सातारा
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्हचा दर वाढलेला त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक पूर्ण झाली आहे. उद्यापासून (दि.4 मे) कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
सातारा येथे शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाप्रशासनाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे, प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अंचल दलाल यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊन लावलेला आहे. मात्र तरीही कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. तेव्हा उद्यापासून कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार आहे. त्यासंबधी पोलिस यंत्रणा, मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे सध्याकाळी नियमावली जाहीर करणार आहेत
No comments:
Post a Comment