वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील शाहू चौक मित्रपरिवाचा माणुसकीचे साक्षात दर्शन देणारा उपक्रम सध्या सम्पूर्ण जिल्ह्यात चर्चेत आहे कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना सकाळी आणि संध्याकाळी मोफत जेवण रुग्णालयात जाऊन पुरवण्याचे काम हा ग्रुप करतोय शहर व परिसरात अनेक रुग्ण विविध रुग्णालयात दाखल आहेत त्याठिकाणी या ग्रुप चे सदस्य जाऊन ही सेवा मोफत देत आहेत
सध्या कोरोनाचा हाहाकार सम्पूर्ण शहर व परिसरात पाहायला मिळतोय रोज शेकडो रुग्ण विविध हॉस्पिटल मधून ऍडमिट होत आहेत अनेक रुग्ण बाहेर गावाहून येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक बरोबर असतात मात्र त्यांना रुग्णांसंवेत थांबता येत नाही तर त्यांना बाहेर कुठेतरी आसरा घेऊन थांबावे लागते बाहेर गावाहून आल्यामुळे त्यांच्या जेवणाचीही परवड होताना दिसते आहे मात्र शाहू चौक मित्र परिवाराने या नातेवाईकांना दोन वेळच मोफत जेवण देण्याची सोय केली आहे आणि माणुसकीचे दर्शन देत आपली बांधीलकी जपली आहे
कोणतेही सामाजिक काम करण्याकरिता एखाद्या राजकीय पदाची किंवा राजकारणात असण्याची गरज नसते तर लोकांसाठी माणुसकीने विचार करण्याची प्रवृत्ती व समाजाप्रती आपण काही देणे लागतो याची जाणीव महत्वाची असते याच जाणीवेतून येथील शाहू चौक मित्रपरिवार सध्याच्या कोविड च्या संकटात लोकांच्या मदतीला धावून आला आहे रुग्णांच्या नातेवाईकांना दोन वेळच मोफत जेवण देत या शाहू चौक मित्रपरिवाराने शहरातल्या "मी पुढारी' असे स्वतःला म्हणवणार्यापुढे आपलाआदर्श निर्माण केला आहे
कोणी गरजू व्यक्तीला मदत हवी असल्यास आमच्या ग्रुपशी येथील शाहू चौक येथे संपर्क साधावा असे आवाहन शाहू चौक परिवराच्या वतीने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment