वेध माझा ऑनलाइन
शुक्रवारी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही, असं थेट आव्हानच संभाजीराजे भोसले यांनी दिलं आहे.
सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्याने राज्यातील राजकारण पुन्हा तापण्यास सुरवात झाली आहे. त्यातच आता आरोप प्रतिआरोप देखील सुरु झाले आहेत. भाजपचे खासदार संभाजीराजे नियमित महाराष्ट्र दौरा करून वेगवेगळ्या लोकांची भेट घेत आहेत. यामध्ये शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मला आज स्पष्ट सांगायचं आहे. 6 जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. त्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले. जर 6 जूनपर्यंत यावर काही कारवाई केली नाही. तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरून जाहीर करू.
शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना असं टाकलं असतं का? त्यामुळे 6 जूनआधी आम्हाला बोलावून निश्चित असा काही कार्यक्रम तुम्ही दिला नाही, तर नंतर आम्ही कोविड-बिविड बघणार नाही. मी स्वत: 5 मे रोजी निकाल लागला तेव्हा सगळ्यांना शांत ठेवलं. नाहीतर महाराष्ट्र पेटला असता. पण आम्ही किती शांत बसायचं? असं ते म्हणाले.
No comments:
Post a Comment