Friday, May 14, 2021

कराड तहसील कार्यालयात बसवेश्वर जयंती साजरी


वेध माझा ऑनलाइन
कराड 
येथील तहसीलदार कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. नायब तहसीलदार विजय माने यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवानंद डुबल,संजय शेटे,सुनिल महाजन,प्रमोद सुकरे,शिवाजी माळी आदींची उपस्थिती होती.
                 नायब तहसीलदार विजय माने म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी असे आहे . जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचे स्मरण होते.पण ते आचरणात आणणे काळाची गरज आहे.
             यावेळी लिंगायत समाजाच्या वतीने कोरोनाच्या महामारी संकट काळात सेवा करणार्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना  बिस्किट पुडे व पाण्याच्या बाटल्या यांचे वितरण करण्यात आले .
  फोटो
 कराड येथे तहसीलदार कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार विजय माने, शिवानंद डुबल, प्रमोद सुकरे,  सुनील महाजन, संजय शेटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment