वेध माझा ऑनलाइन
कराड
कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळातून आपण सर्वजण चाललो आहोत. ही वेळ अतिशय भयावह आहे, अशावेळी नेहमीच समर्पित भावनेने कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्यावर नोंदवले जाणारे आक्षेप हे अत्यंत चुकीचे व राजकीय हेतूने प्रेरित आहेत अशा शब्दात येथील नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी आपला निषेध नोंदवला आहे
.नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी स्वतः कोरोना संकटात केलेलं काम विसरून चालणार नाही एका कोरोना मृतदेहावर चक्क अंत्यसंस्कार करून त्यांनी आपल्या कार्याचा वेगळेपणाही दाखवून दिला होता... एक महिला नगराध्यक्षां कोविड मृतदेहावर अंत्यसंकार करते हे सम्पूर्ण राज्यातील पहिलेच उदाहरण ठरले होते आणि म्हणूनच त्यांचं त्यावेळी राज्यभर कौतुकही झालं होतं...
स्वतः त्या कोरोना पोसिटीव्ह झाल्या होत्या, त्यावर मात करून काही दिवसातच लोकांसाठी कोरोनाशी लढताना पुन्हा त्या दिसल्या होत्या त्यांना या कोरोना काळात ग्राऊंडवर काम करण्याचे गांभीर्य काय असते हे चांगलेच माहीत आहे... दोन दिवसांपूर्वी येथील कॉटेज हॉस्पिटल येथे लसीकरण चालू असताना आर एस एस चे कार्यकर्ते राजकीय अजेंडा वापरत त्याठिकाणी काम करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते शिवराज मोरे यांनी केला होता तेथील अधीक्षक डॉ शिंदे यांच्याकडे त्याबाबत त्यांनी तक्रार करत त्या ठिकाणचे काम थांबवले होते या घटनेचा समाचार घेण्यासाठी नगराध्यक्षा आता पुन्हा सरसावल्या आहेत...
दरम्यान या घटनेबाबत निषेध नोंदवताना त्या म्हणाल्या , वादळ ,पूर परिस्थीती ,भूकंप अशा सर्व संकटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात .कोणताही दिखावा, पेपरबाजी, जाहिरात न करता निव्वळ कर्तव्य व सेवा या भावनेतून संघाचे स्वयंसेवक देशाच्या कानाकोपऱ्यात अखंडपणे काम करीत असतात. त्यांच्या कामाचे कौतुक सर्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा वेळोवेळी केलेले आहे. कोरोना महामारीच्या या कठीण काळामध्ये सध्या लसीकरण हाच सर्वांचा आधार बनला आहे आणि प्रत्येकाला आपले लसीकरण लवकरात लवकर व्हावे असे वाटत असल्याने प्रत्येक लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीला शिस्त लावणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांना व्यवस्थित माहिती देणे हे अत्यंत कठीण काम कराड येथील स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे संघाचे स्वयंसेवक गेले तीन-चार दिवस अत्यंत व्यवस्थित रित्या करत होते. यामुळे येथील लसीकरण केंद्रावर कोणताही गोंधळ न होता अत्यंत शिस्तबद्धपणे लसीकरण सुरू होते व त्याचे नियोजनही चोखपणे संघाचे स्वयंसेवक करत होते. सामान्य नागरिक व कार्यकर्ते यातील फरक लोकांना कळावा यासाठीच संघाचे कार्यकर्ते आपल्या गणवेशामध्ये कार्यरत होते, जेणेकरून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना व्यवस्थित माहिती मिळावी व त्यांची व्यवस्थित सोय व्हावी हीच त्यामागची भावना होती. वेणूताई उपजिल्हा रुग्णालय प्रशासन तसेच असंख्य नागरिकांनीही संघाच्या स्वयंसेवकांच्यावर या योग्य नियोजनाबद्दल कौतुकही केले होते. याच दरम्यान एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर येऊन हे स्तुत्य कार्य बंद पाडण्याचा प्रयत्न केला व या कार्याला हरकत घेऊन त्यांनी तक्रारी केल्या तसेच संघाच्या स्वयंसेवकांबद्दल नाहक बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध केल्या. चांगल्या पद्धतीने सुरू असलेल्या या सामाजिक कार्यास खो घालण्याचा जो प्रकार स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्या पक्षाच्या तथाकथित पुढाऱ्यांकडून झाला आहे तो अतिशय निंदनीय आहे. या सर्व प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो . स्वतः चांगलं करायचं नाही आणि दुसऱ्याला चांगलं करून द्यायचं नाही अशा प्रवृत्तीचा केविलवाणा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. कराडकर नागरिक सुज्ञ आहेत अशा भाकड कथांवर ते कधीच विश्वास ठेवणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी .कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार ऑक्सिजन, रेमडीसिविर इंजेक्शन, व्हेंटिलेटर बेड यांची असणारी कमतरता, रुग्णांचे होणारे हाल, आरोग्य यंत्रणेवर असणारा प्रचंड ताण या सर्वांची काळजी घेऊन सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी काम केले पाहिजे . कोरोनाकाळात राजकारण करण्याची ही वेळ नाही, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे एवढीच माफक अपेक्षा. यानिमीत्ताने मी सर्व राजकीय पक्ष , सामाजिक संघटना , सोशल मिडीया ग्रुप तसेच सर्व समाजसेवक यांना जाहिर आवाहन करते की आपण या कोरोना काळात कोरोना संबंधित हॉस्पीटल असतील , नगरपालिका प्रशासन असेल , पोलिस प्रशासन असेल तसेच प्रांत - तहसिल प्रशासन असेल या सर्व यंत्रणांना सहकार्य करा असे आवाहन देखील नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी यावेळी केले आहे.
No comments:
Post a Comment