Tuesday, May 18, 2021

जान फौंडेशन व भीम आर्मीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न ; 25 जणांनी केले रक्तदान...

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील जान फौंडेशन व भीम आर्मीच्या वतीने आज रक्तदान शिबीर पार पडले यावेळी 25 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती देण्यात आली हे शिबीर बालाजी ब्लड बँक यांचे सहकार्याने संपन्न झाले.
 
सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी फौंडेशनचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांचेसह रमजान बागवान,शरद चव्हाण,मुजम्मील नायकवडी ,सुरज घोलप,सुफियान शेख,राहिल खान,गजानन कुंभार,साजिद पटेल तसेच सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीला लक्षात घेता प्लाझमादान व रक्तदान ह्या दोन्हीं बाबींची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.आणि महत्वाचे म्हणजे लस घेतल्यानंतर किमान 28 दिवस प्लाझ्मा व रक्तदान करता येत नाही असे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ सांगतात त्यामुळे जान फौंडेशन व भीम आर्मीच्या वतीने प्रत्येकाने लस घेण्याअगोदर या शिबिरास भेट देऊन रक्तदान करा असे आवाहन केले होते 25 रक्तदात्यानी या आवाहनाला प्रतिसाद देत आज रक्तदान केले

No comments:

Post a Comment