Monday, May 10, 2021

ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्याबाबतची परवानगी मिळावी - झाकीर पठाण

कराड
सातारा जिल्हा काँग्रेसचे मुस्लिम अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याशी पत्रव्यवहार करून होणाऱ्या ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्याबाबतची परवानगी  मागितली आहे...

सध्या कोरोनाचे संकट सम्पूर्ण देशावर आहे अशातच मुस्लिम समाजाचा रमजान हा पवित्र सणदेखील पार पडणार आहे त्यादिवशी होणारी नमाज देखील वर्षातील महत्वाची नमाज मानली जाते मशिदीत किंवा मोहल्यातून किमान 25 जणांना कोरोनाचे नियम पाळून सामुदायिक नमाज पठणाची परवानगी ईदच्या सणानिमित्त मिळावी अशी मागणी झाकीर पठाण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांचेकडे पत्रकाद्वारे केली आहे

1 comment:

  1. Yahi hai ummat ka dard aur fikar jo saalbhar qayam rahe har din eid ke din ki tarah guzare. Asif momin karad'

    ReplyDelete