वेध माझा ऑनलाइन
सातारा
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या या नव्या इमारतीत जिल्हा कोव्हिड जम्बो रुग्णालयाची निर्मिती केली हे कोविड रुग्णालय विविध कारणातून सध्या चर्चेत येत आहे. याठिकाणी आजपासुन प्रशासनाने कायदा व्यवस्था बिघडु नये यासाठी बाऊन्सरची नियुक्ती केली आहे. खरतर,हॉटेल डान्स बारच्या बाहेर तैनात बॉंसर्स नेहमी दिसतात मात्र चक्क रुग्णालयाबाहेरच आता हे बाऊन्सर्स आणून ठेवल्याने जिल्ह्यातून संताप व्यक्त होतोय त्यांना हटवा अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.
रात्र आणि दिवस 14 बाऊन्सर जम्बो रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आले आहेत. वास्तविक पाहायला गेलं तर जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे रुग्णांचे मोजकेच नातेवाईक या कोव्हिड जम्बो रुग्णालयात येत आहेत मात्र बाऊन्सरची नियुक्ती केल्यामुळे त्यांना आता गेटवरच थांबायची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत सामाजिक संस्थांनी विरोध दर्शविला आहे. रुग्णालय बाहेरील बाऊन्सर हटवा अन्यथा तिव्र आंदोलन करुन असा इशारा त्यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment