वेध माझा ऑनलाइन
कराड
ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय आपत्तीवेळी सहकार्य करण्याऐवजी भूमिगत झाले अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार? कोरोना काळात जनसेवेसाठी रस्त्यावर उतरण्याऐवजी घराचे दरवाजे बंद करणाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निःस्वार्थी कार्य करणाऱ्या राष्टीय स्वयंसेवक संघाच्या कार्यावर आक्षेप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे असा घणाघात भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आज केला
काल येथील कॉटेज हॉस्पिटल येथे लसीकरण चालू असताना आर एस एस चे कार्यकर्ते राजकीय अजेंडा वापरत त्याठिकाणी काम करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते शिवराज मोरे यांनी केला होता तेथील अधीक्षक डॉ शिंदे यांच्याकडे त्याबाबत त्यांनी तक्रार करत त्या ठिकाणचे काम थांबवले होते त्याला उत्तर देण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर हे आता संघाच्या बाजूने सरसावले आहेत...
विक्रम पावसकर म्हणाले, गतवर्षी मार्चपासून देशात कोरोनाचा प्रभाव वाढू लागला होता. अशा परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करायच्या उद्देशाने सबंध भारतभर संघ स्वयंसेवक रस्त्यावर मदतीकरीता रस्त्यावर उतरले होते. पहिल्या लाटेत राज्यातील कोरोना हॉटस्पॉट म्हणून गणल्या जाणाऱ्या धारावी तसेच पुणे यासारख्या ठिकाणी संघ स्वयंसेवक स्वतः प्राणांची पर्वा न करता स्वयंस्फूर्तीने टेस्टिंग, ट्रेसिंग करत होते. यादरम्यान कित्येक स्वयंसेवकांना प्राणास देखील मुकावे लागले. अशा परिस्थितीत कराड सारख्या ठिकाणी देखील स्व.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन लसीकरण केंद्रावर 3 दिवस झाले स्वयंसेवक रुग्णालय प्रशासनाला मदत करत आहेत. संघ स्वयंसेवक स्वतःच जीव धोक्यात घालून गर्दी नियंत्रण, नाव नोंदणी, जेष्ठ नागरिकांना सहकार्य यांसारख्या कार्यात प्रशासनास मदत करत आहेत. नागरिक देखील या निःस्वार्थी कार्याची मुक्तकंठाने स्तुती करत आहेत. अशा परिस्थितीत काही राजकीय पुढारी संघाची बदनामी करायचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नागरिकांशी वाद झाल्याचा बनाव करून निःस्वार्थी सेवाकार्य थांबवण्याच्या उद्देशाने संघाला टार्गेट करायचा प्रकार आहे.
वास्तविक ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय आपत्तीवेळी सहकार्याच्या ऐवजी भूमिगत झाले अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दुसऱ्या काय अपेक्षा करणार? कोरोना काळात जनसेवेसाठी रस्त्यावर उतरण्या ऐवजी घराचे दरवाजे बंद करणाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निःस्वार्थी काय करणाऱ्या संघाच्या कार्यावर आक्षेप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. तक्रार करून कार्य बंद पाडण्याचा हेतू साध्य करणाऱ्यांनी आज कॉटेज ला भेट देऊन नियोजनाअभावी झालेली दुरावस्था नक्कीच पाहावी. सोशल डिस्टनसिंग चा उडालेला फज्जा, लसीकरण केंद्रावरचा सावळागोंधळ नजरेखालून आवर्जून घालावा. वास्तविक सत्ताधारी म्हणून मुख्यतः जनतेला बेड उपलब्ध करणे, लसीकरणाचे नियोजन करणे ही तुमची जबाबदारी होती पण आपली राजकीय शक्ती संघाचे निःस्वार्थी सेवाकार्य थांबवण्यात घालवली तीच शक्ती कॉटेज ला गर्दीचे नियोजन करण्यात, जेष्ठ नागरिकांना सहकार्य करण्यात वापरली तर लोकांचे आशीर्वाद नक्कीच लाभतील असेही विक्रम पावसकर म्हणाले आहेत..
No comments:
Post a Comment