Saturday, May 8, 2021

शहरातून निर्जंतुकीकरण करण्यास कराड पालिकेच्या आरोग्य सभापतींचा विरोध - नगराध्यक्षांचा आरोप...शहरासाठी नव्हे तर, फोटोसेशनसाठी अध्यक्षांचा खटाटोप...वाटेगावकरांचा आरोप...


वेध माझा ऑनलाइन 
कराड
नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी सध्याच्या कोरोना संकटात सम्पूर्ण शहरातून निर्जंतुकीकरण सुरू केले आहे मात्र शहरातील एका प्रभागात चक्क पालिकेच्या आरोग्य सभापतींनीच निर्जंतुकीकरण करण्यास विरोध केल्याची माहिती स्वतः नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी दिली दरम्यान वाटेगावकर यांनीही नगराध्यक्षावर याबाबत बोलताना आरोप केले आहेत फोटोसेशनसाठी त्यांचा हा खटाटोप असल्याचे ते म्हणाले आहेत...

या एकूणच घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना नगराध्यक्षा सौ शिंदे म्हणाल्या शुक्रवार पेठेतील काही लोकांनी त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याबाबत मला विनंती केली होती त्यामुळे मी रोजच्याप्रमाणे शहराच्या निर्जंतूकिकरणासाठी बाहेर पडले त्यावेळी मी पालिका कर्मचाऱ्यांना या कामाबाबत सूचना करून शुक्रवार पेठेत नियोजित जागेवर येण्यास सांगितले मात्र त्या ठिकाणी कोणी आलेले दिसले नाही... मग मी माहिती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली ...चक्क आरोग्य सभापतीं गुंड्याभाऊ वाटेगावकर यानी आरोग्य कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षानी बोलावलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याकरिता जायचं नाही असे धमकावले अशी माहिती समोर आली... आपल्या वार्डात मला न विचारता फवारणी करायची नाही... मी आरोग्य सभापती आहे... अशा प्रकारची चर्चाही कर्मचारी व वाटेगावकर यांच्यात झाल्याचे त्यांनी सांगितले...

याबाबत बोलताना वाटेगावकर म्हणाले आरोग्य विभागाने फवारणी संबंधी नियोजन केले आहे त्यानुसार कर्मचारी काम करत आहेत त्यात अध्यक्षांचा हस्तक्षेप नको आहे तरी फक्त फोटोसेशनसाठी अध्यक्ष काम करत आहेत ज्या वार्डात काम करायचे त्याठिकाच्या नगरसेवकाला तेथील काम करताना कल्पना देणेही गरजेचे आहे 

रतर नगराध्यक्षा सौ शिंदे व आरोग्य सभापती वाटेगावकर या दोघांचेही शहराच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत मोठं काम आहे...मग आत्ताच असलं राजकारण का..? असा शहराला पडलेला सवाल आहे... शहरात कोरोनाचा  प्राधुरभाव प्रचंड वाढला असताना कोणत्या वार्डात कोण काम करतंय हे महत्त्वाचं नाही... तर प्रत्येक वार्ड सॅनिटायझिंग करून शहराचे आरोग्य जपण्याची गरज आहे रोजचे वाढते पेशंट, त्यांना न मिळणारी सुविधा, वाढता मृत्युदर थरकाप उडवणारा असताना, अशावेळी राजकारण
करणे कितपत योग्य आहे...? राजकारण करायला शहरातील अनेक विषय आहेत मात्र, कोरोना संकटात राजकारण विरहित एकत्र काम करून शहराला कोरोनामुक्तीकडे नेणें महत्वाचे आहे...अशी चर्चा आहे. वाटेगावकर् यानी आपल्या वार्डात नगराध्यक्षा सौ शिंदे याना निर्जंतुकीकरण करण्याकरिता केलेल्या विरोधाबाबत मात्र शहरातूंन आश्चर्य व्यक्त होतंय...

No comments:

Post a Comment