहे, अशा वेळी परीक्षार्थीस एका प्रौढ व्यक्तीसोबत परीक्षेचे प्रवेश पत्र सोबत बाळगणेच्या अटीवर परवानगी असेल. सर्व प्रकारची खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम* : सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिबंधित असतील.  जास्तीत जास्त 25  नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करणेस परवानगी असेल.  एका हॉल / कार्यालया मध्ये एकच लग्न समारंभ 2 तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत जास्तीत जास्त 25 व्यक्ती / नातेवाईकांचे उपस्थितीत करणेस परवानगी असेल. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करणाऱ्या कुटुंबास र.रु.50,000 /- इतका दंड आकारला जाईल. सबंधित कार्यालय क्षेत्र हे कोव्हीड-19 हि आपत्ती म्हणून घोषित असेल तोपर्यंत बंद करणेत येईल.
ii. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे. लसीकरण होईपर्यंत त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) असणे बंधनकारक असेल. लग्न समारंभाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) नसलेस/ लसीकरण करून घेतलेले नसलेस त्यास प्रत्येकी र.रु.1,000/- व सबंधित आस्थापनेवर र.रु.10,000/- इतका दंड आकारणेत येईल.  दंडात्मक कारवाई नंतरही सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनेची अनुज्ञप्ती रद्द किंवा सदरचे ठिकाण बंद केले जाईल. एखाद्या धार्मिक / प्रार्थना स्थळी विवाह सोहळ्याचे आयोजन करणेत आलेले असलेस, लग्न समारंभ यांना राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणेचे अटीवर परवानगी देणेत येत आहे. अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस प्रतिबंध असेल. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे आणि त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) असणे बंधनकारक असेल.

*ऑक्सिजन उत्पादक* : ऑक्सिजन कच्चा माल असणाऱ्या औद्योगिक प्रक्रियांवर बंदी घालण्यात येत आहे. अशा प्रकारच्या औद्योगिक प्रक्रिया अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असल्यास किंवा अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीनंतर सुरु ठेवण्यात येतील. ऑक्सिजनचे उत्पादन करणारी उत्पादन केंद्रे यांनी त्यांचे उत्पादन आरोग्य विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे वैद्यकीय कारणास्तव आरक्षित ठेवावे. त्यांनी सदर आदेशाच्या तारखेपासून त्यांचे ग्राहक व पुरवठा करण्यात आलेल्या ऑक्सिजनचा अंतिम वापर दिलेल्या निर्देशानुसार प्रसिध्द करावा.  

*ई – व्यापार* :  ई –व्यापारास फक्त या आदेशातील मुद्दा क्र.2 मध्ये नमूद अत्यावश्यक वस्तू व सेवेसाठी परवानगी असेल. सदर आस्थापनांवरील कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जर सदर ई-व्यापार संस्था कंपनी केंद्र शासनाने अधिकृत केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी पत्र असेल तर सदर संस्थेने कॅम्प आयोजित करून त्यांचे सर्व कर्मचारी यांचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे. जे कर्मचारी घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचारीयांचे संपर्कात येत नाहीत त्यांचेसाठी या आदेशातील मुद्दा क्र.5 प्रमाणे कार्यवाही करावी.  इमारतीमध्ये घरपोच सेवा देत असताना एका पेक्षा जास्त कुटुंबाना देणेत येणार असेल तर सदर घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस इमारती मध्ये प्रवेश निषिद्ध असेल. इमारती मधील अंतर्गत घरपोच सेवा हि इमारती मधील स्टाफ द्वारे करणेची आहे. सदर घरपोच सेवा देणारे कर्मचारी व इमारती मधील व्याक्तीयानी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. सदर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाईल, तसेच सदर. सदर कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना अनुज्ञप्ती रद्द केली जाईल.
*सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies)* : कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) मध्ये 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेस सदर सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) ला सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल. अशा संस्थांनी (Societies) संस्थेच्या मेन गेटचे ठिकाणी भेटण्यास येणाऱ्या व्यक्तींच्या माहितीसाठी सदर ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले बाबत फलक लावावा व त्यांचा प्रवेश निषिद्ध करणेत यावा.  सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रास लागू असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करणे सबंधित संस्थेवर बंधनकारक असेल. (उदा. प्रवेश, पत्ता व इतर यावर परीक्षण ठेवणे).  कोणत्याही संस्थेने सदर नियमांचे उल्लंघन केलेस पहिल्या घटनेवेळी सबंधित संस्थेकडून र.रु.10,000/- इतका दंड आकारला जाईल. त्यानंतरही नियमाचे उल्लंघन झालेस स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केलेला जास्तीत जास्त दंड आकारला जाईल. सदरचा वसूल करणेत आलेला दंड हा संस्थांकडून शासन निर्देशांचे पालन होत असलेबाबत पर्यवेक्षणकामी वापरला जाऊ शकतो.  सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांनी त्यांचे आवार / इमारतीमध्ये नियमित प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे शासकीय नियमानुसार लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोना चाचणी अहवाल (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) घ्यावा.
सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका/ नगरपरिषद/नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
00000

1872 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 35 बाधितांचा मृत्यू...

 सातारा दि. 31 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1872 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 35 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 76 (7523), कराड 140 (22193), खंडाळा 86 (10364), खटाव 204 (15788), कोरेगांव 92 (14255),माण 223 (11419), महाबळेश्वर 8 (4016), पाटण 125 (6875), फलटण 523 (26021), सातारा 347 (35221), वाई 37 (11526 ) व इतर 10 (1055) असे आज अखेर  एकूण 166256 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2(168), कराड 8 (643), खंडाळा 1 (135), खटाव 2 (413), कोरेगांव 3 (315), माण 5 (213), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (157), फलटण 1(251), सातारा 11 (1033), वाई 2 (305) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3677 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Sunday, May 30, 2021

कराडात नागरी आरोग्य केंद्राचा भम्पक कारभार ...,लोकांच्या तक्रारी वाढल्या...


वेध माझा ऑनलाइन /अजिंक्य गोवेकर
कराड
 सध्याच्या कोविड संकटात सातारा जिल्ह्यातील रुग्णसंख्येच्या वाढीचे राज्यात रेकॉर्ड झाले असताना दुसरीकडे कराडच्या नागरी आरोग्य केंद्राच्या भम्पक कारभाराचे चित्र शहरासमोर आले आहे याबाबत लोकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत.त्याचीच शहरात सध्या चर्चा आहे...

सातारा जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या कमी होण्याची चिन्हे अजूनतरी दिसत नाहीत यासाठी फक्त लोकांनाच जबाबदार धरले जाते आणि त्याची अमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात... मात्र जखम मांडीला आणि औषध ...शेंडीला... असा काहीसा हा प्रकार होत आहे का ? हे देखील पाहण्याची आता गरज आहे...
कराडच्या अनेक भागामध्ये आयसोलेट पेशंट आहेत त्याठिकाणी या रुग्णांना एकदा आयसोलेट केले की पुन्हा त्यांची साधी चौकशीही या केंद्राच्या डॉक्टर्स कडून होताना दिसत नाही...त्यांना घरी उपचारासाठी दिले जाणारे ट्रीटमेंट किट देखील दिले जात नाही अशा तक्रारी येत आहेत... त्यांपैकी काहीना चक्क एक फॉर्म भरून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचे दाखवले गेले असल्याची चर्चा आहे..हे कशासाठी.? याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही..जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यां अनेकांच्या घराबाहेर कोविड पीसीटीव्ह चा बोर्ड आता का लावला जात नाही ? हा आता नव्याने प्रश्न आहेच...अनेक रुग्ण स्वतः एच आर सी टी करण्याकरिता बाहेर पडत आहेत...कारण या लोकांना चेकिंग ला जाण्यासाठी पालिकेकडून अम्ब्युलन्स मिळत नाही अशी या लोकांची तक्रार आहे...  डॉक्टर्स त्यांच्याकडे फिरकतही नाहीत... विशेष म्हणजे मध्ये पालिकेकडे डॉक्टर्स उपलब्ध नव्हते म्हणून प्रशासन काही विचारले तर डॉक्टर्स उपलब्ध नसल्याची कारणे सांगत होते... आता 3 डॉक्टर्स उपलब्ध असतानादेखील घरोघरी जाऊन चक्क आशा वर्कर्स रुग्णांची तपासणी करताना दिसत आहेत...मग हे डॉक्टर्स करतात काय...? कसला कारभार चाललय हा...? प्रॉपर जबाबदाऱ्या का पेलल्या जात नाहीत ? हे वैद्यकीय काम आशा वर्कर्स लोकांचे आहे का? जिल्ह्यातील कोरोना फक्त लोकांच्या हलगर्जीपणामुळे वाढतो असे बोलताना या आरोग्य केंद्राचा असला कारभारालादेखील तितकाच जबाबदार धरायला नको का ? लोकांना हा कारभार कसा चालू आहे हे त्याशिवाय कळणार तरी कसे ? अशीही चर्चा आहे

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पालिकेचे सी ओ डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपलब्ध तीन डॉक्टर्स पैकी एक येतच नाही...असे सांगितले...तर उरलेले दोन त्यांच्या वेगवेगळ्या वैद्यकीय जबाबदारीच्या कामात असतात असेही ते म्हणाले...अधिक माहितीसाठी याबाबत डॉ कुलकर्णी मॅडम यांच्याशी संपर्क करा म्हणजे बरे पडेल... असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला...त्यांचा नंबर देऊ का ? असेही आपुलकीने विचारले... मात्र सी ओ म्हणून जबाबदारीने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले...

 याविषयी बोलताना डॉ कुलकर्णी यांनी कोरोना पेशंटला एच आर सी टी करण्याकरिता स्वतः बाहेर पडावे लागते हे खूप धोकादायक आहे असे कबूल केले...त्या रुग्णाला पालिकेकडून रुग्णवाहिका मिळत नाही त्यामुळे या रुग्णांना चेकिंगसाठी  स्वतः ला बाहेर पडावे लागत असल्याने  कोरोनाचा प्रसार होण्यास मदत होते का..? आत्तापर्यंत अशा चूका झाल्यामुळे पेशंटच्या संख्येत वाढ झाली असेल... तर याला जबाबदार कोण ? या प्रश्नावर मात्र त्या गप्प बसल्या..
इतर विचारलेल्या प्रश्नबाबतीत सी ओ शी बोलून  घेते असे म्हणून त्यांनी वेळ मारून नेली... मुख्याधिकारी डॉ कुलकर्णीशी बोलून घ्या म्हणतात...डॉ कुलकर्णी सी ओ शी बोलून घेते अस म्हणतात... या दोन्ही अधिकाऱ्यांकडून आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून प्रत्येकवेळी अशीच वेळ मारून नेली जाते... अशी नेहमी चर्चा असते... 
कोविड मुळे शहर व परिसरातील लोकांची अवस्था बिकट असताना अशा प्रकारच्या उडवाउडवीच्या कारभाराची अपेक्षा अजिबात नाहीये...मात्र कारभार यापुढेही असाच होणार असेल तर रुग्णसंख्येच्या बाबतीत कराडचा नंबर मागे कसा राहील ?त्यासाठी लोकांच्या विनाकारण फिरण्याला जसे जबाबदार धरले जाते तसेच काही अंशी या नागरी आरोग्य केंद्राच्या भम्पक कारभारालादेखील जबाबदार धरायला नको का ? अशीही आता चर्चा सुरू झाली आहे...

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू...

मुंबई दि ३०: ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून  त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. 

२९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

*पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील*
  
२०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

*पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :*
 
वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील. 
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील. 
सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती
 व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील 
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील 
दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील
कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल. 
कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते  

*पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :*

वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल. 
उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील. 
दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

*१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश आपल्या माहिती व संदर्भासाठी*

Ø  कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

Ø  यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

Ø  मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.

Ø  स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज  बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

 Ø  दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.

Ø  कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.

Ø  स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48  तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

1990 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1990 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 26 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 75 (7447), कराड 231 (22053), खंडाळा 84 (10278), खटाव 262 (15584), कोरेगांव 250 (14163),माण 209 (11196), महाबळेश्वर 39 (4008), पाटण 158 (6750), फलटण 271 (25498), सातारा 336 (34952), वाई 62  (11489) व इतर 13 (1045) असे आज अखेर एकूण 164463 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 (166), कराड 4 (635), खंडाळा 3 (134), खटाव 4 (411), कोरेगांव 1 (312), माण 1 (208), महाबळेश्वर 1 (44), पाटण 0  (157), फलटण 4 (250), सातारा 3 (1022), वाई 3 (303) व इतर 0 असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3642 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

शाहू चौक मित्र परिवाराच्या वतीने गरजूना धान्य वाटप...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 आत्ताच्या लॉक डाऊन पिरियड मध्ये लोकांच्या पोटाचे अक्षरशः उपासमारीने हाल चालू आहेत अशातच वारांगनाच्या पोटाचा प्रश्न सर्वच घटकांकडून दुर्लक्षित होत असताना येथील शाहू चौक मित्रपरिवाराच्या वतीने या गरीब स्त्रियांना मदतीचा हात देण्यात आला आहे तसेच त्या ठिकाणच्या गरीब गरजू जवळजवळ शंभर लोकांना या मित्रपरिवाराने गहू तांदळाचे वाटप करून त्यांच्या भुकेचा विचार केला आहे

सध्या कोरोनाचा पीक पिरियड सुरू असल्याने लॉक डाऊन पडले आहे त्यामुळे अर्थातच सर्वच काम धंदे बंद अवस्थेत आहेत त्यामुळे ज्यांचे हातावर पोट अवलंबून आहे त्यांचे अक्षरशः बघवत नाहीत असे हाल सुरू आहेत त्यांच्या मदतीला येथील शाहू चौक मित्र परिवार धावून गेला आहे 
आज शाहू चौक मित्र परिवाराच्या वतीने स्टॅण्ड परिसरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या व त्याच ठिकाणच्या हातावर पोट असणाऱ्या जवळपास शंभर गरीब लोकांना गहू तांदूळ धान्य वाटप करण्यात आले शाहू चौक मित्र परिवाराने या कोरोना काळात अनेक प्रकारची मदत लोकांना करत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे रुग्णांना बेड मिळवून देणे असो, इंजेक्शन ची उपलब्धता असो, ऑक्सिजन ची सोय करून देणे असो... हा ग्रुप लोकांच्या मदतीला नेहमीच धावून गेला आहे
मागील काही दिवसांपूर्वी या ग्रुप ने कोरोना पेशंट च्या नातेवाईकाना जेवणाची सोय करून देत माणुसकी जपली होती सध्या लॉक डाऊन चा फटका अनेक गरिब गरजूना बसत असल्याने त्यांच्या पोटाचा विचार करून याच ग्रुप ने आज धान्य वाटप केले... या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
सध्याच्या रोना काळात गरजू व्यक्तीला मदत हवी असल्यास आमच्या ग्रुपशी येथील शाहू चौक येथे संपर्क साधावा असे आवाहन शाहू चौक परिवराच्या वतीने करण्यात आले आहे

Saturday, May 29, 2021

राज्य सरकारला ६ जूनपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा कोविड-बिविड बघणार नाही : संभाजीराजे आक्रमक...

वेध माझा ऑनलाइन 
शुक्रवारी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही, असं थेट आव्हानच संभाजीराजे भोसले यांनी दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्याने राज्यातील राजकारण पुन्हा तापण्यास सुरवात झाली आहे. त्यातच आता आरोप प्रतिआरोप देखील सुरु झाले आहेत. भाजपचे खासदार संभाजीराजे नियमित महाराष्ट्र दौरा करून वेगवेगळ्या लोकांची भेट घेत आहेत.  यामध्ये शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मला आज स्पष्ट सांगायचं आहे. 6 जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. त्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले. जर 6 जूनपर्यंत यावर काही कारवाई केली नाही. तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरून जाहीर करू.

शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना असं टाकलं असतं का? त्यामुळे 6 जूनआधी आम्हाला बोलावून निश्चित असा काही कार्यक्रम तुम्ही दिला नाही, तर नंतर आम्ही कोविड-बिविड बघणार नाही. मी स्वत: 5 मे रोजी निकाल लागला तेव्हा सगळ्यांना शांत ठेवलं. नाहीतर महाराष्ट्र पेटला असता. पण आम्ही किती शांत बसायचं? असं ते म्हणाले.

2257 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 24 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2257 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 24 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 58   (7372), कराड 213 (21922), खंडाळा 82 (10194), खटाव 247 (15322), कोरेगांव 126 (13913),माण 75 (10987), महाबळेश्वर 4 (3969), पाटण 90 (6592), फलटण 955(25266), सातारा 317 (34716), वाई 71 (11427) व इतर 19 (1032) असे आज अखेर एकूण 162712 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (164), कराड 5 (631), खंडाळा 0 (131), खटाव 3 (407), कोरेगांव 2 (311), माण 2 (207), महाबळेश्वर 0(43), पाटण 1  (157), फलटण 1 (246), सातारा 9 (1019), वाई 1 (300) व इतर 0 असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3616 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Friday, May 28, 2021

साताऱ्यात पत्रकार व ना शंभूराज देसाई यांच्यात अजितदादांसमोरच खडाजंगी...

वेध माझा ऑनलाइन
सातारा
ना अजितदादा नुकतेच साताऱ्यात आले आहेत सातारा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने व येथील प्रशासन व लोकप्रतिनिधी कोरोना आटोक्यात आणण्यात अयशस्वी ठरल्याने अजितदादांना शासन म्हणून आता जिल्ह्यात लक्ष घालावं लागलं आहे ही बाब खरतर लाजिरवाणी आहे...याच पार्शवभूमीवर एकीकडे आ निलेश लंके यांच्या कामाची पद्धत चांगली आहे तर दुसरीकडे इथल्या नेते मंडळींचे काम सातारा जिल्ह्यात दिसत नाही नुसतं फित कापत उदघाटन करत फिरण्याचे उद्योग या नेत्यांनी केले त्यांच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा अशी मागणी येथील पत्रकारांनी आज केली असता पत्रकार व ना शंभूराज देसाई यांच्यात अजितदादासमोरच खडाजंगी झाली 

साताऱ्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्राधुरभाव रोखण्यात येथील प्रशासन एकदम फेल ठरलंय  सातारा जिल्हा राज्यात व देशात कोरोना रुग्णसंख्येबाबतीत चिंताजनक स्थितीत आहे अशी आकडेवारी सांगते... पारनेर चे आमदार निलेश लंके यांचे सध्याच्या कोरोना संकटात काम प्रभावी झाले आहे त्यांच्या कामाची पद्धत चांगली आहे याच पार्शवभूमीवर सातारा जिल्ह्यातील नेते मंडळींच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यानी आढावा घ्यावा... जिल्ह्यातील एखाद्या दुसऱ्या आमदाराचे काम सोडले... तर इतर कोणी काम केले नाही...काहीजण फक्त फित कापत उदघाटन करत फिरताना दिसले...त्यांच्या कामाचा आढावा घ्या असे पत्रकारानी अजितदादांना सांगितले  यावेळी ना शंभूराज देसाई म्हणाले... माझ्या भागात येऊन बघा... आम्ही काम केलय, म्हणून सांगतोय...प्रत्येकाचा कामाचा पॅटर्न वेगळा असतो... जिल्ह्यातील आमदारांनी काय केले विचारता...? याच मुद्यावरून यावेळी पत्रकार व शमभुराज देसाई व्याच्यात जोरदार खडाजंगी झाली... काहीवेळाने त्याठिकाणी उपस्थित आ मकरंदआबा पाटील व स्वतः अजितदादा यांनी हा विषय संपवला... दरम्यान आम्ही जिल्ह्यातील जनतेसाठी बोलत आहोत आम्ही कोणाचे नाव घेतले नाही असेही त्यावेळी पत्रकारांनी सांगितले... 

2528 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 30 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2528 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 30 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 50 (7314), कराड 172 (21709), खंडाळा 95 (10112), खटाव 167 (15075), कोरेगांव 146 (13787),माण 159 (10912), महाबळेश्वर 39 (3965), पाटण 67 (6502), फलटण 1253 (24311), सातारा 308 (34498), वाई 59 (11356 ) व इतर 13 (1013) असे आज अखेर  एकूण 160554 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(164), कराड 5 (626), खंडाळा 0 (131), खटाव 2 (404), कोरेगांव 2 (309), माण 4 (205), महाबळेश्वर 1(43), पाटण 1 (156), फलटण 1(245), सातारा 13 (1010), वाई 1 (299) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3592 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Thursday, May 27, 2021

2675 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 27 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2675 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 125 (7264), कराड 228 (21537), खंडाळा 135 (10017), खटाव 283 (14908), कोरेगांव 158 (13641),माण 131 (10753), महाबळेश्वर 15 (3926), पाटण 111 (6435), फलटण 1071 (23058), सातारा 343 (34190), वाई 64 (11297 ) व इतर 11 (1000) असे आज अखेर  एकूण 158036 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(164), कराड 9 (621), खंडाळा 1 (131), खटाव 8 (402), कोरेगांव 4 (307), माण 2 (201), महाबळेश्वर 0(42), पाटण 0 (155), फलटण 0(244), सातारा 9 (997), वाई 0 (298) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3562 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

"कृष्णा' कारखान्याची निवडणूक स्थगित करा...पुढे ढकला... नंतर योग्य वेळी घ्या...कोरोनाच्या पार्शवभूमीवर म न से शहर अध्यक्ष सागर बर्गे यांची मागणी...


वेध माझा ऑनलाइन
 कराड
  यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूकीची प्रक्रिया सुरू झालेली पाहून नागरिकांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर दैनंदिन जीवनावर निर्बंध घालण्यात येत असताना निवडणूकांसारखे कार्यक्रम राबविले जात असतील तर यासारखे दुर्दैव नाही आत्ताच्या परीस्थितीला कृष्णेची होणारी निवडणूक स्थगित करावी व पुढे ढकलून नंतर योग्य वेळी घ्यावी अशी मागणी म न से शहर अध्यक्ष सागर बर्गे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना केली आहे

 निवेदनात पुढे म्हटले आहे... कोरोना संसर्ग संकटाने अवघे समाजजीवन अडचणीत आले आहे. कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कडक टाळेबंदी सारखा कटू प्रयोग राबविणे कमप्राप्त झालयं.समाजजीवन हादरुन गेलयं मात्र तरीही कोरोनाचे गांभीर्य समजून नागरिकांनी ते अपरिहार्यपणे स्वीकारले आहे. टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे.नागरिकांचाही प्रतिसाद लाभत आहे.
व्यापारी,शेतकरी,फेरीवाले,मजूर,कामगार,विद्यार्थी,कलाकार अशा अनेकजण कोरोनावर मात करण्यासाठी कटिबध्द आहेत.असे असतानाही कराड तालुक्यात निवडणूक होत आहे. हा विद्यमान परिस्थितीशी विरोधाभास आहे. 
असणारे कोरोनाचे गांभीर्य टिकवून ठेवायचे असेल तर निवडणूका पुढे ढकलणे ही  काळाची गरज आहे. कारण  या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये येणारे सांगली सातारा जिल्ह्यातील मतदार निवडणुकीत राबणारे शासकीय यंत्रणेतील कर्मचारी या सर्व लोकांच्या जीवाशी खेळ तर होत नाही ना ? नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुका तसेच  पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर तेथे वाढलेला कोरोना चा प्रादुर्भाव पाहता ही सध्या होऊ घातलेली कृष्णा कारखान्याची निवडणूक स्थगित करून पुढे योग्य वेळी घ्यावी..
'कृष्णा' निवडणूकीत उतरणारे मान्यवर हे समाजातील संवेदनशील नेते आहेत. जनतेच्या उज्वल  भविष्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. या सर्व नेत्यांनीही निवडणूक स्थगित करण्याचा आग्रह धरुन आपण जनतेच्या भल्यासाठी निवडणूकीचा काही काळापरता का होईना त्याग करु शकतो असा निर्णय घेऊन जनतेप्रती असणारी काळजीचे भावना सिद्ध करावी असेही प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

Wednesday, May 26, 2021

2156 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 40 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2156 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 40 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 94  (7139), कराड 227 (21309), खंडाळा 161 (9882), खटाव 324 (14625), कोरेगांव 181 (13483),माण 138 (10622), महाबळेश्वर 11 (3911), पाटण 81 (6324), फलटण 408 (22087), सातारा 437 (33886), वाई 82 (11233) व इतर 12 (989) असे आज अखेर एकूण 155490 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 (164), कराड 4 (612), खंडाळा 4 (130), खटाव 6 (394), कोरेगांव 3 (303), माण 2 (199), महाबळेश्वर 0(42), पाटण 4  (155), फलटण 2(244), सातारा 9 (988), वाई 4 (298) व इतर 0 असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3529 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Tuesday, May 25, 2021

कृष्णा निवडणुकीसाठी विद्यमान संचालकांसह 6 अर्ज दाखल

वेध माझा ऑनलाइन
कराड
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर सुमारे १२७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.


सांगली जिल्ह्यातील कडेगाव पलूस शिराळा आणि वाळवा या चार तालुक्यांचा सातारा जिल्ह्यातील कराड तालुका कार्यक्षेत्र असणारे यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीस मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी सत्ताधारी डॉक्टर सुरेश भोसले गटाकडून विद्यमान संचालक धोंडीराम जाधव यांनी वडगाव हवेली - दुशेरे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर याच गटातून कुसुर येथील विश्वास आत्माराम शिंदे, विंग येथील  तानाजी पांडुरंग खबाले  आणि  कोडोली येथील  गजानन सुभाष जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी कारखान्याच्या वडगाव हवेली - दुशेरे सर्वाधिक चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

तर अन्य दोन उमेदवारी अर्ज रेठरे हरणाक्ष - बोरगाव आणि रेठरे बुद्रुक - शेणोली या गटातून दाखल करण्यात आले आहेत. वाळवा तालुक्यातील बहे गावचे संतोष भगवान दमाने यांनी तर रेठरे बुद्रुक येथील महेश भास्कर कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्याच दिवशी सुमारे १२७ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी दिली आहे.

2364 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 25 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2364 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 66 (7045), कराड 302 (21082), खंडाळा 228 (9721), खटाव 359 (14373), कोरेगांव 133 (13302),माण 192 (10484), महाबळेश्वर 11 (3900), पाटण 54 (6243), फलटण 562 (21679), सातारा 316 (33549), वाई 116 (11151 ) व इतर 25 (977) असे आज अखेर  एकूण 153506 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 4(162), कराड 6 (608), खंडाळा 2 (126), खटाव 7 (388), कोरेगांव 1(300), माण 2(197), महाबळेश्वर 0(42), पाटण 1 (151), फलटण 0(242), सातारा 8 (979), वाई 2 (294) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3489 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Monday, May 24, 2021

1 जून पासून राज्यात लॉक डाऊन होणार शिथिल ; आरोग्यमंत्री ना राजेश टोपेंनी दिले संकेत...

वेध माझा ऑनलाइन
1 जूनपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे घटते प्रमाण, त्याच्यासोबतच लसीकरणाचं नियोजन यामुळे राज्यातील अनेक गोष्टी 1 जूनपासून सुरु होतील असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

राज्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण घटून 10 टक्क्यांपेक्षा खाली आले, तर टप्प्याटप्प्याने अनेक नियम शिथिल केले जाऊ शकतात. राज्यात ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत सरकारने 14 एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर केला होता.त्यानंतर कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली होती, असं राजेश टोपे म्हणाले होते.

"कृष्णा' कारखाना निवडणूक जाहीर...

वेध माझा ऑनलाइन
कराड
सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुका कार्यक्षेत्र असलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. उद्यापासून म्हणजेच २५ मे पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. २९ जून रोजी मतदान होणार असून १ जुलैला मतमोजणी होणार आहे अशी माहिती राज्य सहकारी प्राधिकरण सचिव यशवंत गिरी यांनी दिली.

2648 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 31 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2648 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 31 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 47 (6979), कराड 182 (20880), खंडाळा 362(9493), खटाव 566(14014), कोरेगांव 212(13169),माण 207(20292), महाबळेश्वर 39 (3889), पाटण 109(6189), फलटण 515 (21162), सातारा 311 (33333), वाई 84 (11035 ) व इतर 14 (952) असे आज अखेर  एकूण 151387 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 5(158), कराड 3(602), खंडाळा 0 (124), खटाव 8 (381), कोरेगांव 4(299), माण 0(195), महाबळेश्वर 0(42), पाटण 0 (150), फलटण 1(242), सातारा 7 (971), वाई 3 (292) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3456 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Sunday, May 23, 2021

जाहिरातबाजी न करता लोकांना मदत करण्याची गरज...सध्याच्या कोविड संकटात लोकप्रतिनिधींकडून कराडकरांची अपेक्षा...


वेध माझा ऑनलाइन
कराड
सातारा जिल्हा कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत राज्यात चर्चेत आहे कराड शहर व तालुक्याची रुग्णसंख्या देखील कमी होत नसल्याचे चित्र आहे आता येथील नेते मंडळींनी पुढे होऊन याबाबत काम करण्याची वेळ आली आहे. त्यापैकी काहीजण काम करताना दिसत आहेत मात्र जे घरात बसून आहेत त्यांच्यावर लोकांचे लक्ष आहे या पुढारी म्हणवणार्यानी आता या संकटात बाहेर पडून ठोस कार्य करण्याची गरज आहे त्यासाठी महत्वाची आहे या संकटात लोकांसाठी काम करण्याची इच्छाशक्ती...

माजी नगरसेवक आणि विद्यमान भाजपा चे  सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मागील कोविड संकटकाळात 25 बेड चे कोविड सेंटर सुरू करून गरिबांना मोफत उपचार दिले होते सध्या भाजपा चे राज्यात सरकार नाहीये त्यामुळे त्यांना सर्व सुविधा स्वतःच्या ताकदीवर कराव्या लागल्या आणि त्यांनी त्या केल्या देखील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके, भाजपा आमदार महेश शिंदे यांचीही याबाबतीत अशी उदाहरणे देता येतील यांनी पदरमोड करून रस्त्यावर उतरून लोकांसाठी या कोविड काळात झोकून काम केल्याचे सम्पूर्ण राज्याला माहीत आहे...सध्याच्या या कोविड संकटकाळात दुसरी लाट हाहाकार माजवत असताना मात्र कराड शहर व परिसरातील काहीजण सोडले तर इतर पुढारी म्हणवणारे शहरातील नगरसेवक  किंवा तालुक्यातील नेते लोकांसाठी काम करण्याचे धाडस करताना का दिसत नाहीत ? हा प्रश्न लोकांना आहेच...प्रत्यक्ष काम न करता केवळ आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यावर अनेकांचा भर मात्र दिसतोय... त्याची जाहिरातबाजी होताना दिसतेय...प्रत्यक्ष काम करताना मात्र काही मोजकेच लोक जे राजकारणात नाहीत असे योध्ये दिसत आहेत... मग राजकारणी लोक फक्त मते मागायला आणि केवळ जाहिरातबाजी करायलाच पुढे येणार का?एखादे कोविड सेंटर किंवा इतर सुविधा का राबवू शकत नाहीत ?तर याना फक्त लोकांसाठी काहीतरी आम्ही करतोय एवढं दाखवायचय प्रत्यक्ष काहीच करायचं नाहीये हे आता लोकांना समजू लागलंय...दुसरीकडे लोकडाऊन आहे तरी पेशंट कमी होत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे प्रशासनाने संबंधित तज्ञांशी चर्चा करून काहीतरी दुसरी उपाययोजना करणेही त्याचबरोबर गरजेचे आहे कारण या लॉक डाऊन ने लोकांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र निर्माण होऊ लागलय याचाही विचार होणे गरजेचे आहे...

सध्याचा काळ हा कोविड संकटाचा पीक पिरियड आहे असे डॉक्टर्स सांगत आहेत मागेदेखील असाच काळ लोकांनी अनुभवला अशावेळी लोकांची अपेक्षा असते की आपल्या दारात मते मागायला जे लोक येतात त्यांनी आता घरात न बसता जनतेच्या सर्वतोपरी मदतीला यावं...राज्यात अनेक ठिकाणी असे राजकारणी रस्त्यावर उतरलेही आहेत...लोकांना सगळी मदत करत आहेत... मात्र कराडात काहीजण सोडले तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकांसाठी कोणी काही करताना दिसत नाहीयेत...फक्त मी बेड मिळवून दिला एवढंच काम आणि त्याची पब्लिसिटी त्याहीपेक्षा मोठी असे चित्र सध्या दिसतय आणि मोबाईल च्या माध्यमातून फक्त या लोकांची जाहिरातबाजी सुरू आहे... आम्ही लोकांसाठी काहीतरी करतोय एवढंच दाखवत त्यातही राजकारणाचा वास यावा हाच हेतू दिसतोय लोकांना मात्र हे अपेक्षेत नाही...
मागील कोविड संकटात येथील भाजपा चे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी 25 बेड चे कोविड सेंटर यशस्वी चालवून अनेक गोरगरिबांना या आजारातून मुक्त करण्यात वाटा उचलला राज्यात सत्ता नसल्याने शासनाने त्यांना कोणतीही मदत पुरवली नाही तरी त्यांनी स्वतःच्या ताकदिवर हे धनुष्य पेललं असे आणखी काहीजण नेते आहेत त्यापैकी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके असतील कोरेगावचे आमदार महेश शिंदे असतील,खुपजण या अडचणीच्या वेळी लोकांप्रति आपलं कर्तव्य समजून घराबाहेर पडून लोकांसाठी रस्त्यावर उतरले आहेत  मात्र इथले काहीजण पुढारी म्हणवणारे कराडात अद्याप का काहीच करू शकले नाहीत? काहीजण तर घरातून देखील बाहेर दिसत नाहीत...सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत यापैकी कराडात कोणी लोकांसाठी ठोस असे का केले नाही...असा लोकांना प्रश्न आहे... पैसे भरून कोविड सेंटर उभी आहेत त्याचा उपयोग गरिबाला होत नाही...येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्कॅनिंग मशीन धूळ खात पडलेय त्याची दुरुस्ती करूनही त्याचा अद्याप गरिबाला उपयोग होत नाही... त्याठिकाणी कोणी तज्ञ डॉक्टर नाही..सुविधांची बोंब... असे असताना त्याबाबत कोणी पुढारि काही करताना दिसत नाही... मात्र सध्या गरज नसलेली उचापत शहरातूंन चालू आहे  म्हणजेच  आताच्या घडीला लोकांना महत्वाची गरज खासदार फँडातूंन होणाऱ्या "रस्त्याची' आहे की कोविड रुग्णसेवेची ? मग हे गरज नसताना का चाललंय आणि कशासाठी..?  कोविड रुग्णसेवेचे सध्याच्या संकटात काय काम करता येईल का? याचा विचार या रस्त्याच्या कामापेक्षा मोठा नाही का? मग लोकसभा नेतृत्व म्हणून तो का केला गेला नाही ? असा सवाल लोक विचारत आहेत...दुसरीकडे महिना होऊन गेला अद्याप लॉक डाऊन आहे आणि रुग्णसंख्या म्हणावी त्या प्रमाणात कमीही होत नाहीये म्हणून प्रशासनाने तज्ञांशी सल्लामसलत करुन याबाबत दुसरी उपाययोजना करणे अपेक्षित आहे  तरीपण  उद्योग धंदे बंद असल्याने काही घटकांवर उपासमारीची वेळ आल्याचे दिसतंय मागील संकटात अनेकांनी या लोकांना वेगवेगळी मदत केली तसेच याही वेळी या घटकांना मदत करण्याकरिता उपाययोजना झाल्या पाहिजेत...अनेकठिकानी लहान मुले व वृद्धांचे अक्षरशः खूप हाल सुरू आहेत...

दरम्यान,कृष्णा हॉस्पिटल,सह्याद्री,अशी हॉस्पिटल्स आपलं योगदान देत आहेत मात्र राजकारण्यांनी आपली उंची वापरून लोकांसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी पाऊल आता उचलले पाहिजे घरातून बाहेर पडले पाहिजे काहिठिकानी बेड मिळत नाहीत,काही ठिकाणी त्यासंबंधीची ट्रीटमेंटची वानवा आहे या सगळ्यावर मात देण्यासाठी स्वतःला वेळप्रसंगी पैशाची चाट लावून घेऊन किंवा इतर स्पॉन्सर मिळवून पुढारी म्हणवणाऱ्यांनी मग ते कोणत्याही पार्टीचे असोत,त्यांनी कराड व परिसराला कोरोनामुक्त करण्यासाठी कम्बर कसली पाहिजे त्यासाठी हे नाही... ते  नाही...अशी सोंग अजिबात नकोत...राजकारण सोडून या अडचणीच्या वेळी आपण लोकांसाठी खरंच काहीतरी ठोस केलं पाहिजे अशी मनापासूनच्या इच्छाशक्तीची गरज आहे... सत्ता असो... नसो...आपण यांच्या दारात मते मागायला जातो,आता याच लोकांना मदत केली पाहिजे अशी भावना या पुढारी म्हणवणार्याच्यात असली पाहिजे केवळ पेपरमध्ये जाहिरातबाजी करून आम्ही  लोकांसाठी काय करतोय हे दाखवून आता लोक फसणार नाहीत...लोकांना तुम्ही रस्त्यावर उतरून काम केलेले पहायचय... आणि,तरच लोक तुम्हाला शहरात मानतील... नाहीतर फक्त कार्यकर्तेच तुम्हाला मानतील व जनता योग्यवेळी योग्य उत्तर देईल हे लक्षात असू द्या अशी जनतेची भावना झाली आहे..आणि शहराची निवडणूक काही महिन्यावरच आली आहे...!!

2083 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 35 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2083 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 35 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 32 (6932), कराड 243 (20698), खंडाळा 172(9131), खटाव 319(13448), कोरेगांव 184(12957),माण 140(10085), महाबळेश्वर 17 (3850), पाटण 92(6080), फलटण 364 (20647), सातारा 376 (33022), वाई 118 (10951 ) व इतर 26 (938) असे आज अखेर  एकूण 148739नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2(153), कराड 6(599), खंडाळा 2 (124), खटाव 7 (373), कोरेगांव 3(295), माण 1(195), महाबळेश्वर 0(42), पाटण 5 (150), फलटण 0(241), सातारा 6 (964), वाई 3 (289) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3425 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Saturday, May 22, 2021

सातारा जिल्ह्यात 25 मे पासून 1 जूनपर्यंत आणखी कडक निर्बंध - जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा आदेश...

सातारा दि. 22 (जिमाका):  कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 25 मे पासून ते दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत.
 
या आदेशानुसार 
1. कलम 144 आणि संचारबंदी लागू करणे जमाव बंदी व संचार बंदी 
अ. सातारा जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणेत येत आहे.
ब. सदर कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा खाली दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे.
क. खाली नमूद अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील. 
ड.खालील अत्यावश्यक बाबींमध्ये उल्लेख केलेल्या सेवा आणि क्रियांना सूट देण्यात आली आहे आणि त्यांच्या हालचाली आणि ऑपरेशन्स प्रतिबंधित नसतील.
इ. सदर आदेशात सूट देणेत आलेल्या बाबी व आस्थापना ( Exemption Category) मुद्दा क्र.5 मध्ये नमूद बाबी व आस्थापना यांना सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत परवानगी असेल.

2. अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल
1) रुग्णालये ,निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, 24 तास औषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर , मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.
2) व्हेटरीनरी हॉस्पिटल्स,  अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स.
3) दुध संकलन केंद्रे सकाळी  07.00 ते 09.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दुध वितरणास परवानगी असेल
4) शेती विषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खाते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने उघडता येणार नाहीत. तथापी सकाळी 07.00 ते  सायंकाळी 05.00 या वेळेत घरपोच सेवा देणेस मुभा असेल. त्यासाठी ग्राहकांना विक्रेत्यांकडे ऑनलाईन किंवा फोन संपर्काने मागणी करावी लागेल. 
6)  शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु राहील.
7) शीतगृहे व गोदाम सेवा
8) स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम
9) स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा
10) भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळची कार्यालये  (SEBI) आणि (SEBI) मान्यता प्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा.स्टॉक एक्सचेंज (stock exchanges) डिपॉजिटर्स व क्लिअरींग कार्पोरेशन व (SEBI) कडे नोंदणीकृत असलेले एजंट
11) टेलीकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा
12) वस्तू व माल वाहतूक
13) पाणी पुरवठा सेवा
14) ई – व्यापार  फक्त (अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणेसाठी)
15) प्रसार माध्यमे (Media) 
16) पेट्रोल/डिझेल पंप फक्त वर नमूद केलेल्या सुट दिलेल्या वाहनांसाठी व अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने,प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी, माल वाहतूक करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा यासाठी, पेट्रोल/डिझेल पंप 24 तास चालू राहतील.
17) सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा
18) शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा
19) विद्युत व गॅस पुरवठा सेवा, टेलीफोन सेवा.
20) ATM’s
21) टपाल सेवा
22) लस/औषधे/जीवनरक्षक औषधे सबंधित वाहतूक हाताळणारे कस्टमहाउस एजंट (Custom House Agent/ परवानाधारक  मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स Multi Modal Transport Operators )
23) कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चा माल व त्याची पॅकेजिंग मटेरियल (Packaging material) ची उत्पादन केंद्रे
वर नमूद केलेल्या सेवांची अंमलबजावणी करून घेणाऱ्या संस्थांनी खालील बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे.

1. सर्व अंमलबजावणी प्राधिकरण/संस्था यांनी हि बाब विचारात घ्यावी कि, सदर आदेशामध्ये वस्तू व माल यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध/निर्बंध नसून सदरचे प्रतिबंध/निर्बंध हे लोकांच्या हालचालीवर आहेत.
2. यामध्ये नमूद केलेल्या सर्व सेवांची वाहतूक हि वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
3. अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळ काळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवे मध्ये गणल्या जातील.
या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेच्या दुकानांनी खाली निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
अ. संबंधीत अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक व कामगार / कर्मचारीव ग्राहक हे कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करतील.
ब. अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उदा. विक्रेता व ग्राहक यांमध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) इत्यादी आवश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर  र.रु  500 /-  इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड - 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना/दुकान बंद केले जाईल.
ड. अत्यावश्यक सेवा सबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास / हालचालीस वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
इ. सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानांच्या दुकान मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करीत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच ,इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) वापरून ग्राहकांशी संवाद साधनेसाठी तयार करावे. जेणे करून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येतील.

3. सातारा जिल्हा स्थलसीमा हद्दीत खालील बाबी पूर्णपणे बंद राहतील–
I. व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. 
II. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट बंद राहतील. 
III. भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील.
IV. वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना बंद राहतील
V. मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री पूर्णपणे बंद राहतील
VI. रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील
VII. सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापरी दुकाने व    इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.
VIII. सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे मोंढा/आडत भाजी मार्केट बंद राहतील.
IX. सर्व भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील. 
X. माल वाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, तसेच सदर वाहनांच्या स्पेअरपार्टचा पुरवठा स्पेअरपार्ट दुकाने पूर्णपणे बंद राहतील
XI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाव्दारे विहित केलेल्या सर्व सेवा बंद राहतील. 
XII. सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) व खाजगी बँका व सहकारी बँका पूर्णपणे बंद राहतील
XIII. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिनस्त असलेल्या संस्था व मध्यस्थीच्या समावेशासह स्टँडअलोन प्राइमरी डीलर्स (Intermediariesincluding standalone primary dealers). क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पेमेंट सिस्टम ऑपरेटर (Payment System Operators), RBI ने नियमन केलेल्या बाजारामध्ये सहभागी होणारे वित्तीय बाजार पूर्णपणे बंद राहतील
XIV. सर्व नॉन बँकिंग (Non-Banking) वित्तीय महामंडळे पूर्णपणे बंद राहतील
XV. सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था (Micro Finance Institutions) पूर्णपणे बंद राहतील
XVI. बांधकाम क्रिया (Costruction Activity) पूर्णपणे बंद राहतील

4. प्रवासी वाहतूक

अ) सार्वजनिक वाहतूक

   1. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस वाहतूक जिल्ह्यांतर्गत पूर्णपणे बंद राहील. 
   2. इतर सार्वजनिक वाहतूक (उदा.रिक्षा, टैक्सी-4 चाकी) हि अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी खालील  
क्षमतेप्रमाणे सुरु राहतील.
       रिक्षा- चालक+ 2 प्रवासी, टैक्सी (4 चाकी)- चालक+ RTO नियमाच्या 50 % प्रवासी
  3. वाहतुकी दरम्यान खालील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी
i. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी मास्क चा वापर करणे बंधनकारक असेल. सदर आदेशाचे उल्लंघन केलेस प्रतिव्यक्ती र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.
ii. टॅक्सी (4 चाकी) मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केला नसेल तर मास्क परिधान न करणारी व्यक्ती व वाहन चालक यांचेकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.
iii.प्रत्येक प्रवासा नंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.
iv. सर्व सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणारे कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे आणि कोव्हीड –19 च्या निर्देशांचे फलक लावावे. टॅक्सी व रिक्षा चालक यांनी स्वतःला प्रवाशांपासून प्लास्टिक आवरणाने अथवा इतर आवरणाने अलगीकरण करून घेणे बंधनकारक असेल.
v. सार्वजनिक वाहतुकीसबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
vi. रेल्वेच्या सर्वसाधारण बोगीमध्ये (General Compartment) कोणीही उभा राहून प्रवास करणारा प्रवासी नसेल तसेच सर्व प्रवासी यांनी मास्क परिधान केला असलेबाबतची खात्री सबंधित रेल्वे प्राधिकरणाने करावी.
vii.रेल्वे मध्ये मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तीकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.
viii. सार्वजनिक वाहतुकीस वरील अटी च्या आधारे परवानगी देत असताना सदरची वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सेवा सुरु राहतील. सदर सेवेमध्ये हवाई सेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या मालवाहतुक सारख्या सेवा, तसेच तिकीट विषयक सेवांचा समावेश राहील.
ix. बस, ट्रेन, विमानाने येणाऱ्या / जाणाऱ्या प्रवाशांना सदर ठिकाणाहून घरी जाणेस अथवा येणेस सोबत तिकीट बाळगणेच्या अटीवर परवानगी असेल.

ब. खाजगी वाहतूक

अ. सर्व खाजगी प्रवासी वाहतूक अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहील
खाजगी बसेस वगळता खाजगी प्रवासी वाहतूक ही फक्त आपत्कालिन किंवा अत्यावश्यक सेवा किंवा वैध कारणासाठी वाहन चालक + प्रवासी आसन क्षमतेच्या 50 % प्रवासी इतक्या क्षमतेने सुरु राहणेस परवानगी असेल. सदरची प्रवासी वाहतूक हि आंतर जिल्हा किंवा आंतर शहर असणे अपेक्षित नाही आणि ती प्रवाशांच्या राहत्या शहरापुरतीच मर्यादित असावी. 
आंतर जिल्हा किंवा आंतर शहर प्रवासी वाहतूकीस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या किंवा आपत्कालिन वैद्यकीय परिस्थिती किंवा अंत्यसंस्कारासाठी किंवा कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असलेस परवानगी असेल. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करणाऱ्या व्यक्तीस र.रु.10,000 /- इतका दंड आकारला जाईल.
ब. खाजगी बसेस ने होणारी आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक खालील प्रमाणे सुरु राहील.
I. बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील.
II. उतरणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस ऑपरेटर द्वारे गृह विलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल. शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे.
III. थर्मल स्कॅनरचा उपयोग करावा आणि जर कोणत्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठवावे.
IV. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शहरात आगमनाच्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) करण्याचा निर्णय घेतील आणि त्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेची जबाबदारी देतील. सदर चाचणीसाठी लागणारा खर्च, ठरवले असल्यास, प्रवासी किंवा सेवा प्रदाता यांना करावा लागेल.
V. जर एखादा ऑपरेटर सदर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळला तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याच्या विरोधात र.रु.10,000/- इतका दंड आकारील आणि असे उल्लंघन वारंवार केले जात असतील तर त्या ऑपरेटरचा परवाना कोविड-19 परिस्थिती संपेपर्यंत रद्द करण्यात येईल.

5. सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना(Exemption Category)

अ) कार्यालये
खालील कार्यालयांना सूट असेल
I. केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था
II. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये
III. विमा/ वैद्यकीय हक्क सबंधित सेवा
IV. औषध उत्पादन/ वितरण सबंधित नियोजन करणारी कार्यालय

कोव्हीड-19 सबंधित अत्यावश्यक सेवेशी निगडीत शासकीय कार्यालये वगळता सर्व शासकीय कार्यालये 15% क्षमतेच्या उपस्थितीसह सुरु राहील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील.
उपरोक्त नमूद इतर सर्व कार्यालये एकूण कर्मचारी संख्येच्या 15% क्षमतेसह अथवा जास्तीत जास्त 5 व्यक्तींच्या/ कर्मचारी/ अधिकारी यापैकी जे जास्त असेल इतक्या उपस्थितीसह सुरु राहील.
या आदेशामधील मुद्दा क्र.2 मध्ये नमूद इतर अत्यावश्यक सेवेतील कार्यालये 50 % पेक्षा जास्त नसेल इतक्या कमीत कमी कर्मचारी क्षमतेसह सुरु राहणेस परवानगी असेल. जे व्यक्ती प्रत्यक्ष अत्यावश्यक सेवा पुरवितात त्यांनी त्यांची कर्मचारी संख्या कमी करावी तथापि अपवादात्मक परिस्थितीत ती 100 % पर्यंत ठेवता येवू शकेल.
सदर कार्यालयामध्ये काम करीत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
अभ्यागतांना शासकीय कार्यालयात / कंपनीत येणेस प्रतिबंध असेल व शासकीय कार्यालये / कंपनी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस कार्यालया बाहेरील व्यक्तींची उपस्थिती आवश्यक असलेस, अशा बैठकी Online आयोजित कराव्यात.
सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

   ब.रेस्टॉरंट, बार, हॉटेल
I. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व बार हे एकत्रित बसून सेवा देणेस बंद राहतील. हॉटेल (लॉजिंग) आवारामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत प्रवाशांसाठी रेस्टॉरंट सुरू राहील.  बार सेवा बंद राहतील.
II. कोणासही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवा घेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंटसाठी फक्त घरपोच सेवा (Home Delivery) सुरू राहतील. बार करीता घरपोच सेवा (Home Delivery) लागू राहणार नाही.
III. हॉटेल्स मधील रेस्टॉरंटहे फक्त निवासी ग्राहकांसाठी सुरु राहील. बाहेरील ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत हॉटेल मध्ये प्रवेशास परवानगी नसेल. बाहेरील ग्राहकांसाठी वरील प्रमाणे प्रतिबंध लागू असेल. हॉटेल मध्ये वास्तव्यास असलेले ग्राहक यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडता येईल.
IV. घरपोच (Home Delivery) सेवा देणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
V. इमारतीमध्ये घरपोच सेवा देत असताना एका पेक्षा जास्त कुटुंबाना देणेत येणार असेल तरसदर घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस इमारतीमध्ये प्रवेश निषिद्ध असेल. इमारतीमधील अंतर्गत घरपोच सेवा हि इमारतीमधील स्टाफ द्वारे करणेची आहे. सदर घरपोच सेवा देणारे कर्मचारी व इमारती मधील व्यक्तींना राज्यशासनाने व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
VI. दर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाई, तसेच सदर आस्थापनेकडून र. रु. 10,000/- इतका दंड आकाराला जाईल. सदर कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल.
VII. रेस्टॉरंट, हॉटेल व बार मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

   क. उत्पादन क्षेत्र
अ.खाली नमूद उत्पादन केंद्रे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये सुरु राहतील 
i. या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा माल तयार करणारे कारखाने पूर्ण क्षमतेनुसार चालू राहतील. 
ii. ज्या उत्पादन केंद्रांना, निर्यात पुरवठा आदेशानुसार विहित मुदतीत निर्यात पुरवठा करणे बंधनकारक आहे, अशी उत्पादन केंद्रे सुरु राहतील. 
iii.ज्या कारखान्यांमध्ये अचानक उत्पादन थांबविता येणार नाही आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय उत्पादन पुन्हा सुरु होवू शकणार नाही अशा सर्व कारखान्यांना कर्मचाऱ्याच्या 50 % क्षमतेच्या उपस्थितीसह काम करता येईल. महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक / उद्योग विभागाने एखादे उत्पादन क्षेत्र / कारखाना सदर नियमाचा गैरवापर करून त्यांचे उत्पादन सुरु ठेवणार नाही याची खात्री करावी. तसेच सदर ठिकाणी राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होत असलेबाबत खात्री करावी. सुरु असलेली उत्पादन केंद्रे जर ऑक्सिजनचा वापर करीत असतील तर ते फक्त अत्यावश्यक सेवेसाठी लागणाऱ्या माल उत्पादनासाठीच असेल याची खात्री करावी. तसेच सदर उत्पादन क्षेत्रातील कर्मचारी / कामगार यांची राहण्याची व्यवस्था कारखाना परीसरामध्येच करणे अपेक्षित आहे. जर ते कारखाना क्षेत्राच्या बाहेर राहत असतील तर त्यांची हालचाल हि शक्यतो (ISOLATION BUBBLE) मध्येच होत असलेची खात्री करावी.

ब. सर्व कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करूनघ्यावे. जे कारखाने  केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या कार्यस्थळ लसीकरण या अटीमध्ये बसत असतील तर त्यांनी त्यांच्या कामगार / कर्मचारी यांचेसाठी लसीकरणाची व्यवस्था करावी.

क. कारखाने व उत्पादन केंद्रे यांना खालील अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असेल.
i. कारखाने व उत्पादनकेंद्रामध्ये कामगारांच्या प्रत्येक प्रवेशावेळी शरीराचे तापमान तपासणे बंधनकारक असेल आणि त्यांचेकडून कोव्हीड-19 च्या नियमांचे पालन करून घ्यावे.
ii. कारखाने व उत्पादनकेंद्रामध्ये काम करणाऱ्या कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आलेस, कारखाने व उत्पादन क्षेत्र व्यवस्थापनाने सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस पगारासह स्वखर्चाने विलगीकरणामध्ये ठेवावे.
iii. ज्या कारखाने/ उत्पादन केंद्रामध्ये 500 पेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी काम करीत असतील अशा कारखाने/ उत्पादन केंद्र व्यवस्थापनाने स्वतःचे विलगीकरण केंद्र उभे करावे. सदर केंद्रामध्ये सर्व मुलभूत सुविधा असाव्यात आणि जर सदर सुविधा कारखाना परिसराच्या बाहेर असतील तर सर्व सुरक्षा उपाय करून कोरोना +ve व्यक्तीस इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता त्या सुविधा केंद्रा पर्यंत घेवून जावे लागेल.
iv. जर एखादा कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला असेल तर सबंधित कारखाने/  उत्पादन केंद्राचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण होईपर्यंत बंद राहील.
v. गर्दी टाळणेसाठी जेवणाच्या व चहाच्या वेळा टप्प्याटप्प्याने ठेवणेत याव्यात. एकाच ठिकाणी जेवणासाठी एकत्र येवूनये.
vi. सार्वजनिक स्वच्छता गृहाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणेत यावे.

ड. जर एखादा कामगार / कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला तरत्यांस कामावरून न काढता त्यांस वैद्यकीय रजा देणेत यावी. सदर कर्मचारी पूर्ण वेतनासाठी पात्र राहतील.

इ. वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके
वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असेल.
वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके यांची फक्त घरपोच सेवा सुरु राहील
सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

6. करमणूक, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर इ.
i. सिनेमागृहे बंद राहतील
ii. नाट्यगृहे व सभागृहे बंद राहतील.
iii. करमणूक नगरी/ आर्केड्स (Arcades) / व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील.
iv. जल क्रीडा स्थळे बंद राहतील.
v. क्लब (Clubs), जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा संकुले बंद राहतील.
vi. वरील आस्थापनांमधील मालक व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
vii. चित्रपट / मालिका / जाहिरात यांचे छायाचित्रण बंद राहील.
viii. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारे सर्व दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील
ix. सर्व सार्वजनिक ठिकाणे ( उदा. बगीचे, मैदाने व इतर ) बंदराहतील.

7. धार्मिक प्रार्थनास्थळे
अ. सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील.
ब. धार्मिक प्रार्थना स्थळांमधील विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सामान्य नागरिकांना धार्मिक प्रार्थना स्थळांना भेटी देणेस मनाई असेल.
क. धार्मिक प्रार्थना स्थळांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

8. केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स

अ. केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स बंद राहतील.
ब. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

9. शाळा व महाविद्यालये
अ. शाळा व महाविद्यालये बंद राहतील.
क. महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परिक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणामार्फत सातारा जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी घेणेत येणाऱ्या परीक्षांना परवानगी देणेत येत आहे. सबंधित विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सदर परीक्षेबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक असेल. 
ड. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास सदर परीक्षेस व्यक्तीशःउपस्थित राहणे आवश्यक आहे, अशा वेळी परीक्षार्थीस एका प्रौढ व्यक्तीसोबत परीक्षेचे प्रवेश पत्र सोबत बाळगणेच्या अटीवर परवानगी असेल.
इ. सर्व प्रकारची खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील.
फ. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

10. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम 

अ. सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिबंधित असतील.
ब. जास्तीत जास्त 25  नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करणेस परवानगी असेल.
i. एका हॉल / कार्यालया मध्ये एकच लग्न समारंभ 2 तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत जास्तीत जास्त 25 व्यक्ती / नातेवाईकांचे उपस्थितीत करणेस परवानगी असेल. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करणाऱ्या कुटुंबास र.रु.50,000 /- इतका दंड आकारला जाईल. सबंधित कार्यालय क्षेत्र हे कोव्हीड-19 हि आपत्ती म्हणून घोषित असेल तोपर्यंत बंद करणेत येईल.
ii. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे. लसीकरण होईपर्यंत त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) असणे बंधनकारक असेल.
iii. लग्न समारंभाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) नसलेस/ लसीकरण करून घेतलेले नसलेस त्यास प्रत्येकी र.रु.1,000/- व सबंधित आस्थापनेवर र.रु.10,000/- इतका दंड आकारणेत येईल.
iv. दंडात्मक कारवाई नंतरही सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनेची अनुज्ञप्ती रद्द किंवा सदरचे ठिकाण बंद केले जाईल.
v. एखाद्या धार्मिक / प्रार्थना स्थळी विवाह सोहळ्याचे आयोजन करणेत आलेले असलेस, लग्न समारंभ यांना राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणेचे अटीवर परवानगी देणेत येत आहे.
क. अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस प्रतिबंध असेल. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे आणि त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) असणे बंधनकारक असेल.

11.ऑक्सिजन उत्पादक
अ) ऑक्सिजन कच्चा माल असणाऱ्या औद्योगिक प्रक्रियांवर बंदी घालण्यात येत आहे. अशा प्रकारच्या औद्योगिक प्रक्रिया अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असल्यास किंवा अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीनंतर सुरु ठेवण्यात येतील.
ब) ऑक्सिजनचे उत्पादन करणारी उत्पादन केंद्रे यांनी त्यांचे उत्पादन आरोग्य विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे वैद्यकीय कारणास्तव आरक्षित ठेवावे. त्यांनी सदर आदेशाच्या तारखेपासून त्यांचे ग्राहक व पुरवठा करण्यात आलेल्या ऑक्सिजनचा अंतिम वापर दिलेल्या निर्देशानुसार प्रसिध्द करावा.  

12. ई – व्यापार

अ. ई –व्यापारास फक्त या आदेशातील मुद्दा क्र.2 मध्ये नमूद अत्यावश्यक वस्तू व सेवेसाठी परवानगी असेल.
ब. सदर आस्थापनांवरील कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जर सदर ई-व्यापार संस्था कंपनी केंद्र शासनाने अधिकृत केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी पत्र असेल तर सदर संस्थेने कॅम्प आयोजित करून त्यांचे सर्व कर्मचारी यांचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे. जे कर्मचारी घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचारीयांचे संपर्कात येत नाहीत त्यांचेसाठी या आदेशातील मुद्दा क्र.5 प्रमाणे कार्यवाही करावी.
क. इमारतीमध्ये घरपोच सेवा देत असताना एका पेक्षा जास्त कुटुंबाना देणेत येणार असेल तर सदर घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस इमारती मध्ये प्रवेश निषिद्ध असेल. इमारती मधील अंतर्गत घरपोच सेवा हि इमारती मधील स्टाफ द्वारे करणेची आहे. सदर घरपोच सेवा देणारे कर्मचारी व इमारती मधील व्याक्तीयानी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
ड. सदर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाईल, तसेच सदर. सदर कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना अनुज्ञप्ती रद्द केली जाईल.
13. सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies)
अ. कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) मध्ये 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेस सदर सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) ला सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल.
ब. अशा संस्थांनी (Societies) संस्थेच्या मेन गेटचे ठिकाणी भेटण्यास येणाऱ्या व्यक्तींच्या माहितीसाठी सदर ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले बाबत फलक लावावा व त्यांचा प्रवेश निषिद्ध करणेत यावा
क. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रास लागू असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करणे सबंधित संस्थेवर बंधनकारक असेल. (उदा. प्रवेश, पत्ता व इतर यावर परीक्षण ठेवणे)
ड. कोणत्याही संस्थेने सदर नियमांचे उल्लंघन केलेस पहिल्या घटनेवेळी सबंधित संस्थेकडून र.रु.10,000/- इतका दंड आकारला जाईल. त्यानंतरही नियमाचे उल्लंघन झालेस स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केलेला जास्तीत जास्त दंड आकारला जाईल. सदरचा वसूल करणेत आलेला दंड हा संस्थांकडून शासन निर्देशांचे पालन होत असलेबाबत पर्यवेक्षणकामी वापरला जाऊ शकतो.
इ. सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांनी त्यांचे आवार / इमारतीमध्ये नियमित प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे शासकीय नियमानुसार लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोना चाचणी अहवाल (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) घ्यावा.
  आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका/ नगरपरिषद/नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी, जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.
0000

1878 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 31 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 22 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1878 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 31 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 103(6900), कराड 222 (20455), खंडाळा 88 (8959), खटाव 150(13129), कोरेगांव 220 (12773),माण 135(9945), महाबळेश्वर 7 (3833), पाटण 46(5988), फलटण 332 (20283), सातारा 395 (32646), वाई 169 (10833 ) व इतर 11 (912) असे आज अखेर  एकूण 146656नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3 (151), कराड 6(593), खंडाळा 0 (122), खटाव 6 (366), कोरेगांव 2 (292), माण 3(194), महाबळेश्वर 0(42), पाटण 0 (145), फलटण 2 (241), सातारा 8 (958), वाई 1(286) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3390कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

कराड शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करावी : लोकशाही आघाडीच्या वतीने देण्यात आले निवेदन...सातारा पालिकेने केलेल्या घरपट्टी माफी च्या धर्तीवर "लोकशाही' ची मागणी...

वेध माझा ऑनलाइन
कराड 
कोरोनाच्या महामारीने संपुर्ण देश होरपळत आहे. गेले दीड वर्षात नागरिकांचे जीवित व आर्थिक प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान कराड शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करावी अशा आशयाचे निवेदन लोकशाही आघाडीच्यावतीने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना देण्यात आले आहे.

नुकतेच सातारा नगरपालिकेने घरपट्टी माफ केली आहे.  सातारा पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून व नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 127 व कलम 247 च्या तरतुदीनुसार ज्या मिळकती शासकीय आदेश अथवा अन्य अपरिहार्य कारणास्तव बंद असतील त्यांची घरपट्टी माफ करण्याचे अधिकार स्थानिक नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस आहेत.
याच "बेस' वर  ही मागणी लोकशाही आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

लोकशाही गटाचे नेते जयंतकाका पाटील माजी नगरसेवक सुहास पवार, शिवाजी पवार, मोहसीन आंबेकरी, पोपटराव साळुंखे, जयंत बेडेकर, गंगाधर जाधव, अमीन शिंदे, अनिल धोत्रे, रणजीत पाटील, सचिन चव्हाण, पप्पू वाडकर यावेळी उपस्थित होते.

गेल्या वर्षी तीन महिने पूर्ण लॉकडाऊनमध्ये होता. या कोरोनाकाळात कराड नगरपालिकेच्या माध्यमातून यथाशक्ती आरोग्य सेवा दिली आहे. कराड नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, कराडकर नागरिकांच्या सेवेसाठी झटत आहेत. परंतु कोरोनाच्या प्रसारामुळे समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती व गणिते बिघडली आहेत. या संदर्भात शहरातील नागरिकांची संपूर्ण घरपट्टी माफ होणेसंदर्भात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव केला आहे. व शासकीय मंजुरीस पाठवला आहे. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नुकतेच सातारा नगरपालिकेने घरपट्टी माफ केली आहे.  सातारा पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून व नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 127 व कलम 247 च्या तरतुदीनुसार ज्या मिळकती शासकीय आदेश अथवा अन्य अपरिहार्य कारणास्तव बंद असतील त्यांची घरपट्टी माफ करण्याचे अधिकार स्थानिक नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस आहेत. या तरतुदींचा अभ्यास करून व आधार घेऊन मागील आर्थिक वर्षीच्या बंद काळातील कराडच्या नागरिकांची घरपट्टी माफ होऊन सदर रक्कम चालू वर्षीच्या घरपट्टी मधून वजा करून चालू आर्थिक वर्षीच्या बंद काळातील घरपट्टी माफ करावी. याबाबत त्वरित सकारात्मक कार्यवाही करावी जेणेकरून कराडकर नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळेल. असेही लोकशाहीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.