Saturday, May 22, 2021

कराड शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करावी : लोकशाही आघाडीच्या वतीने देण्यात आले निवेदन...सातारा पालिकेने केलेल्या घरपट्टी माफी च्या धर्तीवर "लोकशाही' ची मागणी...

वेध माझा ऑनलाइन
कराड 
कोरोनाच्या महामारीने संपुर्ण देश होरपळत आहे. गेले दीड वर्षात नागरिकांचे जीवित व आर्थिक प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान कराड शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करावी अशा आशयाचे निवेदन लोकशाही आघाडीच्यावतीने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना देण्यात आले आहे.

नुकतेच सातारा नगरपालिकेने घरपट्टी माफ केली आहे.  सातारा पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून व नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 127 व कलम 247 च्या तरतुदीनुसार ज्या मिळकती शासकीय आदेश अथवा अन्य अपरिहार्य कारणास्तव बंद असतील त्यांची घरपट्टी माफ करण्याचे अधिकार स्थानिक नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस आहेत.
याच "बेस' वर  ही मागणी लोकशाही आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

लोकशाही गटाचे नेते जयंतकाका पाटील माजी नगरसेवक सुहास पवार, शिवाजी पवार, मोहसीन आंबेकरी, पोपटराव साळुंखे, जयंत बेडेकर, गंगाधर जाधव, अमीन शिंदे, अनिल धोत्रे, रणजीत पाटील, सचिन चव्हाण, पप्पू वाडकर यावेळी उपस्थित होते.

गेल्या वर्षी तीन महिने पूर्ण लॉकडाऊनमध्ये होता. या कोरोनाकाळात कराड नगरपालिकेच्या माध्यमातून यथाशक्ती आरोग्य सेवा दिली आहे. कराड नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, कराडकर नागरिकांच्या सेवेसाठी झटत आहेत. परंतु कोरोनाच्या प्रसारामुळे समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती व गणिते बिघडली आहेत. या संदर्भात शहरातील नागरिकांची संपूर्ण घरपट्टी माफ होणेसंदर्भात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव केला आहे. व शासकीय मंजुरीस पाठवला आहे. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नुकतेच सातारा नगरपालिकेने घरपट्टी माफ केली आहे.  सातारा पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून व नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 127 व कलम 247 च्या तरतुदीनुसार ज्या मिळकती शासकीय आदेश अथवा अन्य अपरिहार्य कारणास्तव बंद असतील त्यांची घरपट्टी माफ करण्याचे अधिकार स्थानिक नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस आहेत. या तरतुदींचा अभ्यास करून व आधार घेऊन मागील आर्थिक वर्षीच्या बंद काळातील कराडच्या नागरिकांची घरपट्टी माफ होऊन सदर रक्कम चालू वर्षीच्या घरपट्टी मधून वजा करून चालू आर्थिक वर्षीच्या बंद काळातील घरपट्टी माफ करावी. याबाबत त्वरित सकारात्मक कार्यवाही करावी जेणेकरून कराडकर नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळेल. असेही लोकशाहीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment